Homeमहाराष्ट्रमुंबई लोकल ट्रेन दैनिक मृत्यूची आकडेवारी मध्य रेल्वेवरील ठाणे बडलापूर कासारा कल्याण...

मुंबई लोकल ट्रेन दैनिक मृत्यूची आकडेवारी मध्य रेल्वेवरील ठाणे बडलापूर कासारा कल्याण डोम्बिवली मार्ग यांच्यात जास्त पुरुषांच्या प्रवाश्यांचा मृत्यू झाला.


मुंबई लोकल ट्रेन दररोज मृत्यू: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी मुंबईमधील बीकेसीतील जियो कन्व्हेशन सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रेल्वेसंदर्भातील अनेक प्रकल्पांबद्दलची माहिती दिली. भविष्यात मुंबईमधील लोकल ट्रेनचा प्रवास सुखकर करण्यासाठी 17 हजार कोटींची कामं मुंबईमध्ये सुरु असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं. मात्र एकीकडे रेल्वेमंत्री या घोषणा करत असतानाच दुसरीकडे मुंबईतील लोकल प्रवासात प्रवाशी कशाप्रकारे जीव मुठीत धरुन प्रवास करतात यादी दाहकता दाखवणारं भयान वास्तव आकडेवारीच्या माध्यमातून समोर आलं आहे.

663 प्रवाशांचा मृत्यू

मध्य रेल्वेच्या ठाणे ते बदलापूर आणि कसारा मार्गावरील लोकल ट्रेनचा प्रवास जीवघेणा ठरत असल्याचं नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालंय. 1 जानेवारी 2024 ते 31 मार्च 2025 या 14 महिन्यांच्या कालावधीत ठाणे, डोंबिवली आणि कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या नोंदीनुसार रुळ ओलांडताना आणि रेल्वेतून पडून 663 प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. मुंबई विभागातील इतर पोलीस ठाण्यात दाखल घटनांपेक्षा अपघाताची ही आकडेवारी तुलेनं बरीच जास्त आहे.

लाखो प्रवासी पण सुविधा अपुऱ्या

नोकरी वा व्यवसायानिमित्त दररोज लाखो चाकरमानी कर्जत ते कसाराहून मुंबईत येतात. दैनंदिन प्रवास करणाऱ्या या लाखो प्रवाशांसाठी लोकल ट्रेन वगळल्यास पर्यायी वाहतुकीचा मार्गच उपलब्ध नाही. रस्ते वाहतुकीची सुविधा नसलेल्या भागांतील नागरिकांना मुंबई आणि मुख्य शहरांमध्ये ये-जा करण्यासाठी पूर्णतः रेल्वेवर अवलंबून राहावे लागते. त्यात रेल्वेचे अनेक प्रकल्प प्रलंबित असल्याने वहनक्षमतेत अद्याप वाढ झालेली नाही. आहे त्या सोयी सुविधा वाढत्या प्रवासीसंख्येला कमी पडत असल्याने दिवसोंदिवस ट्रेनमधील गर्दी वाढत आहे.

नक्की वाचा >> मुंबईकरांचा लोकल प्रवास सुखकर करण्यासाठी मोदी सरकारने उघडली तिजोरी; 17 हजार कोटींचे…; रेल्वे मंत्र्यांची माहिती

कोणकोणती स्थानकं या मार्गावर येतात?

कार्यालयाचे ठिकाण वेळेत गाठण्यासाठी प्रवासी अतिघाईत अनेकदा रुळ ओलांडतात. शिवाय तुडुंब गर्दीने भरलेल्या उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये चढण्याच्या प्रयत्नामध्ये अनेक प्रवाशी ट्रेनमधून खाली पडतात. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि ऐरोली ही रेल्वे प्रमुख रेल्वे स्थानके येतात. डोंबिवली पोलीस ठाणे हद्दीत कोपर, डोंबिवली, ठाकूर्ली, भिवंडी, खारबाव, कामनरोड, जुचंद्र या रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनर, अंबरनाथ, बदलापूर, शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, वाशिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी आणि कसारा या स्थानकांचा कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत समावेश आहे.

मृतांमध्ये पुरुषांची संख्या अधिक

1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत 140 पुरुष प्रवासी, तर 11 महिला मृत्युमुखी पडले, डोंबिवलीत 51 पुरुष आणि तीन महिला तर, कल्याणमध्ये 91 पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.

नक्की वाचा >> छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचं दर्शन अन् ते ही रेल्वेनं! मुख्यमंत्र्यांची घोषणा; 10 दिवसांची…

यावर रेल्वेचं म्हणणं काय?

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी, अपघातांबाबत वारंवार जनजागृती करूनही प्रवासी रुळ ओलांडत आहेत. धावत्या रेल्वेतून पडण्याचे प्रवाशांचे प्रमाण वा इतर अपघातांच्या घटनांमध्ये घट झाली आहे, अशी माहिती दिली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

कथा: व्यापाऱ्याला सेवकाची शिकवण:एक छोटीशी चूक आपल्या वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरू शकते, प्रत्येक परिस्थितीत...

0
एक लोककथा आहे. एका राज्यात एक अत्यंत कुशल व्यापारी होता. त्याची बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा आणि व्यवस्थापन क्षमता अद्भुत होती. राजा देखील त्याच्या योग्यतेने प्रभावित...

जोकोविचने फेडररचा विक्रम मोडला:विम्बल्डनमध्ये सर्वाधिक 106 सामने जिंकणारा खेळाडू बनला; ओसाकाने वर्ल्ड नंबर-1 सबालेंकाला...

0
नोव्हाक जोकोविच विम्बल्डनच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा पुरुष खेळाडू बनला आहे. चौथ्या फेरीत, 39 वर्षीय जोकोविचने रशियाच्या क्वालिफायर रोमन सफीउलिनला 7-6 (8-6), 6-3,...

पंढरपुरात जीर्णोद्धार पूर्ण झालेल्या मंदिरांत मूर्तींची प्राणप्रतिष्ठा:व्यंकटेश, महालक्ष्मी, हनुमान आदी मंदिरे दर्शनासाठी खुली

0
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत जीर्णोद्धार व संवर्धनाची कामे पूर्ण झालेल्या व्यंकटेश मंदिर, महालक्ष्मी मंदिर, काशी...

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...
spot_img

जोकोविचने फेडररचा विक्रम मोडला:विम्बल्डनमध्ये सर्वाधिक 106 सामने जिंकणारा खेळाडू बनला; ओसाकाने वर्ल्ड नंबर-1 सबालेंकाला...

0
नोव्हाक जोकोविच विम्बल्डनच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा पुरुष खेळाडू बनला आहे. चौथ्या फेरीत, 39 वर्षीय जोकोविचने रशियाच्या क्वालिफायर रोमन सफीउलिनला 7-6 (8-6), 6-3,...

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...
error: Content is protected !!