Homeमहाराष्ट्र7 वर्षांच्या चिमुकलीवर सुरक्षारक्षकाचा लैंगिक अत्याचार:मुंबईतील संतापजनक घटना, संतप्त नागरिकांचा पोलिस ठाण्याला...

7 वर्षांच्या चिमुकलीवर सुरक्षारक्षकाचा लैंगिक अत्याचार:मुंबईतील संतापजनक घटना, संतप्त नागरिकांचा पोलिस ठाण्याला घेराव

मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ७ वर्षीय निष्पाप चिमुकलीवर इमारतीच्याच सुरक्षारक्षकाने बाथरूममध्ये घुसून पाशवी लैंगिक अत्याचार केला आहे. या घृणास्पद प्रकारानंतर संपूर्ण परिसरात संतापाची मोठी लाट उसळली असून, संतप्त नागरिकांनी थेट पायधुनी पोलिस ठाण्याला वेढा घालत जोरदार निदर्शने केली आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित ७ वर्षांची मुलगी आपल्या इमारतीमधील वॉशरूममध्ये गेली होती. याच वेळी इमारतीत तैनात असलेल्या नराधम सुरक्षारक्षकाने वॉशरूममध्ये जबरदस्तीने प्रवेश केला आणि या निष्पाप चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. या अमानुष कृत्यामुळे पीडित मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपीला अटक; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात या भयंकर घटनेची माहिती मिळताच पायधुनी पोलिसांनी तत्काळ कायदेशीर पावले उचलत गुन्ह्याची नोंद केली. पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत अत्याचार करणाऱ्या या नराधम सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. सध्या पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पायधुनी पोलिस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नागरिकांचा रास्तारोको घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांच्या संतापाचा अक्षरशः कडेलोट झाला. शेकडो नागरिकांनी एकत्र येत पायधुनी पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली. संतप्त जमावाने मुख्य रस्ता अडवून धरत ‘रास्तारोको’ केला, ज्यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. “नराधम आरोपीला तत्काळ पोलिस स्टेशनमध्येच फाशी द्या,” अशी आक्रमक मागणी जमावाकडून केली जात होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना घेराव घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पायधुनी पोलिस ठाण्यात पोहोचले. मात्र, उद्विग्न झालेल्या जमावाने आणि पीडितेच्या नातेवाईकांनी त्यांनाही थेट घेराव घालत आपला जोरदार रोष व्यक्त केला. अखेर पोलिसांनी अत्यंत संयमाने नागरिकांची समजूत काढत जमावाला बाजूला केले आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. मुंबईत चिमुकल्या मुली सुरक्षित आहेत का? महिला आणि मुलींसाठी देशात सर्वांत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबई शहरात सातत्याने अशा घटना उघडकीस येत आहेत. सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सुरक्षारक्षकानेच हे नीच कृत्य केल्याने पालकांमध्ये मोठी भीती आणि चिंता निर्माण झाली आहे. या ताज्या घटनेमुळे मुंबईतील महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. हे ही वाचा… वारीमध्ये वारकऱ्यांसाठी गढूळ पाण्याचा पुरवठा:जाहिरातींवर कोट्यवधींची उधळपट्टी, पण वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ; विरोधकांची सरकारवर टीका पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वारकऱ्यांना पिण्यासाठी गढूळ पाणीपुरवठा केला जात असल्याचा गंभीर आरोप करत, विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “जनतेच्या करातून जमा झालेला पैसा जाहिरातींवर उधळला जातोय, पण वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या नावाने मृत्यूचा सापळा रचला जात आहे,” अशा शब्दांत काँग्रेसने सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले आहे. सविस्तर वाचा…



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले:लुधियानामध्ये बहिणीला रडतानाचा व्हिडिओ पाठवला, म्हणाली- मला घेऊन जा; इंस्टाग्रामवरून...

0
लुधियानामध्ये बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले आहे. त्याने गर्लफ्रेंडला आपल्या ताब्यात ठेवले आहे. अल्पवयीन मुलगी वारंवार आपल्या बहिणीला व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ आणि ऑडिओ मेसेज...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांचा ताण कमी होईल, तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल

0
रविवार, 12 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांच्या घरी पाहुणे आल्याने लगबग राहील. वृषभ राशीच्या लोकांना जुन्या मतभेदातून दिलासा मिळू शकतो. मिथुन राशीचे लोक...

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...
spot_img

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...
error: Content is protected !!