Homeदेश-विदेशClean City Competition, Ahilyanagar ranked fifth in the country in the population...

Clean City Competition, Ahilyanagar ranked fifth in the country in the population group of 3 to 10 lakhs, Indore ranked first for the eighth time, Navi Mumbai ranked third in the country, | निकाल जाहीर: स्वच्छ शहर स्पर्धा, 3 ते 10 लाख लोकसंख्या गटात अहिल्यानगर देशात पाचवे, इंदूरला आठव्यांदा पहिला क्रमांक, नवी मुंबई देशात तिसऱ्या क्रमांकावर


  • मराठी बातम्या
  • राष्ट्रीय
  • क्लीन सिटी स्पर्धा, अहिलानगर 3 ते 10 लाख लोकसंख्या गटात देशात पाचव्या क्रमांकावर आहे. इंदूरने आठव्या वेळेस प्रथम क्रमांकावर, नवी मुंबई देशातील तिसर्‍या क्रमांकावर आहे.

नवी दिल्ली30 मिनिटांपूर्वी

  • कॉपी दुवा

स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये, इंदूरने सलग आठव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब पटकावला. महाराष्ट्रातील अहिल्यानगर शहराने ३ ते १० लाख लोकसंख्या गटात देशात ५ वा क्रमांक मिळवला. यंदा अपवादात्मक कामगिरीच्या ‘सुपर स्वच्छ’मध्ये २३ शहरांचा समावेश आहे. १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांमध्ये सुरत दुसऱ्या, नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. ‘स्वच्छ शहर’ श्रेणीत १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांत अहमदाबाद पहिल्या, भोपाळ दुसऱ्या, तर लखनऊ तिसऱ्या क्रमांकावर आहे. या वर्षी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ४ श्रेणींत ७८ पुरस्कार प्रदान केले. सर्वेक्षणात १४ कोटी लोकांनी भाग घेतला.संबंधित. दिव्य सिटी

महाकुंभला विशेष पुरस्कार…महाकुंभ २०२४ मध्ये उत्कृष्ट कचरा व्यवस्थापनासाठी उत्तर प्रदेश सरकार, प्रयागराज मेळा अधिकारी आणि महानगरपालिकेला विशेष पुरस्कार देण्यात आला.

३४ आश्वासक स्वच्छ शहरांत पिंपरी चिंचवड

“एक शहर, एक पुरस्कार’ धोरणांतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ३४ शहरांना ‘आश्वासक स्वच्छ शहर’ किताब मिळाला. यामध्ये पाटणा, रायपूर, वडोदरा, सोनिपत, ग्वाल्हेर, जयपूर ग्रेटर, भटिंडा, पिंपरी चिंचवड यांचा समावेश आहे.

प्रयाग्राज बेस्ट गंगा शहर: प्रयागराज ‘सर्वोत्तम गंगा शहर’ ठरले. सिकंदराबाद कॅन्टोनमेंट बोर्डाला सर्वात स्वच्छ कॅन्टोनमेंट क्षेत्र म्हणून निवडण्यात आले. विशाखापट्टणमला सर्वोत्तम सफाई मित्र सुरक्षित शहराचा किताब देण्यात आला.

पुण्यात सहकार समिती नवी मुंबईत धार्मिक स्थळी सफाई

सुरतने उद्योगांना सांडपाणी प्रक्रिया केलेले पाणी विकून एका वर्षात १४० कोटी रुपये कमावले. कचरा डेपोसाठी एआयचा वापर केला. गुरांना आरएफआयडी टॅग जोडले. भटकी गुरे आढळल्यास ई-चलान पाठवले. पुण्यात कचरा वेचणाऱ्यांची सहकारी संस्था स्थापन केली. प्रत्येक घरातून कचरा गोळा करण्यास सुरुवात झाली. विशाखापट्टणममध्ये हिरवी रुग्णवाहिका सुरू केली. झाडांचे रक्षण केले. डासांना रोखण्यासाठी ड्रोन वापरून लार्व्हासाइड फवारले. नवी मुंबईने धार्मिक स्थळांवर ‘स्वच्छता अपनाओ बीमारी भगाओ’ नावाची मोहीम सुरू केली.

महाराष्ट्र: अहिल्यानगरची वर्षभरात ३९ वरून ५ व्या क्रमांकावर उडी

अहिल्यानगरने वर्षभरात ३९वरून ५ व्या क्रमांकावर तर छत्रपती संभाजीनगरने ६१ वरून २५ आणि राज्यात सहाव्या क्रमांकावर उडी घेतली. ५०,००० ते ३ लाख लोकसंख्या गटात लोणावळा, २०,००० ते ५०,००० गटात विटा, सासवड, देवळाली प्रवरा सुपर स्वच्छ या प्रतिष्ठेच्या यादीत आले. २०,००० पेक्षा कमी लोकसंख्या गटात पाचगणी, पन्हाळ्याने स्थान पटकावले. ५०,००० ते ३ लाखांच्या गटात कराड आणि २०,००० ते ५०,००० गटात गोव्यातील पणजीचा समावेश आहे. विशेष श्रेणीत मंत्रीस्तरीय पुरस्कारांतर्गत पिंपरी चिंचवडने आश्वासक स्वच्छ शहर पुरस्कार पटकावला.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

तिसऱ्या पत्नीच्या मनधरणीसाठी टॉवरवर चढला युवक:गार्ड रील बघत राहिले, तुरुंगातून बलात्कारी पळाला; मांजरीला अमर...

0
मध्य प्रदेशात दोन पत्नी असतानाही तिसऱ्या पत्नीला मनवण्यासाठी एक व्यक्ती टॉवरवर चढला. तर, बरेलीच्या सेंट्रल जेलमध्ये गार्ड रील पाहण्यात व्यस्त असताना बलात्काराचा आरोपी...

शनिवारचे टॅरो राशिभविष्य:मिथुन आणि कुंभ राशीच्या लोकांचे जुने वाद मिटतील, मकर राशीच्या लोकांना पदोन्नती...

0
शनिवार, २७ जून रोजी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण होऊ शकतो. मिथुन राशीच्या लोकांचे जुने वाद...

मेस्सी आणि रोनाल्डो समोरासमोर; अर्जेंटिना विरुद्ध जॉर्डन, पोर्तुगाल विरुद्ध कोलंबिया

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: मेस्सी आणि रोनाल्डो आमनेसामने; अर्जेंटिना विरुद्ध जॉर्डन, पोर्तुगाल विरुद्ध कोलंबियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज...

खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे मैदानात:यवतमाळातून आज विदर्भ दौऱ्याची सुरुवात; बंडखोरांना काय उत्तर देणार? राज्याचे...

0
ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज थेट मैदानात उतरले आहेत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात आजपासून उद्धव ठाकरेंच्या तोफ धडाडणार असून, त्यांच्या...
spot_img

मेस्सी आणि रोनाल्डो समोरासमोर; अर्जेंटिना विरुद्ध जॉर्डन, पोर्तुगाल विरुद्ध कोलंबिया

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: मेस्सी आणि रोनाल्डो आमनेसामने; अर्जेंटिना विरुद्ध जॉर्डन, पोर्तुगाल विरुद्ध कोलंबियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज...

अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...

0
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...

व्यायामानंतरही वजन कमी होत नाही:कॅलरी ट्रॅक करणे पुरेसे नाही, हार्मोन टेस्ट करा, तज्ञांकडून वजन...

0
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी तक्रार हीच असते- "मी रोज चालतो, जिममध्ये जातो, डाएटही कंट्रोल करतो, तरीही वजन कमी होत...

लग्नासाठी गोव्यात पोहोचले साऊथ आणि बॉलिवूड स्टार्स:अनिल कपूर-जॅकी श्रॉफ, चिरंजीवी आणि नागार्जुन पारंपरिक लूकमध्ये...

0
अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर आणि चित्रपट निर्माता सुंदर सी यांची मोठी मुलगी अवंतिका सुंदर विवाहबंधनात अडकली आहे. तिने 25 जून रोजी गोव्यातील...
error: Content is protected !!