छत्रपती संभाजीनगर शहरात मागील काही दिवसांत पडलेले दरोडे आणि झालेल्या चोऱ्यांत काही पोलिसांचा सहभाग असल्याचा खळबळजनक दावा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे पोलिस वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. गत काही दिवसांत शहरात प
?
संजय शिरसाट पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, गत काही दिवसांत शहरातील गजबजलेल्या वसाहतींमध्ये दरोडे पडत आहेत. यामुळे शहरातील रहिवाशांमध्ये दहशत पसरली आहे. गंभीर म्हणजे काही दरोड्यांत पोलिसांचा सहभाग असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत. जे काही दरोडेखोर व चोर आहेत ते असे कृत्य करण्यासाठी एकदम तयार होत नाहीत. त्यांच्यामागे एक साखळी असते. ही साखळी शोधून काढण्याचे निर्देश मी पोलिस आयुक्तांना दिलेत.
पोलिस आयुक्तांनी फेटाळले आरोप
दुसरीकडे, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी संजय शिरसाट यांचा दावा फेटाळून लावला आहे. सातारा पोलिस ठाण्यातील एका अपहरण प्रकरणात शिरसाट नामक अनुपस्थित पोलिस कर्मचाऱ्याचा सहभाग दिसताच सेवेतून त्याला 15 दिवसांत सेवेतून बडतर्फ करण्यात आले. बाकी, अन्य कोणत्याही गुन्ह्यांत अद्याप तरी पोलिसांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे सहभाग किंवा नाव असल्याचा पुरावेदेखील नाहीत किंवा तसे निष्पन्नही झालेले नाही. बहुतांश घरफोडी, दरोड्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरित गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत; पण अशा कुठल्याही गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग नाही. तसे आढळून आल्यास आमची “नो टॉलस्न्स” भूमिका आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही, असे ते म्हणाले.
पालकमंत्र्यांचा ठाकरे गटावरही निशाणा
संजय शिरसाट यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरही निशाणा साधला. ठाकरे गटाने शहरात विविध ठिकाणी बॅनरबाजी केली आहे. यावर भाष्य करताना शिरसाट म्हणाले, केवळ बॅनर लावल्यामुळे पक्षसंघटना बळकट होत नाही. त्यासाठी गळती थांबवावी लागते. एकटे जावे लागेल म्हणून ते अशी बॅनरबाजी करत आहेत. या प्रकरणी त्यांनी पक्षांतर्गत गटबाजीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
राज व उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत -शिरसाट
संजय शिरसाट यांनी यावेळी राज व उद्धव ठाकरे एकत्र येणार नसल्याचाही दावा केला. राज व उद्धव ठाकरे एकत्र येऊ तर द्या. आम्ही त्यांचे स्वागतच करू. पण त्यांच्यातील विस्तव असणारे बाकीचे लोक आहेत. त्यामुळे त्यांचे एकत्र येणे, या केवळ चर्चा आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज्य महिला आयोगाला अधिक सक्षमपणे काम करण्याचाही सल्ला दिला.
































