नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील राष्ट्रीय तिरंदाज अर्जुन सोनवणेचा राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानकावर अपघाती मृत्यू झाला. तो सहकाऱ्यांसह भटिंडाहून शकुरबस्ती- मुंबई सेंट्रल एसी स्पेशल ट्रेनने घरी परतत होता. कोटा रेल्वे स्थानकावर जेवणाचे पॅके
.
२० वर्षीय अर्जुन सहकाऱ्यांसोबत खेळण्यासाठी भटिंडा येथे गेला होता. ते तिथून परतत होते. शनिवारी रात्री ८:३० वाजता कोटा जंक्शनवर आल्यानंतर ही अपघाताची दुर्देवी घटना घडली. अपघातानंतर त्याचे साथीदार घाबरले. असा अपघात होऊ शकतो याची कोणालाही कल्पना नव्हती. त्याला ताबडतोब एमबीएस रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. त्याच्या कुटुंबाला माहिती देण्यात आली. रविवारी त्याचे मामा आणि मावशीचा मुलगा कोटा येथे पोहचले. शवविच्छेदनानंतर, मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला.
भाऊबीजेला नव्हता घरी
मागील दहा दिवसांपासून अर्जुन हा गुरु काशी विद्यापीठ पंजाब येथे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तिरंदाजी स्पर्धेसाठी त्याची चुलत बहीण दीक्षासोबत गेला होता.
गेल्यावर्षी लिगामेंट शस्त्रक्रिया, तेथेच अपघातात दुखापत
अर्जुनचे गेल्या वर्षी उजव्या पायाचे लिगामेंटचे ऑपरेशन झाले होते. परंतु, दुर्दैवाने या अपघातात त्याच पायाला दुखापत झाली
आठ सुवर्णपदके नावावर, चाैघे भाऊ-बहीण तिरंदाज
अर्जुन पदवीचे शिक्षण घेत होता. पाच वर्षांपासून चौघे बहिण- भाऊ तिरंदाजीचा सराव करत होते. तो आठ वेळा राष्ट्रीय पातळीवर खेळला आणि राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आठ वेळा सुवर्णपदके जिंकली होती.
अपघाताच्या १५ मिनिटांपूर्वी वडिलांशी फोनवर बोलणे
खेडगाव | अपघाताआधी १५ मिनिटांपूर्वी अर्जुनचे वडिलांशी फोनवर बोलणे झाले होते. तो वडिलांशी बोलताना म्हणाला, की पप्पा आम्ही आताच जेवण केले आहे. दहा मिनिटांत ट्रेन निघणार आहे. आम्ही उद्या सायंकाळी पाचपर्यंत घरी पोहोचू. त्यानंतर पंधरा मिनिटांनी त्याचा परत फोन आला की पप्पा, माझा अपघात झाला. पायाला लागले. वडिलांनी सांगितले की, घाबरू नकोस सगळे व्यवस्थित होईल. त्यानंतर तो बोलला की सरांशी बोला. सरांनी त्याच्या वडिलांना सांगितले की, त्याला हॉस्पिटलला हलवत आहोत.
स्पर्धेत चांगली कामगिरी, अपघाताने धक्का
अर्जुन एक चांगला खेळाडू होता. तो कसा पडला हे स्पष्ट नाही. अर्जुनने भटिंडा येथील आंतर-विद्यापीठ स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. -अनिल कमलापुरी, प्रशिक्षक
































