एका ३० वर्षीय महिलेचा पतीस हिंजवडी पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याला जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्याकरिता ६० हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ३० हजार रुपये लाच घेताना हिंजवडी पोलिस ठाण्याचा सहाय्यक
?
याबाबत हिंजवडी पोलिस ठाण्यात ३० वर्षीय महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी दत्तात्र्य काळे याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांच्या पती विरोधात काही दिवसांपूर्वी हिंजवडी पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्हयाचा तपास पीएसआय दत्तात्र्य काळे करताना त्यांनी सदर गुन्ह्यात तक्रारदार यांचे पतीला अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून त्यांना या गुन्ह्यातून जामीन मिळवून देण्यासाठी तक्रारदार यांनी न्यायालयात अर्ज केला आहे.
न्यायालयाने याबाबत तपास अधिकाऱ्याचे म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार याकामी मदत करण्याकरिता दत्तात्रय काळे याने ६० हजार रुपये मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर, एसबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक डाॅ.शीतल जानवे यांचे मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. त्यावेळी पंचासमक्ष काळे यांनी लाचेची मागणी करुन तडजोडअंती ३० हजार रुपये घेताना त्यांना हिंजवडी पोलिस स्टेशन मध्येच पकडण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रेम वाघमारे करत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त दयानंद गावडे यांनी दिली आहे.
बारामती पोलिस ठाण्यातील अधिकारी एसबीच्या कचाट्यात
बारामती येथील २६ वर्षीय तरुणाचा मोटार वाहनाचा अपघात झालेला होता. सदर अपघाताचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व वाहन सोडवण्यासाठी बारामती पोलिस स्टेशन मधील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल माणिक जगताप (वय- ५६) यांनी ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर, एसबीने सापळा रचल्यावर अपघाताचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व वाहन सोडवण्यासाठी तक्रारदार यांना सुरुवातीला १५ हजार रुपये लाच मागणी करुन तडजोडीअंती दहा हजार रुपये खासगी व्यक्ती प्रविण भाऊसाहेब भोसले यांचे मार्फत घेताना दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार बारामती पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
































