Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तारांचे बंड शमले:मुलाचा अर्ज मागे घेणार, म्हणाले - यापुढे...

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तारांचे बंड शमले:मुलाचा अर्ज मागे घेणार, म्हणाले – यापुढे त्रास होणार नाही याची गॅरंटी दिली

गेल्या दोन दिवसांपासून भाजपवर तोफ डागणाऱ्या शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांचा सूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर पूर्णपणे बदललेला पाहायला मिळत आहे. जिल्ह्यामध्ये होणारा त्रास यापुढे होणार नाही, याची गॅरंटी मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर सत्तार यांनी आपल्या मुलाचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, शिवसेनेचे सहा आमदार आणि खासदारांनी महायुतीमध्ये एकजुटीने राहावे, असा आदेश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेची जागा महायुतीमध्ये भाजपकडे गेली असून, तिथे सुहास शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे नाराज झालेल्या अब्दुल सत्तार यांनी आपले पुत्र समीर सत्तार यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी सत्तार यांनी भाजपवर ‘शिवसेनेचे मुंडके छाटण्याचे काम भाजप करत आहे’ असा गंभीर आरोप करत युतीबाबत फेरविचार करण्याचा इशाराही दिला होता. या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर मुंबईत मुख्यमंत्री आणि अब्दुल सत्तार यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अब्दुल सत्तार यांचे बंड शमवण्यात यश आल्याचे दिसून येत आहे. नेमके काय म्हणाले अब्दुल सत्तार? अब्दुल सत्तार यांची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “खालच्या स्तरावर आम्हाला जो काही त्रास झाला, तो भविष्यात होणार नाही याची गॅरंटी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आमच्याकडून काही चूक झाली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे कान पकडतील आणि मित्रपक्षाकडून काही झाल्यास मुख्यमंत्री स्वतः पाहतील. “माझ्या सर्व तक्रारी मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या असून त्यांनी त्यावर सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. मला जे काही बोलायचे ते मी बोललो. माझ्या मतदारसंघात कोणताही वाद विवाद होणार नाही यासाठी मी माझ्या मुलाचा उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे,” असे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. नाराजीबाबत मार्ग काढण्याचे दिले आश्वासन अब्दुल सत्तार म्हणाले, “कोणतेही आश्वासन कोणताही शब्द मी मुख्यमंत्र्यांकडून याच्यासाठी घेतलेला नाही. खालच्या पातळीवर आम्हाला होणारा त्रास पुढे होणार नाही याची दखल ही मुख्यमंत्र्यांनी घेतली. माझी जी नाराजी होती, त्याबाबत मार्ग काढण्याचा आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मला दिले आहे. सत्तारांनी आधी भाजपवर केली होती जहरी टीका या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आरोप केले होते. “भाजप शिवसेनेचे मुंडके छाटण्याचे काम करत आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला होता. भाजपची वागणूक सुधारली नाही, तर युतीबाबत फेरविचार करावा लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला होता. त्यांच्या या भूमिकेला बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनीही पाठिंबा दर्शवत मित्रपक्षांच्या हस्तक्षेपावर नाराजी व्यक्त केली होती.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भारतीय मुष्टियोद्धा मीनाक्षी आणि जास्मिन जागतिक क्रमांक 1

0
मराठी बातम्याराष्ट्रीयभारतीय मुष्टियोद्धा मीनाक्षी आणि चमेली जागतिक क्रमांक 1 | अर्थतज्ञ नीलकंठ जागतिक बँक ईडी1 तासापूर्वीलिंक कॉपी कराआजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:पृथ्वी, आकाश, पाणी, वायू आणि सूर्य निःस्वार्थपणे काम करतात, आपणही...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; पृथ्वी, आकाश, पाणी, हवा आणि सूर्य निःस्वार्थपणे कार्य करतात; आपणही दयाळूपणाचा सराव...

लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 17 विकेट पडल्या:इंग्लंडने न्यूझीलंडला 254 धावांचे लक्ष्य दिले; 36 धावांवर...

0
लॉर्ड्समध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात असलेला कसोटी सामना गोलंदाजांच्या नावावर राहिला. पहिल्या दिवशी 16 विकेट पडल्यानंतर दुसऱ्या दिवशीही फलंदाज संघर्ष करताना...

तांबेवाडी तांड्यात वृक्षतोडी विरोधात वनविभागाने केली धडक कारवाई:35 टन अवैध लाकूडसाठा जप्त, शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा...

0
बार्शी तालुक्यातील तांबेवाडी तांडा येथे वनविभागाने अवैध वृक्षतोडीविरोधात मोठी कारवाई करत सुमारे ३० ते ३५ टन अवैध लाकूडसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी...
spot_img

लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 17 विकेट पडल्या:इंग्लंडने न्यूझीलंडला 254 धावांचे लक्ष्य दिले; 36 धावांवर...

0
लॉर्ड्समध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात असलेला कसोटी सामना गोलंदाजांच्या नावावर राहिला. पहिल्या दिवशी 16 विकेट पडल्यानंतर दुसऱ्या दिवशीही फलंदाज संघर्ष करताना...

पुरुष अंडर-18 हॉकी आशिया कप- भारताने पाकिस्तानला हरवले:सेमीफायनल 5-3 ने जिंकला; आशिष तानीने 4...

0
भारतीय अंडर-18 पुरुष हॉकी संघाने शुक्रवारी उपांत्य फेरीत पाकिस्तानला 5-3 ने हरवले आहे. या विजयासह भारताने अंडर-18 पुरुष आशिया कप 2026 च्या अंतिम...

पर्यावरण दिन विशेष:पर्यावरण संरक्षण का महत्त्वाचे आहे?, जाणून घ्या दोहन ते संवर्धन हा महत्त्वपूर्ण...

0
पर्यावरणाचे रक्षण करणे हा निसर्गावर कोणताही उपकार नाही, ही तर आपल्या स्वतःच्या श्वासांची आणि येणाऱ्या पिढ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे कारण जोपर्यंत निसर्ग सुरक्षित...

जुमांजी अभिनेता जेम्स हँडीची हत्या; मैत्रिणीच्या मुलाला अटक

0
55 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा'जुमांजी' आणि 'टॉप गन: मॅव्हरिक' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेले हॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जेम्स हँडी यांची कॅलिफोर्नियातील त्यांच्या घरी हत्या करण्यात...
error: Content is protected !!