Homeमहाराष्ट्रIndo-Pak War Operation Sindoor Update | Suryakant Chaphekar | Nagpur News Update...

Indo-Pak War Operation Sindoor Update | Suryakant Chaphekar | Nagpur News Update | पाक युद्धात 4 दिवसही टिकणार नाही: निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांचा दावा; लाहोरची सुरक्षा उघड्यावर पडल्याचा दावा – Nagpur News

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकमध्ये युद्ध भडकले तर पाक त्यात 4 दिवसही टिकणार नसल्याचा दावा भारताचे निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी गुरुवारी केला आहे. भारताने गुरुवारी सकाळी पाकचे प्रमुख बंदर शहर असणाऱ्या लाहोर येथील एअर डिफेन्स रडार यंत्

?

सूर्यकांत चाफेकर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, पाकच्या एका कृतीवर भारताने प्रतिक्रिया दिली आहे. आत्ता अवघा लाहोर उघडा पडला आहे. भारताच्या प्रतिक्रियेनंतर पाकने आणखी एखादी कुरापत केली तर पाकिस्तान 4 दिवसही युद्ध लढू शकणार नाही. तो नष्ट होईल.

हवाई क्षेत्रात भारताची पाकवर मात

ते पुढे म्हणाले, हवेतून कोणताही हल्ला झाला तर तो एअर डिफेन्स सिस्टीम या एकमेव मार्गाद्वारे रोखता येतो. एअर डिफेन्स सिस्टिममध्ये अनेक सेन्सर, वेगवेगळ्या आकाराचे रडार्स तथा शत्रूची विमाने किंवा क्षेपणास्त्र रोखणारी क्षेपणास्त्र प्रणाली असते. सीमेपासून खूप आत या यंत्रणेची नियंत्रण प्रणाली असते. तिथे त्या भागाचे संपूर्ण हवाई चित्र दिसते. हवाई सुरक्षा प्रणाली उत्तम असेल तर कोणताही हवाई हल्ला हाणून पाडता येतो. लाहोरची हवाई सुरक्षा प्रणाली निकामी झाल्यामुळे भारताने या क्षेत्रात पाकला मात दिली आहे. भारत या बाबतीत पाकवर वरचढ ठरला आहे.

भारताने पाकची हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट करणे हे एक मोठे यश आहे. पाक वापरत असलेली चिनी बनावटीची एचक्यू-9 हवाई सुरक्षा यंत्रणा सक्षम होती. पण ती आता खूप जुनी झाली आहे. त्या तुलनेत भारताची एस-400 हवाई सुरक्षा प्रणाली प्रगत आहे. भारताच्या एस-400 प्रणालीच्या तुलनेत चिनी बनावटीच्या एचक्यू-9 हवाई सुरक्षा प्रणालीचे रडार चांगले नाहीत. त्यांची कम्युनिकेशन यंत्रणा चांगली नाही. त्याचे अपग्रेडेशन झाले नाही. त्यामुळे पाक संकटात सापडला आहे, असे सूर्यकांत चाफेकर यांनी सांगितले.

पाकिस्तान कुठे चुकला?

उल्लेखनीय बाब म्हणजे हवाई सुरक्षा यंत्रणा कितीही चांगली असली तरी ती हाताळणारी मानवी बुद्धी अत्यंत महत्त्वाची ठरते. रडारवर एखादे मोठे विमानही काही मिलिमीटर आकाराचे दिसते. भारताचे ड्रोन तर एखाद्या टिम्बासारखे दिसले असेल. त्यातही पाकची चूक झाली. यावरून हवाई सुरक्षा प्रणाली हाताळणारी मानवी बुद्धी किती महत्त्वाची ठरते हे स्पष्ट होते. पाक परिस्थितीत आणखी चिघळवण्याचा प्रयत्न करेल, पण भारत त्याला असे करू देणार नाही, असा विश्वासही सूर्यकांत चाफेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

पाकने बुधवारी रात्री भारताच्या 15 लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारताने प्रत्युत्तरादाखल पाकवर ड्रोन हल्ले केले. त्यात पाकचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे घाबरून पाकने इराणकडे मदतीसाठी धाव घेतली आहे, असेही एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यावेळी बोलताना म्हणाले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

ट्विशा प्रकरणातील आरोपी निवृत्त न्यायाधीश गिरिबाला यांच्या घरी चोरी:दागिने आणि कागदपत्रांची फाइल उचलली, पोलिसांचा...

0
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात आरोपी असलेल्या निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांच्या घरात चोर शिरले. त्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह गिरिबाला आणि त्यांचे पुत्र समर्थ...

आषाढी वारीतही असणार तुकाराम मुंढेंचे लक्ष:वारकऱ्यांना मिळणार स्वच्छ व दर्जेदार अन्न; मंत्री जयकुमार गोरेंकडून...

0
राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग सध्या जोरदार चर्चेत असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे,...

जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये पाकिस्तानी नागरिकाला अटक:LoC मधून घुसखोरी करून आत आला होता, जूनमध्ये अशी तिसरी...

0
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LoC) भारतीय लष्कराने रविवारी पाकिस्तानच्या एका घुसखोराला अटक केली. अधिकाऱ्यांच्या मते, या महिन्यात जिल्ह्यात पकडला गेलेला हा तिसरा...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांची थांबलेली कामे सुरू होतील, धनु राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून...

0
रविवार, २८ जून रोजी वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास मजबूत राहील आणि ऑफिसमध्ये त्यांच्या नेतृत्वाची क्षमता चर्चेत राहील. मकर राशीच्या लोकांचा अडकलेला प्रकल्प अचानक...
spot_img

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...

मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...

0
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...

रावणाची लंका अन् अशोक वाटिका आता कशी दिसते?:अभिनेता प्रदीप काबरा यांनी श्रीलंकेतून शेअर केली...

0
अभिनेता प्रदीप काबरा नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी 'रामायण'शी संबंधित मानल्या जाणाऱ्या स्थळांची झलक शेअर केली. त्यांनी रावणाची लंका, अशोक वाटिका,...

आयसीआयसीआय बँक टॉप गेनर; मार्केट कॅप ₹२९,५८८ कोटी वाढले

0
मुंबई2 तासांपूर्वीलिंक कॉपी करागेल्या व्यावसायिक आठवड्यात देशातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे एकूण बाजार मूल्यांकन 88,678.1 कोटी रुपयांनी वाढले आहे. या वाढीमध्ये...
error: Content is protected !!