Homeमहाराष्ट्रPulotsav Honors Artist Chintamani Hasabnis | बालगंधर्व रंगमंदिरात दृष्टिहीनांसाठी ब्रेल चित्रकला: 'पुलं'...

Pulotsav Honors Artist Chintamani Hasabnis | बालगंधर्व रंगमंदिरात दृष्टिहीनांसाठी ब्रेल चित्रकला: ‘पुलं’ म्हणजे विनोदाचा निखळ झरा -पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे प्रतिपादन – Pune News

पुलंनी विविध प्रकारची साहित्य निर्मिती करून वाचकांना आपल्या सभोवताली वावरणाऱ्या माणसांच्या अंतरंगात डोकावण्याची एक नवीन दृष्टी दिली. पुलं म्हणजे विनोदाचा निखळ झरा असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.

?

पुलंचा २५ वा स्मृतिदिन व सुनीताबाईंच्या जन्मदिनाचे औचित्य साधून, करोना काळात बंद पडलेला ‘ग्लोबल पुलोत्सव’ पुन्हा सुरु झाला आहे. या ‘ग्लोबल पुलोत्सवा’ निमित्त बालगंधर्व रंगमंदिरात ब्रेल लिपीव्दारे दृष्टिहीनांना चित्रकलेचा आनंद देणारे प्रसिध्द चित्रकार चिंतामणी हसबनीस यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते पुलोत्सव कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला, त्यावेळी प्रभुणे बोलत होते.

यावेळी चिंतामणी हसबनीस यांचे सप्रयोग व्याख्यान झाले आणि त्यांच्याशी डॉ. मंदार परांजपे यांनी संवाद साधला.

यावेळी व्यासपीठावर महोत्सवाचे स्वागताध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, लोकमान्य मल्टिर्पपज को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.चे सुशील जाधव, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार आदी मान्यवर उपस्थित होते.

पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले की, आपल्या पूर्वजांनी अजिंठासारख्या अंधाऱ्या गुहांमध्ये जाऊन जी चित्रे आणि शिल्पे रेखाटली ते पाहून अचंबित व्हायला होते. आजही ती चित्रे पाहिल्यानंतर आपल्या भावना उचंबळून येतात. चित्र पाहण्याची एक भाषा आणि एक लिपी असते. पाहणारा प्रत्येक जण स्वतःची लिपी आणि भाषेनुसार त्या चित्राशी बोलत असतो. या अर्थाने ते बहुभाषिक असतात. हसबनीस यांनी दिव्यांगांना समजेल अशी चित्रांची भाषा विकसीत केली. दृष्टिहीनांना देखील चित्रांचा आनंद घेण्याचा अधिकार आहे, या भावनेतून हसबनीस यांनी विकसीत केलेली ही चित्रे म्हणजे एक वैज्ञानिक शोध आहे. दृतगतीवर गतीने वाहणारे आपले हे गतिमान जीवन थोडे थांबून चित्रांचा आनंद घ्यावा, असे सुचवते. जलदगतीने धावणारा हा समाज अंध झाला आहे. कला लुप्त होत असून डोळसांनी देखील चित्रे समजून घेतली पाहिजे. प्रसिध्दी माध्यमांव्दारे येणाऱ्या हिंसा, बलात्कार यांच्या बातम्यांच्या भडीमारामुळे समृध्द संस्कृती आणि कलेचा आपल्याला विसर पडत आहे.

यानंतर झालेल्या प्रकट मुलाखतीत पुरस्काराला उत्तर देताना चिंतामणी हसबनीस म्हणाले की, आज मिळालेल्या पुरस्कारामुळे माझ्या मेहनतीचे चीज होत आहे, याचे समाधान मिळत आहे. पुलंनी ज्या पध्दतीने त्यांच्या साहित्य लेखनातून विनोदाच्या माध्यमातून भाष्य केले, त्याच पावलावर पाऊल ठेवत ‘क्लोज आईज अँड ओपन माईंड’ या चित्र मालिकेव्दारे दृष्टिहीनांना चित्रांचा अनुभव देण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवीन मतदाराला द्यावा लागेल पालकांच्या SIR चा तपशील:आतापर्यंत फक्त जुन्या मतदारांना लागू होते; EC...

0
निवडणूक आयोगाने मतदार यादीत नाव नोंदवू इच्छिणाऱ्या नवीन अर्जदारांसाठीही नवीन नियम लागू केला आहे. आता फॉर्म-6 भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करू इच्छिणाऱ्या...

7 वर्षांच्या चिमुकलीवर सुरक्षारक्षकाचा लैंगिक अत्याचार:मुंबईतील संतापजनक घटना, संतप्त नागरिकांचा पोलिस ठाण्याला घेराव

0
मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ७ वर्षीय निष्पाप चिमुकलीवर इमारतीच्याच सुरक्षारक्षकाने बाथरूममध्ये घुसून...

बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले:लुधियानामध्ये बहिणीला रडतानाचा व्हिडिओ पाठवला, म्हणाली- मला घेऊन जा; इंस्टाग्रामवरून...

0
लुधियानामध्ये बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले आहे. त्याने गर्लफ्रेंडला आपल्या ताब्यात ठेवले आहे. अल्पवयीन मुलगी वारंवार आपल्या बहिणीला व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ आणि ऑडिओ मेसेज...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांचा ताण कमी होईल, तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल

0
रविवार, 12 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांच्या घरी पाहुणे आल्याने लगबग राहील. वृषभ राशीच्या लोकांना जुन्या मतभेदातून दिलासा मिळू शकतो. मिथुन राशीचे लोक...
spot_img

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...
error: Content is protected !!