Homeमुळशीरस्त्याच्या कामाला गती; पिंपळोली जोडरस्त्यामुळे मावळ-मुळशीतील नागरिकांत समाधान

रस्त्याच्या कामाला गती; पिंपळोली जोडरस्त्यामुळे मावळ-मुळशीतील नागरिकांत समाधान

मुळशी : मावळ आणि मुळशी तालुक्याला जोडणाऱ्या पिंपळोली (ता. मुळशी) येथील महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामाला अखेर गती मिळाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या रस्त्यामुळे दोन्ही तालुक्यांमधील दळणवळण सुकर होणार असून, गेल्या अनेक वर्षांपासूनची नागरिकांची मागणी पूर्णत्वास येत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम होत असून, यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे ६.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामासाठी पिंपळोलीचे माजी सरपंच बाबाजी शेळके यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष रणजित शिवतरे आणि तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर यांनीही या रस्त्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले होते.

मुळशी तालुक्यातील रिहे खोऱ्यातून मावळ तालुक्यातील पाचाणे, पुसाणे, तसेच इतर गावांमध्ये जाण्यासाठी नागरिकांना यापूर्वी सुमारे ३५ किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता. मात्र, या नव्या रस्त्यामुळे प्रवासात मोठी बचत होणार असून, मावळ व मुळशीतील कुटुंबीयांच्या सोयरिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणे अधिक सुलभ होणार आहे.

या रस्त्याचा पूर्वीचा स्वरूप कच्चा होता आणि खिंडीतून जाणारा असल्याने पावसाळ्यात दरवर्षी रस्ता वाहून जात असे, त्यामुळे स्थानिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेष म्हणजे गेली दहा वर्षे सलग महाशिवरात्रीच्या दिवशी बाबाजी शेळके स्वतःच्या खर्चाने या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करत होते.

सध्या या रस्त्याचे काम वेगाने सुरू असून, ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष उभे राहून कामाची पाहणी करत आहेत. येत्या काही महिन्यांत हा रस्ता पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा असून, स्थानिक नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले

0
जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक...

एमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्ती

0
मराठी बातम्याराष्ट्रीयएमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्तीभोपाळ44 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात...

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!