Homeमुळशीमुळशीतील ९२ ग्रामपंचायत सरपंच पदांची आरक्षण सोडत जाहीर

मुळशीतील ९२ ग्रामपंचायत सरपंच पदांची आरक्षण सोडत जाहीर

मुळशी (पौड) : मुळशी तालुक्यातील आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज पार पडला. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत आयोजित या कार्यक्रमात २०२५ ते २०३० या कालावधीसाठी ९२ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले.

तहसीलदार रणजीत भोसले यांनी सोडत जाहीर केली.. यावेळी नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ, गटविकास अधिकारी भागवत, सहाय्यक महसूल अधिकारी अजय सावंत, मंगेश शिंगटे, मुकुंद डिंबले उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिट्ठ्या काढून पारदर्शकपणे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. प्रोजेक्टरद्वारे ग्रामस्थांना आरक्षणाचे सविस्तर विवरण अभिजीत बलकवडे, सतीश साळुंके, ज्ञानेश्वर पोळ यांच्या माध्यमातून सादर करण्यात आले.

या कार्यक्रमाला ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी, तसेच विविध गावांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामपंचायत सरपंच पदांचे आरक्षण पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे:

सर्वसाधारण (खुला): माण, घोटवडे, अंबडवेट, नांदे, कासारसाई, बेलावडे, कोळावडे, मांदेडे, वेगरे, वळणे, साठेसाई, मुगावडे, मुगाव, तव, खांबोली, खुबवली, भांबर्डे, लव्हार्डे, चिंचवड, हाडशी, शेडाणी, वातुंडे, मोसे, रावडे, पोमगाव, ताम्हिणी.

सर्वसाधारण (स्त्री): हिंजवडी, मारूंजी, नेरे, पौड, जामगाव, माले, मुळशी, कोळवण, भरे, उरवडे, खेचरे, आंदेशे, खारावडे, वारक, मारणेवाडी, कुळे, पाथरशेत, मुठा, भादस, चाले, भोयणी, भालगुडी, रिहे, वडगाव, कातरखडक, वांद्रे, वाळेण, जवळगाव.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (खुला): भुगाव, आंबवणे, आंदगाव, असदे, अकोले, नांदगाव, जांबे, कोंढावळे, चिखलगाव, बोतरवाडी, आडमाळ, भुकूम.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री): पिंपळोली, दारवली, निवे, मुलखेड, टेमघर, नानेगाव, कासारआंबोली, बार्पे, वांजळे, दखणे, लवळे, भोडे.

अनुसुचित जाती (खुला): डावजे, माळेगाव, कोंढूर, दासवे.

अनुसुचित जाती (स्त्री): चांदिवली, पिरंगुट, संभवे, शेरे, जातेडे.

अनुसुचित जमाती (खुला): कुंभेरी, धामण ओहोळ.

अनुसुचित जमाती (स्त्री): चांदे, काशिग.

यंदा आरक्षण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले

0
जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक...

एमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्ती

0
मराठी बातम्याराष्ट्रीयएमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्तीभोपाळ44 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात...

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!