निवडणूक आयोग: मतांच्या चोरीच्या आरोपानंतर आता निवडणूक आयोगानं राहुल गांधींना इशारा दिलाय.7 दिवसात शपथपत्र देण्याचं आवाहन निवडणूक आयोगानं राहुल गांधींना दिलंय. तसंच राहुल गांधींचे सर्व आरोप देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडून फेटाळण्यात आले आहेत.. पाहुयात निवडणूक आयोगानं राहुल गांधींच्या आरोपांना नेमकं काय प्रत्युत्तर दिलंय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
राहुल गांधींनी केलेल्या मतांच्या चोरीचे आरोप निवडणूक आयोगानं फेटाळले आहेत. काही दिवसांपूर्वी मतदार यादींसह राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. तसंच निवडणूक आयोगानं यावर स्पष्टीकरण द्यावं असं आव्हान देखील राहुल गांधी यांच्याकडून देण्यात आलं होतं. दरम्यान राहुल गांधींच्या आरोपांना निवडणूक आयोगानं उत्तर दिलं आहे. राहुल गांधींनी केलेला मतांच्या चोरीचा आरोप खोटा असल्याचा पलटवार निवडणूक आयोगाकडून करण्यात आलाय.
राहुल गांधींनी सात दिवसात शपथपत्र द्यावं अन्यथा त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत असं आम्ही समजू. तसंच शपथपत्र न दिल्यास राहुल गांधींनी देशाच्या जनतेची माफी मागावी असं आव्हान निवडणूक आयोगानं राहुल गांधींना दिलंय.
मतांच्या चोरीच्या आरोपांनंतर राहुल गांधी पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. राहुल गांधींनी बिहारच्या सासाराममधून व्होटर अधिकार यात्रेला सुरूवात केलीय.. दरम्यान यावेळी राहुल गांधी यांनी वाढलेल्या मतदानावरून निवडणूक आयोगाला सवाल केलेत. तसंच निवडणूक आयोगानं व्हिडिओ द्यावेत अशीही मागणी त्यांनी
केली.
राहुल गांधींनी बिहारमध्ये सुरू केलेल्या व्होट अधिकार यात्रेवर भाजपनं टीका केलीय. राहुल गांधींच्या यात्रेत दम नसल्याची खोचक टीका बावनकुळेंनी केली. तर राहुल गांधींवर टीका करण्याएवढी बावनकुळेंची उंची नसल्याचं टीकास्त्र वडेट्टीवारांनी डागलं.
भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींनी पुन्हा एकदा रस्त्यावरची लढाई सुरू केलीय. येत्या काही दिवसात बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजरणार आहेत. त्यामुळे राहुल गांधींनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केलीय.. मात्र, राहुल गांधींच्या यात्रेचा बिहारमध्ये काँग्रेसला किती फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणारय.
FAQ
१. निवडणूक आयोगाने राहुल गांधींना कोणता इशारा दिला आहे आणि त्यांच्या मतांच्या चोरीच्या आरोपांबाबत काय भूमिका घेतली आहे?
उत्तर: निवडणूक आयोगाने राहुल गांधींनी केलेल्या मतांच्या चोरीच्या आरोपांना खोटे ठरवत फेटाळले आहेत. आयोगाने राहुल गांधींना सात दिवसांत शपथपत्र सादर करून आरोपांचे पुरावे देण्याचे आवाहन केले आहे. शपथपत्र न दिल्यास त्यांचे आरोप बिनबुडाचे समजले जातील आणि त्यांनी देशाच्या जनतेची माफी मागावी, असे आयोगाने म्हटले आहे. याशिवाय, आयोगाने राहुल गांधींच्या मतदार यादीतील गैरप्रकार आणि वोट चोरीच्या दाव्यांना राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगितले.
२. राहुल गांधींनी बिहारमधील व्होटर अधिकार यात्रेदरम्यान कोणते मुद्दे उपस्थित केले आणि त्यावर भाजपची काय प्रतिक्रिया होती?
उत्तर: राहुल गांधींनी बिहारच्या सासाराम येथून सुरू केलेल्या व्होटर अधिकार यात्रेदरम्यान निवडणूक आयोगावर मतदार यादीतील गैरप्रकार आणि वोट चोरीचे आरोप केले. त्यांनी वाढलेल्या मतदानावर प्रश्न उपस्थित करत सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या यात्रेवर भाजप नेते बावनकुळे यांनी टीका करत ती प्रभावहीन असल्याचे म्हटले. याला प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी बावनकुळे यांच्यावर पलटवार करत त्यांची टीका करण्याची पात्रता नसल्याचे सांगितले.
३. व्होटर अधिकार यात्रेचा बिहार विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
उत्तर: राहुल गांधींनी बिहारमध्ये व्होटर अधिकार यात्रा सुरू करून मतदार यादीतील कथित गैरप्रकार आणि वोट चोरीविरोधात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. ही यात्रा १७ ऑगस्ट २०२५ पासून सासाराम येथून सुरू झाली असून, १ सितंबरला पटना येथे रॅलीने समाप्त होईल. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी इंडिया गठबंधनाला या यात्रेच्या माध्यमातून मतदारांना एकत्रित करण्याची संधी आहे. मात्र, या यात्रेचा काँग्रेस आणि गठबंधनाला कितपत राजकीय फायदा होईल, हे निवडणूक निकालांवर अवलंबून असेल.





























