राज ठाकरे उधव ठाकरे युती: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे. त्यातच आता राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. अटी-शर्थींमुळे युती फिस्कटणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
राज ठाकरेंनी दिलेल्या टाळीनंतर उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिक्रिया दिली. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरेंनी काही अटी घातल्यात.. दरम्यान या अटींनंतर राज ठाकरे युती करणार नसल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय
युतीचा हा प्रस्ताव अटी-शर्थींवर अडकणार तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण राज ठाकरेंनी दिलेल्या टाळीनंतर उद्धव ठाकरेंनी मात्र, युतीसाठी अटी-शर्थी टाकल्या आहेत.
महाराष्ट्राच्या हितासाठी भांडणं छोटी, एकत्र येणं हे विशेष नाही. महाराष्ट्राच्या आड येणा-यांना घरी बोलवणार नाही हे ठरवा मग बोला… उद्धव ठाकरेंच्या याच अटी-शर्थींवरुन मनसे नेते आक्रमक झालेत. उद्धव ठाकरेंच्या अटींवरुन मनसे नेते संदीप देशपांडेंनी काही सवाल देखील उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी कोणत्याही अटी टाकल्या नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. भाजपसोबत बोलू नका, शिंदेंना घरी बोलावू नका, अशा अटी घातल्याचे समजते.
उद्धव , राज ठाकरेंच्या युतीच्या चर्चेनंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. राज ठाकरेंना अटी-शर्थींवर नमवणं सोप्प नसल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे. तसंय ते अटींवर युती करणार नसल्याचा दावा देखील सामंतांनी केला आहे.
राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान यानंतर संजय राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला. तर राऊतांच्या टीकेवर शेलारांनी देखील पलटवार केला. राज ठाकरेंनी दिलेल्या प्रस्तावानंतर बंधूभेट होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी टाकलेल्या अटी-शर्थींमुळे युती होण्याआधीच ती फिस्कटणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.































