Homeदेश-विदेशIT प्रोफेशनल्स 17 वर्षे विश्रांतीशिवाय काम करत आहेत आणि नंतर काढून टाकले...

IT प्रोफेशनल्स 17 वर्षे विश्रांतीशिवाय काम करत आहेत आणि नंतर काढून टाकले पोस्ट व्हायरल मराठी बातम्या


आयटी प्रोफेशनल्स व्हायरल पोस्ट: कंपनीसाठी आपण दिवस रात्र एक करुन काम करत असतो. 8 तासाची शिफ्ट संपली तरी अनेक जण काम करतच असतात. काहीजण तर पगारवाढ नाही मिळाली तरी वर्षानुवर्षे एकाच कंपनीत असतात. इतकं प्रामाणिक राहुनही कंपनीने तुम्हाला अचानक कामावरुन काढून टाकलं तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? असाच धक्कादायक प्रकार एका आयटी इंजिनीअरसोबत घडला. यासंदर्भात त्याने एक पोस्ट लिहिनी असून ती सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतेय. ती वाचून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलंय.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

अमेझॉन कंपनीतील एका आयटी इंजिनीअरने 17 वर्षे अविरत मेहनत केली, एकही सुट्टी न घेता कुटुंबासाठी संघर्ष केला. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय प्रोजेक्टवर भर देण्याच्या धोरणामुळे कंपनीने मोठ्या प्रमाणावर कपात सुरू केली. याचा फटका इंजिनीअरला बसला आणि त्याला नोकरी गमवावी लागली. ज्यामुळे त्याचे जीवन एका क्षणात उलटले. या घटनेने आयटी क्षेत्रातील नोकरीच्या असुरक्षितता समोर आली.

भावनिक पत्र

प्लॅटफॉर्म ब्लाइंडवर त्याने आपली व्यथा मांडली. ’17 वर्षे मी कधी ब्रेक नाही घेतला, कुटुंबासाठी झटलो, पण आता रडू आलंय.’, असं त्याने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय. कपातीची वृत्त कळताच तो एक तास रडत बसला होता. नंतर पत्नीला कॅफेत बोलावून त्याने सर्व घटना सांगितली. पत्नीने त्याला धीर दिला, ‘ आपण मिळून यातून पुढे जाऊ.’, असे ती म्हणाली.

हे पत्र लाटून हजारो लोकांचे डोळे पाणावले. ज्यात अनेकांनी स्वत:ला त्याच्या अनुभवांशी जोडले. ही केवळ वैयक्तिक कहाणी नाही तर एआय क्रांतीमुळे लाखो आयटी कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी निगडित वेदनादायी सत्यकथा असल्याचे म्हटले जात आहे.

कुटुंबाच्या साथीने नवी सुरुवात

कपातीच्या दुसऱ्या दिवशी आयटी इंजिनीअर पत्नीसोबत नाश्ता करण्यासाठी गेला. त्याने मुलांना शाळेत सोडले. मुलांच्या हास्याने त्याला जाणवले, ‘खरे जगणे म्हणजे हे.’ यापूर्वी कामामुळे थकलेला असल्याने कुटुंबासाठी वेळ मिळाला नव्हता. आता मात्र त्याला यात आनंद दिसू लागलाय. ‘स्वतःला दोष देऊ नका, हा शेवट नाही, नव्याची सुरुवात आहे.’, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

सोशल मीडियात प्रतिक्रिया

पत्र व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आलाय. एका यूजरने म्हटले, ‘राहणीमान साधे ठेवा, नोकरीला आयुष्याशी वरचढ होऊ देऊ नका.’ दुसऱ्याने सांगितले, ‘कपात ही संधी आहे, स्वतःला पुन्हा शोधण्याची.’ तिसऱ्याने म्हटले, ‘अनेक मेहनती कर्मचारी कुटुंबाकडे वेळ देतात, आता तुम्हीही ते करा.’ या प्रतिक्रियांमुळे इंजिनीअरला आधार मिळाला.तसेट आयटी क्षेत्रातील असंख्य लोकांना धीर मिळालाय. आता तो नव्या संधी शोधतोय, ज्यामुळे इतरांना प्रेरणा मिळाली आहे.

एआयमुळे आयटी क्षेत्रात नोकऱ्यांवर संकट

एआय तंत्रज्ञानाने आयटी क्षेत्रातील लाखो नोकऱ्या धोक्यात आणल्या आहेत. अमेझॉनसारख्या कंपन्या एआयवर गुंतवणूक वाढवत असल्याने कपात वाढलीय. करिअरसोबत वैयक्तिक जीवनाची किंमत समजून घ्यावी लागेल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१. १७ वर्षे काम केलेल्या आयटी कर्मचाऱ्याला कशामुळे नोकरी गमावली?

अमेझॉन कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रकल्पांवर भर देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर छंटणी केली. या कर्मचाऱ्याला ईमेलद्वारे अचानक नोकरीतून काढल्याची माहिती मिळाली, ज्यामुळे त्याचे १७ वर्षांचे समर्पण एका क्षणात संपले.

२. कर्मचाऱ्याच्या भावनिक पत्रात काय म्हटले आहे?

ब्लाइंड प्लॅटफॉर्मवर त्याने लिहिले: ‘१७ वर्षे सुट्टीशिवाय काम केले, कुटुंबासाठी झालो, पण आता रडू आले.’ छंटणी कळताच तो एक तास रडला, पत्नीला कॅफेत बोलावून सांगितले. पत्नीने धीर दिला की, ‘मिळून हे संकट पार करू.’

३. कपातीनंतर कर्मचाऱ्याने काय शिकवले?

तो म्हणाला, ‘स्वतःला दोष देऊ नका, हे अंत नाही, नव्या सुरुवातीची सुरुवात आहे.’ कुटुंबासोबत वेळ घालवण्याची महत्त्वाची जाणीव झाली. सोशल मीडियावर हजारो प्रतिक्रिया आल्या, ज्यात इतरांनीही आपल्या अनुभव शेअर केले आणि त्याला आधार दिला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!