Homeमहाराष्ट्रAjit Pawar Questioned Sharad Pawar Ncp Shivsena Bjp | Maharashtra Politics |...

Ajit Pawar Questioned Sharad Pawar Ncp Shivsena Bjp | Maharashtra Politics | तुम्हाला शिवसेना चालते, भाजप का नाही?: ​​​​​​​अजितदादांचा शरद पवारांना सवाल; विकासासाठी केंद्राची साथ हवी असल्याचा पुनरुच्चार – Mumbai News

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी शनिवारी पुन्हा एकदा महायुतीसोबत जाण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. तसेच शरद पवारांचे नाव न घेता त्यांना तुम्हाला शिवसेना चालते, पण भाजप का नाही? असा खडा सवालही केला आ

?

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सतीश पाटील, गुलाबराव देवकर, कैलास पाटील यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना अजित पवारांनी महायुती सरकारसोबत जाण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन केले. तसेच या प्रकरणी शरद पवारांनाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

शिवसेना आवडते, भाजप का नाही?

अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे सरकार गेल्यानंतर सर्व आमदारांनी आपल्या वरिष्ठांना आपण सत्तेत सहभागी होऊया असे सांगितले होते. मी सत्तेसाठी हपापलेला माणूस नाही. मी सर्वात जास्त सत्ता उपभोगली आहे. त्यानंतर आम्ही महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. एनडीएसोबत जाऊन आम्ही कोणताही वेगळा निर्णय घेतला नाही. कारण, 2019 मध्ये आपण शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तु्म्हाला शिवसेनेसोबत जायला आवडते, मग भाजप का चालत नाही? या प्रकरणी कार्यकर्त्यांना सोयीस्करपणे सांगितले जाते.

विकासासाठी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राची निर्मिती मुळातच संघर्षातून झाली आहे. सध्या खूप बदल होत आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवे. राज्यात लाखो कोटींची कामे सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू आहेत. फ्लायओव्हर, ब्रिज बांधले जात आहेत. त्यासाठी उत्तर महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. नंदुरबार व धुळे जिल्ह्यात आपल्याला अनेक कामे करायची आहेत. पाडळसे धरणाचे काम सुरू आहे. ही मोठी कामे केवळ राज्य सरकारच्या पैशांतून होत नाहीत. त्यासाठी केंद्र तसेच वर्ल्ड बँकेचा पैसाही लागतो. जायका 1 टक्का व्याजाने पैसा देते. ते केंद्र सरकारच्या परवानगीने पैसे देते. आता तुमच्या सोबत केंद्र सरकारला असायला हवे ना? म्हणून आम्ही महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रवादीत प्रत्येकाला संधी मिळणार

अजित पवारांनी यावेळी पक्षात येणाऱ्या नेत्यांना कुणाशीही भेदभाव न करण्याचीही ग्वाही दिली. तुम्ही वेगळ्या विचाराचे नाही. आपली विचारधारा एकच आहे. कधी कुणाला लवकर संधी मिळते, तर कुणाला उशिरा. पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो, मी कुणाशाही भेदभाव करणार नाही. ज्याच्यात नेतृत्व करण्याची क्षमता असेल, त्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न असेल. माझ्या पक्षात प्रत्येकाला संधी मिळेल. राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, असे ते म्हणाले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सौदी अरेबियामध्ये भारतीयही स्वतःचे घर खरेदी करू शकतील:तेल अर्थव्यवस्थेवरील अवलंबित्व कमी करण्याचा मोठा निर्णय;...

0
सौदी अरेबियाने आपला रिअल इस्टेट क्षेत्र परदेशी लोकांसाठी खुला केला आहे. ‘सौदी प्रॉपर्टीज’ नावाच्या नवीन डिजिटल पोर्टलद्वारे आता परदेशी नागरिक, कंपन्या आणि गुंतवणूकदार...

‘मराठा समाजाचा कार्यक्रम, तुम्ही बसलात तर वाद होईल’:अभिमन्यू पवारांच्या विधानावर मेधा कुलकर्णींचा संताप; भाजपमध्ये...

0
'सारथी' संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या यूपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात राज्यसभा खासदार...

‘महात्मा फुले वाड्या’तील वटपूजनावर लादलेली बंदी मागे; हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लढ्याला मोठे...

0
‘महात्मा फुले वाड्या’तील वटपूजनावर लादलेली बंदी मागे; हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लढ्याला मोठे यश! बंदी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार ? - रमेश शिंदे      पुण्यातील...

NCERT ने सामाजिक विज्ञान पुस्तकातून राज्यघटनेची प्रस्तावना काढून टाकली

0
नवी दिल्ली3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराNCERT ने नववीच्या सामाजिक विज्ञानच्या पुस्तकातून संविधानाची प्रस्तावना काढून टाकली आहे. याशिवाय सोशलिस्ट (समाजवादी) आणि सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) या शब्दांचाही...
spot_img

सौदी अरेबियामध्ये भारतीयही स्वतःचे घर खरेदी करू शकतील:तेल अर्थव्यवस्थेवरील अवलंबित्व कमी करण्याचा मोठा निर्णय;...

0
सौदी अरेबियाने आपला रिअल इस्टेट क्षेत्र परदेशी लोकांसाठी खुला केला आहे. ‘सौदी प्रॉपर्टीज’ नावाच्या नवीन डिजिटल पोर्टलद्वारे आता परदेशी नागरिक, कंपन्या आणि गुंतवणूकदार...

उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी श्रीलंकेला विजय आवश्यक:आज स्कॉटलंडविरुद्ध सामना; महिला टी-20 विश्वचषकात दोघांची पहिली लढत

0
महिला टी-20 विश्वचषकात आज श्रीलंकेचा सामना स्कॉटलंडशी होईल. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी श्रीलंकेला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. हा सामना मँचेस्टरमध्ये...

साई सुदर्शनने श्रीलंका-ए विरुद्ध शतक झळकावले:पहिल्या अनऑफिशियल कसोटीत इंडिया-ए चा स्कोअर 333/4, ध्रुव जुरेल-शेख...

0
श्रीलंका 'ए' संघाविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटीच्या पहिल्या दिवशी भारत 'ए' संघाने ४ गडी गमावून ३३३ धावा केल्या. भारतीय सलामीवीर साई सुदर्शनने आपल्या प्रथम-श्रेणी...

ग्रे-डिवोर्स; अमेरिकेत 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये 40% घटस्फोट:कारण- नात्यांपेक्षा अस्तित्वाला जास्त महत्त्व देत...

0
30 वर्षांपेक्षा जास्त काळ एकत्र राहिल्यानंतर ऍलन हिकेनबॉटम आणि त्यांच्या पत्नीने घटस्फोट घेतला. सुरुवातीला दोघांमध्ये पुस्तके आणि कलेबद्दल खूप ओढ होती. दोघांनी मिळून...
error: Content is protected !!