राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना मोठे वक्तव्य केले आहे. पहलगाममध्ये जे झाले ते चुकीचे आहे, त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक वगैरे नाही तर आता सर्जरी केली पाहिजे, असे भुजबळ म्हणाले. पहलगाममध्ये झालेल्या दह
?
छगन भुजबळ यांनी यावेळी बोलताना संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या आठवणींना देखील उजाळा दिला. अनेक वर्षांच्या लढाईनंतर आम्हाला हा महाराष्ट्र मिळाला आहे, या लढ्यात 106 हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. ज्या व्यक्तीला इतिहास माहीत नाही, तो व्यक्ती स्वतःच भविष्य घडवू शकत नाही, असे छगन भुजबळ म्हणालेत. देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भाषावार प्रांतरचना व्हावी असा निर्णय झाला, आणि जेव्हीपी कमिटीची स्थापना झाली, असे भुजबळ म्हणाले.
या मराठी भाषिकांना स्वतःचे राज्य नव्हते, संयुक्त महाराष्ट्राची लढाई ही मराठा या वृत्तपत्रातून सुरू झाली, याचे नेतृत्व आचार्य अत्रे आणि आरडी भांडारे यांनी केले. सखा पाटील आणि मोरारजी देसाई हे त्यावेळी बोलले होते की, जोपर्यंत काँग्रेसचे सरकार आहे, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. मोरारजी देसाई यांनी फायरिंगची ऑर्डर दिली, ज्यामध्ये 106 हुतात्म्यांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले, असेही भुजबळ यांनी सांगितले. अण्णाभाऊ साठे, प्रबोधनकार ठाकरे, शाहीर अमर साबळे,सेनापती बापट हे सगळे या लढ्यात होते. प्रतापगडावर जेव्हा पंतप्रधान नेहरू आले होते, तेव्हा त्यांना लोकांनी काळे झेंडे दाखवले, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान आम्ही पुरोगामी विचार काही सोडलेला नाही, आता अजित पवार यांच्यासोबत आम्ही त्याच पुरोगामी विचाराने पुढे जात आहोत, असंही यावेळी भुजबळ यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा…
पाकवर कडक कारवाई करणारे मोदी पहिले पंतप्रधान:काँग्रेसमुळे लाखो सैनिक शहीद, मोदी याचा हिशेब चुकता करतील, एकनाथ शिंदेंचा दावा
पाकिस्तानवर कडक कारवाई करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान असल्याचा दावा शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. काँग्रेसने मतपेटीच्या राजकारणामुळे केव्हाच पाक किंवा अतिरेक्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नाही. त्यामुळे लाखो सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. याऊलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकविरोधात अत्यंत कठोर निर्णय घेत आहेत, असे ते म्हणालेत. पूर्ण बातमी वाचा…
महाराष्ट्र दिन विशेष:महाराष्ट्रासाठी 105 जणांचे हौतात्म्य, कॉम्रेड डांगेंनी केले लढ्याचे नेतृत्व; शाहिरांचे शौर्य, अत्रेंच्या तोफेची रोमहर्षक गाथा!
संयुक्त महाराष्ट्राचा लढा मुंबईच्या रस्त्यावर लढला गेला. त्यात 105 हुतात्मे झाले. यापैकी तब्बल 85 जण मुंबईतले गिरणी कामगार होते. या कामगारांचे नेतृत्व कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांनी केले. त्यांच्या तडाख्यामुळेच मुंबई महाराष्ट्राला मिळाली. श्रीपाद डांगे यांचे संघटना बांधणीचे असामान्य कौशल्य, घणाघाती भाषणे या दुग्धशर्करा योगाने संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाला. त्यामुळे कॉम्रेड डांगे संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार ठरतात. या लढ्यात कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांना साथ दिली एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, चिंतामणराव देशमुख, सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बॅ. नाथ पै यांनी. सविस्तर वाचा…































