Homeमहाराष्ट्रपुण्यात हुंड्यावर वैष्णवी हागावणे यांच्या मृत्यूनंतर मराठा समुदाय बैठक

पुण्यात हुंड्यावर वैष्णवी हागावणे यांच्या मृत्यूनंतर मराठा समुदाय बैठक


Maratha Community Meeting over Vaishnavi Hagawane: जमीन खरेदीसाठी माहेरहून दोन कोटी रुपये आणावेत यासाठी झालेल्या मानसिक आणि शारिरीक छळामुळे वैष्णवी हगवणेला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. तसंच यानिमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हुंडाबळीची प्रथा चर्चेत आली आहे. वैष्णवीच्या कुटुंबाने हगवणे कुटुंबाला लग्नात 51 तोळं सोनं, फॉर्च्यूनर गाडी आणि चांदीची भांडी दिली होती. यानंतरही दोन कोटींच्या जमिनीसाठी तिचा छळ करण्यात आला. दरम्यान याप्रकरणी पुण्यात मराठा समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली असून, यावेळी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाजातील बांधवाची महत्वाची बैठक पार पडली. पुण्यातील शांताई हॉटेलमध्ये मराठा बांधवांची बैठक झाली. यावेळी वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या लग्न सोहळ्यात होणारी प्रथा परंपरा यावर चर्चा झाली. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मराठा समाजाचे नेते बैठकीला उपस्थित होते.

पुण्यातला मराठा समाज यापुढे कोणताही रोटी बेटी व्यवहार करणार नाही, असा ठराव पुण्यातील मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसंच अनेक समाजहिताचे निर्णय घेण्यात आले. लग्न करताना काही तरी आचारसंहिता असावी असं मत मांडण्यात आलं. समाज म्हणून आपल्याला या ठिकाणी एकत्र यावे लागेल. मुहूर्त वर लग्न लागत नाही, ते वेळेवर लागेल याचा प्रयबत केला पाहिजे असंही सांगण्या आलं.

मराठा समाजात धाक नाही. मराठा समाजाने परीक्षण करण्याची गरज आहे. समाजाची बदनामी होते आहे. जाणीव पूर्वक मराठा समाज टार्गेट होतो आहे का? विशिष्ट एका पक्षाला, जातीला टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे. मराठा समाज हगवणे यांनी केलेल्या कृत्याचं समर्थन करणार नाही. ही जी घटना झाली एका समाजातच होत नाही, सर्व समाजात ही वृत्ती आहे. समाजाला टार्गेट करायंच्यागे काम चालू आहे अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.

लग्नाचे प्रदर्शन होत आहे. मराठा समाज मस्तवाल आहेत असे चित्र उभे केले जाते. राजकीय मराठी लोकांनी पक्षाची कवाडे बाजूला ठेवून एकत्रित आले पाहिजे. समाज संस्था म्हणून आपण काम केलं पाहिजे. मीडियातून मराठा समाजाची सध्या बदनामी सुरू आहे आचारसंहिता करताना सुनांनी कसं वागायचं, नंदाने कस वागायचं हे शिकवा. विश्वास व्यक्त करायला हवा मुलीला शिकवा. तिला स्वतःच्या पायावर उभे करा असं सांगण्यात आलं.

दुसऱ्याने मोठे लग्न केले म्हणून आपण पण केले पाहिजे हा हट्ट नको, प्री-वेडिंग शूट म्हणजे अतिशय घाणेरडे प्रवृत्ती आहे. मुलीला शिकवा,तिला तुम्ही विश्वास द्या आई वडील भाऊ आम्ही सोबत आहोत.मराठा समाजातील एका वर्गाला समज नसून माज आला आहे हे आज मान्य करायला हवं.लग्न टीळे याचा राजकीय करण झालं आहे. पुणे शहरातील काही गावे तिथं तुम्ही मांडव टाकायला आठ वीस लाख देतात. पुण्यात वीस लाखाच्या आत लग्नच होत नाही. भाषणबाजी बंद करा,लग्न कमी वेळेत आणि कमी लोकात करा,कमी खर्चात करा.साखरपुडा हळद एकत्रीत केलं जावे. शाहू महाराज म्हटले होते जमीन विकून मुलीचे लग्न करू नका अशी आठवण करुन देण्यात आली.

अल्पशिक्षित मुलाचा लग्नाचा मोठा प्रश्न आहे. आम्ही कसेही लग्न करायला तयार आहोत, हुंडा द्यायला तयार आहोत असं सांगितलं आहे. मुलीच्या अपेक्षा वाढल्या आहे 25 टक्के मुलाचे लग्न होणार नाही हा प्रश्न आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘ताजमहाल तेजोमहालय मंदिर होते का’:अलाहाबाद हायकोर्टाने केंद्र- ASI ला उत्तर मागितले; सर्वेक्षण आयुक्त नियुक्तीच्या...

0
अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी ताजमहालमध्ये तेजो महालय मंदिर असल्याच्या याचिकेवर सुनावणी केली. त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी वकील आयोग (एडवोकेट कमिशन) नियुक्त करण्याच्या मागणीवर केंद्र...

ट्रस्टच्या वादातून साधूची फसवणूक; फसवणुकीची कथा

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक लोककथा आहे. जुन्या काळात एका गावातील मंदिरात एक साधू राहत होता. तो आपल्या तपस्या, शिस्त आणि साधेपणासाठी प्रसिद्ध होता....

जादूटोण्याची भीती घालून महिलेवर बलात्कार अन् जबरदस्तीने विवाह:मुलासह महिलेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, दारणा...

0
धंद्यात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी संशयित भोंदूबाबा...

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...
spot_img

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...
error: Content is protected !!