Homeमहाराष्ट्रSuhas Kande Slams Sameer Bhujbal | समीर भुजबळ अजित पवारांकडून हुसकलेला माणूस:...

Suhas Kande Slams Sameer Bhujbal | समीर भुजबळ अजित पवारांकडून हुसकलेला माणूस: प्राण्याला हुसकल्यावर कसे पुन्हा-पुन्हा येतात तसे आहेत ते, सुहास कांदे यांचा जोरदार हल्लाबोल – Nashik News

विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे समीर भुजबळ यांनी मुंबई शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तसेच नांदगाव विधानसभा मतदारसंघ भयमुक्त करण्यासाठी निवडणूक लढवण्याची देखील त्यांनी घोषणा केली होती. आता रविवारी प्रसारमाध्यमांशी ब

?

समीर भुजबळ यांनी केलेल्या या दाव्यावर टीका करताना सुहास कांदे म्हणाले, समीर भुजबळ हा अजित पवारांकडून हुसकलेला माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समीर भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारलेला होता. महायुतीच्या विरोधात ज्यांनी कामे केली, त्या सगळ्यांचीच हकालपट्टी केली जाईल, असे ठरलेले होते. भाजप, सेना, राष्ट्रवादीत असे अनेक उदाहरणे आहेत. ईडी, सीबीआय यापासून वाचण्यासाठी समीर भुजबळ अजित पवारांच्या पुढे-पुढे करत आहेत. एखाद्या प्राण्याला हुसकल्यावर कसे ते पुन्हा-पुन्हा येतात, तसे समीर भुजबळांचे उदाहरण आहेत.

समीर भुजबळ यांचा दावा काय?

रविवारी प्रसार माध्यमांशी बोलताना समोर भुजबळ म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मी राजीनामा दिला होता, मात्र तो अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच पुढे बोलताना समीर भुजबळ म्हणाले, मी यापूर्वीही पक्षाच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिलो आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघात आमच्या कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागला होता, म्हणूनच मी त्यावेळी उमेदवारी केली होती. आता मला काय जबाबदारी द्यायची, हे पक्षाने ठरवावे. मुंबईतील कार्यकर्त्यांना वाटते की मी मुंबईत यावे, तर नाशिकच्या लोकांना वाटते की मी नाशिकमध्येच थांबावे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत समीर भुजबळ यांनी नांदगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. तेव्हा महायुतीकडून सुहास कांदे यांना पुन्हा संधी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे गणेश धात्रक यांना संधी देण्यात आली होती. यात सुहास कांदे यांनी विजय मिळवला होता, तर समीर भुजबळ यांचा पराभव झाला होता.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राम मंदिर देणगी चोरीवर चंपात राय यांचे पहिले पत्र:म्हटले- SIT च्या अहवालानंतर सर्व काही...

0
अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात आरोपांनी घेरलेले माजी सरचिटणीस चंपत राय यांनी मंगळवारी श्रीरामचरितमानसमधील चौपाई लिहून आपले मौन सोडले आहे. त्यांनी आपल्या...

7 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांना थांबलेले पैसे मिळतील, मीन राशीच्या लोकांना प्रॉपर्टी व्यवहार फायदेशीर...

0
मंगळवार, 7 जुलै रोजी कुंभ राशीच्या लोकांना थांबलेली पेमेंट मिळू शकते आणि नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या लोकांसाठी दुपारनंतर...

प्रभसिमरन सिंगला संधी; संजू सॅमसन नाबाद

0
क्रीडा डेस्क42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करासंजू सॅमसनला भारतीय संघातून वगळण्यात आलेले नाही. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने 2028 टी-20 विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे....

पावसाळ्यात वाढतात कीटक आणि झुरळे:10 खबरदारी घेतल्यास कीटक येणार नाहीत, तज्ञांकडून जाणून घ्या पळवून...

0
उन्हाळ्यानंतर पावसाळा दिलासा घेऊन येतो, पण या ऋतूत आर्द्रता आणि ओलसरपणा वाढतो आणि जागोजागी पाणी साचते. कीटकांच्या वाढीसाठी या परिस्थिती अनुकूल आहेत. यामुळेच...
spot_img

प्रभसिमरन सिंगला संधी; संजू सॅमसन नाबाद

0
क्रीडा डेस्क42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करासंजू सॅमसनला भारतीय संघातून वगळण्यात आलेले नाही. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने 2028 टी-20 विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे....

पावसाळ्यात वाढतात कीटक आणि झुरळे:10 खबरदारी घेतल्यास कीटक येणार नाहीत, तज्ञांकडून जाणून घ्या पळवून...

0
उन्हाळ्यानंतर पावसाळा दिलासा घेऊन येतो, पण या ऋतूत आर्द्रता आणि ओलसरपणा वाढतो आणि जागोजागी पाणी साचते. कीटकांच्या वाढीसाठी या परिस्थिती अनुकूल आहेत. यामुळेच...

कृती सेननने ‘मिमी’ चित्रपटाच्या वेळी एग्स फ्रीज केले:म्हणाली- लग्न किंवा मुले स्वतःच्या इच्छेने व्हायला...

0
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने खुलासा केला आहे की, तिने तिच्या 'मिमी' चित्रपटाच्या तयारीदरम्यान तिची अंडी (एग्स) फ्रीज केली होती. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या...

टाटा ग्रुपमध्ये नवीन पिढीला कमान सोपवण्याची रणनीती:नोएल टाटा यांची मुलगी माया रिटेल चेन ‘वेस्टसाइड’चा...

0
टाटा ग्रुपची फॅशन रिटेल चेन 'वेस्टसाइड'च्या ई-कॉमर्स मार्केटिंगची धुरा नोएल टाटा यांची कन्या माया टाटा (37 वर्षे) सांभाळतील. सोमवारी झालेल्या या बदलाचा उद्देश...
error: Content is protected !!