Homeमुळशीखारवडे श्री म्हसोबा व श्री भैरवनाथाचा वार्षिक उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक...

खारवडे श्री म्हसोबा व श्री भैरवनाथाचा वार्षिक उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

मुळशी (खारवडे) : मुळशी तालुक्यातील खारवडे येथे श्री म्हसोबा व श्री भैरवनाथ यांचा वार्षिक उत्सव चैत्र शुद्ध पौर्णिमा, शुक्रवार दि. १२ एप्रिल रोजी साजरा होणार आहे. या निमित्ताने देवस्थान ट्रस्टच्या वतीने दोन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सध्या परिसरात उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.

उत्सवानिमित्त 11 एप्रिल रोजी दीपोत्सव, भजन, भक्ती शक्ती संगम अभंगवाणी व शौर्यगाथा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर 12 एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव, श्री मसोबा देवास महरुद्राभिषेक, पुरस्कार वितरण व चांदीचा महिरप अर्पण, अहवाल प्रकाशन तसेच श्री म्हसोबा देवाचा छबिना, पालखी सोहळा व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या उत्सवाच्या निमित्ताने श्री जगद्गुरु शंकराचार्य विद्यानृसिंहभारती महाराज (करवीर पीठ, कोल्हापूर), भावार्थ देखणे महाराज (प्रमुख, आळंदी देवस्थान), राष्ट्रसंत भाऊ महाराज परांडे, शिवाजी महाराज मोरे (विश्वस्त, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंढरपूर), गणेश महाराज कार्ले, डॉ. मानसिंग साबळे (वैद्यकीय अधिकारी, ससून) यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्ञानेश्वर बोडके (संस्थापक, अभिनव फार्मर्स क्लब, पुणे) यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच संतोष विठ्ठल भाडळे यांच्या तर्फे श्री म्हसोबा देवास चांदीची महिरप अर्पण करण्यात येणार आहे. कार्यक्रमास “स्वराज्यजननी येसूबाई” या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

या सर्व धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री म्हसोबा भैरवनाथ काळुबाई शंकर देवस्थान ट्रस्ट, खारवडे व ग्रामस्थांनी केले आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले

0
जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक...

एमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्ती

0
मराठी बातम्याराष्ट्रीयएमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्तीभोपाळ44 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात...

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!