Homeमहाराष्ट्रAmit Shah Reaction On Pm Narendra Modi Over Operation Sindoor | India...

Amit Shah Reaction On Pm Narendra Modi Over Operation Sindoor | India Pak War | मोदींनी एक चुटकी सिंदूरचे महत्त्व जगाला दाखवले: भारताचा GDP 10 व्या क्रमांकावरून 4 क्रमांवर आणला, अमित शहा यांचा मुंबईत दावा – Mumbai News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक चुटकी सिंदूरचे महत्व जगाला दाखवून दिले. पाकविरोधातील कारवाईनंतर सिंदूर हा शब्द जगभरात सर्च केला गेला. पण अजूनही काही लोकांना सिंदूरचे महत्व कळले नाही, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शह

?

अमित शहा यांनी मंगळवारी मुंबईच्या माधवबाग येथील लक्ष्मी नारायण मंदिराच्या 150 व्या उत्सवाला हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरसह वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, काही जण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केले? असा प्रश्न करतात. तर मोदींनी जीडीपी 10 क्रमांकावरून 4 नंबरवर आणला. आपली सुरक्षा भेदण्याचा करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यांच्या नेतृत्वात देशाची सुरक्षा भक्कम झाली आहे. आपण अतिरेक्यांना जशास तसे प्रत्युत्र दिले. मला फ्रेन्च डिप्लोमॅट भेटले. मी त्यांना मागील 10 वर्षांत काय बदलले असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी मोदींनी भारताच्या पासपोर्टची किंमत वाढवल्याचे सांगितले.

सध्या कोणत्याही देशात जा, आपले हसत-हसत स्वागत होते. मोदींनी 550 वर्षांपासून तंबूत राहणाऱ्या प्रभू श्रीरामांना मंदिरात आणले. काशी विश्वेश्वर कॉरिडोर बनावला. योग व आयुर्वेद जगभरात पोहोचवला. हे सर्व परिवर्तन मोदींनी केले.

काही लोकांना सिंदूरचे महत्व कळलेच नाही

अमित शहा यांनी ऑपरेशन सिंदूरवरही भाष्य केले. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मोदींनी एक चुटकी सिंदूरचे महत्व संपूर्ण जगाला दाखवले. त्यानंतर गुगलवर सिंदूर हा शब्द सर्वाधिकवेळा सर्च केला गेला. तब्बल 10 कोटी लोकांनी हा शब्द सर्च केला. पण त्यानंतरही काही लोकांना सिंदूरचे महत्व अद्याप कळाले नाही, असे ते म्हणाले.

लक्ष्मी नारायण ट्रस्टचे केले कौतुक

अमित शहा यांनी लक्ष्मी नारायण मंदिराच्या ट्रस्टींचेही कौतुक केले. ते म्हणाले, एखादी संस्था तब्बल 150 वर्षे चालवणे सोपी गोष्ट नाही. मी जुन्या संस्था चालवल्या आहेत. पण इथे मुंबईत एवढी मोठी संस्था चालवणे सोपे नाही. त्यामुळे माधवबागच्या ट्रस्टींचे मी कौतुक करतो.1875 साली इंग्रजांच्या काळात मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी एखादी धार्मिक संस्था उभी करणे निश्चितच सोपे नव्हते. अनेकांना माहिती नसेल पण माझा जन्म मुंबईचा आहे. मी या मंदिरात अनेकदा आरतीसाठी येत होतो. त्यावेळी येथे एक वाडा होता. एक हॉल होता. तिथे कमी पैशात लग्न लावले जात होते. त्यासाठी ही संस्था मदत करत होती. या दीडशे वर्ष जुन्या संस्थेने शेकडो मध्यमवर्गीयांच्या अडचणी दूर केल्या, असे ते म्हणाले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पावसाळ्यात वाढतात कीटक आणि झुरळे:10 खबरदारी घेतल्यास कीटक येणार नाहीत, तज्ञांकडून जाणून घ्या पळवून...

0
उन्हाळ्यानंतर पावसाळा दिलासा घेऊन येतो, पण या ऋतूत आर्द्रता आणि ओलसरपणा वाढतो आणि जागोजागी पाणी साचते. कीटकांच्या वाढीसाठी या परिस्थिती अनुकूल आहेत. यामुळेच...

लोणावळ्यात भीषण भूस्खलन:मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती, युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू

0
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, पूरपरिस्थिती, झाडे पडणे आणि घरे कोसळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत....

कृती सेननने ‘मिमी’ चित्रपटाच्या वेळी एग्स फ्रीज केले:म्हणाली- लग्न किंवा मुले स्वतःच्या इच्छेने व्हायला...

0
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने खुलासा केला आहे की, तिने तिच्या 'मिमी' चित्रपटाच्या तयारीदरम्यान तिची अंडी (एग्स) फ्रीज केली होती. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या...

मोदींचा इंडोनेशियातून चीनला कठोर संदेश:म्हटले- भारत स्वतंत्र इंडो-पॅसिफिकचा समर्थक; इंडोनेशियाचे राष्ट्रपती म्हणाले- मी मोदींच्या...

0
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'भारत इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांततेचा पुरस्कर्ता आहे. सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करावे आणि सागरी मार्ग सर्वांसाठी खुले असावेत.' मोदींचे हे...
spot_img

पावसाळ्यात वाढतात कीटक आणि झुरळे:10 खबरदारी घेतल्यास कीटक येणार नाहीत, तज्ञांकडून जाणून घ्या पळवून...

0
उन्हाळ्यानंतर पावसाळा दिलासा घेऊन येतो, पण या ऋतूत आर्द्रता आणि ओलसरपणा वाढतो आणि जागोजागी पाणी साचते. कीटकांच्या वाढीसाठी या परिस्थिती अनुकूल आहेत. यामुळेच...

कृती सेननने ‘मिमी’ चित्रपटाच्या वेळी एग्स फ्रीज केले:म्हणाली- लग्न किंवा मुले स्वतःच्या इच्छेने व्हायला...

0
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने खुलासा केला आहे की, तिने तिच्या 'मिमी' चित्रपटाच्या तयारीदरम्यान तिची अंडी (एग्स) फ्रीज केली होती. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या...

टाटा ग्रुपमध्ये नवीन पिढीला कमान सोपवण्याची रणनीती:नोएल टाटा यांची मुलगी माया रिटेल चेन ‘वेस्टसाइड’चा...

0
टाटा ग्रुपची फॅशन रिटेल चेन 'वेस्टसाइड'च्या ई-कॉमर्स मार्केटिंगची धुरा नोएल टाटा यांची कन्या माया टाटा (37 वर्षे) सांभाळतील. सोमवारी झालेल्या या बदलाचा उद्देश...

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...
error: Content is protected !!