संक्रमण शिक्षक 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु या ग्रहांचा गुरू अशी उपाधी देण्यात आली आहे. तर गुरु हा ज्ञान, प्रगती, शिक्षक, मुलं, शिक्षण, धन, दान आणि पुण्य याच्याशी संबंध आहे. त्यामुळे गुरुची स्थिती ही मानवी जीवनासाठी अतिशय महत्त्वाची ठरते. सध्या गुरु ग्रह मिथुन राशीत भ्रमण करत आहे आणि आता ऑक्टोबर महिन्यात तो चंद्राच्या राशीत कर्क राशीत प्रवेश करणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा गुरू ग्रह त्याच्या उच्च राशी कर्कमध्ये प्रवेश करतो तेव्हा तो काही राशींसाठी खूप भाग्यशाली ठरतो. या काळात, 3 भाग्यवान राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये बढती मिळते. कोणत्या आहेत त्या 3 भाग्यवान राशी जाणून घेऊयात. (Guru Gochar 2025 In Kark People of these 3 zodiac signs will suddenly gain immense wealth honor and respect Guru Transit)
तूळ रास
या राशीच्या लोकांसाठी, कर्क राशीत गुरूचे भ्रमण शुभ सिद्ध होणार आहे. नोकरी आणि व्यवसायातच या लोकांना फायदाच फायदा मिळणार आहे. तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर मिळण्याचे दाट संकेत आहे. तुमच्या कामाचे कौतुक होणार असून बढतीचे मार्ग खुले होणार आहेत. या काळात लोकांचा कल उपासनेकडे अधिक राहणार आहे. अचानक आर्थिक लाभ तुम्हाला सुखद धक्का देणार आहे.
वृश्चिक रास
गुरु ग्रह चंद्राच्या राशीत प्रवेश करत असल्याने, वृश्चिक राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ पावलपावली मिळणार आहे. त्या व्यक्तीचे प्रलंबित काम पूर्ण होणार आहे. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग या काळात असणार आहे. नोकरी बदलण्याचे किंवा उच्च पद मिळविण्याचे प्रयत्न यशस्वी होणार आहे. मालमत्तेशी संबंधित प्रकरणे मार्गी लागणार आहे. नवीन गुंतवणुकीतून नफा मिळणार असून पण सल्ल्याशिवाय निर्णय घेऊ नका.
धनु रास
या राशीच्या लोकांना कर्क राशीत गुरूच्या भ्रमणाचा फायदा प्राप्त होणार आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदीने भरलेले असणार आहे. तुमच्या जोडीदारासाठी प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येणार आहे. एखादी व्यक्ती वाहन किंवा स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. मान-सन्मानात वाढ होणार आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
































