Homeमहाराष्ट्रCentral Government Exteds Tur Procurement Till May 28 | तूर खरेदीला केंद्र...

Central Government Exteds Tur Procurement Till May 28 | तूर खरेदीला केंद्र सरकारकडून 28 मे पर्यंत मुदतवाढ: पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती, 7 हजार 550 रुपये मिळतोय हमीभाव – Mumbai News

राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता पीपीएस अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीस आता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 28 मे 2025 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. यामुळे राज्यातील

?

राज्यात तूर खरेदीची मुदत 13 मे 2025 पर्यंत देण्यात आली होती. तूर उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता तूर खरेदीची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्र सरकारकडे केली होती. तसा प्रस्ताव पणन विभागाकडून केंद्रीय कृषी आणि कल्याण मंत्रालयाला पाठविण्यात आला होता. या मागणीची दखल घेत ही मुदत 28 मे 2025 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे.

राज्यात 1 लाख 37 हजार 458 शेतकऱ्यांची तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी झालेली असून त्या पैकी 13 मे 2025 पर्यंत 69 हजार 189 शेतकऱ्यांकडून 1 लाख 2 हजार 951 मेट्रिक टन तूर खरेदी झालेली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खरेदी प्रक्रियेसाठी 90 दिवसांची मुदत 13 मे 2025 रोजी संपली होती. उर्वरित नोंदणीकृत शेतकऱ्यांची तूर हमीभावाने खरेदी होण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी होती.

केंद्र सरकारने राज्याला सन 2024-25 हंगामात पीपीएस अंतर्गत 2 लाख 97 हजार 430 मेट्रिक टन तूर खरेदीला मंजुरी दिलेली आहे. त्याकरिता नाफेड व एनसीसीएफ या केंद्रीय नोडल संस्थांच्या माध्यमातून राज्यातील आठ राज्यस्तरीय नोडल संस्थांमार्फत 764 खरेदी केंद्र राज्यात कार्यान्वित आहेत.

राज्यात नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून 7 हजार 550 रुपये हमीभावाने तुरीची खरेदी चालू आहे. सध्या बाजारात तुरीचे दर कमी असल्याने हमीभावाचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. यासाठी उर्वरित शेतकऱ्यांची तूर हमीभावाने खरेदी होण्यासाठी तूर खरेदीला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली होती.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

काँग्रेसमध्ये कोणतीही गटबाजी नाही, सर्वजण एकत्र दिसतील:वडिंग म्हणाले- चन्नी, बाजवा, रंधावा आमचे वरिष्ठ; मुख्यमंत्रीपदाचा...

0
काँग्रेस हायकमांडने 2027 च्या विधानसभा निवडणुकांसाठी पंजाबमधील नेत्यांच्या भूमिका निश्चित केल्या आहेत. मात्र, यानंतर पक्षात गटबाजीच्या चर्चांनी जोर धरला. काही नेते प्रदेश काँग्रेस...

केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे निधन

0
लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या करण्यात आलेले प्रसिद्ध तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांच्या कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे. केतनचे आजोबा देवीचंद...

TMC पश्चिम बंगालच्या अध्यक्षा चंद्रिमा भट्टाचार्य यांचा राजीनामा; ममता बॅनर्जींचे विधान

0
मराठी बातम्याराष्ट्रीयTMC पश्चिम बंगालच्या अध्यक्षा चंद्रिमा भट्टाचार्य यांचा राजीनामा; ममता बॅनर्जींचे विधानकोलकाता21 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातृणमूल काँग्रेस (TMC) च्या ज्येष्ठ नेत्या चंद्रिमा भट्टाचार्य यांनी...

शुक्राचे राशी परिवर्तन आज:शुक्रासाठी शिवपूजा आणि दुधाचे दान करा, जाणून घ्या 1 ऑगस्टपर्यंतचा काळ...

0
आज (4 जुलै) दुपारी सुमारे 4 वाजता शुक्र राशी बदलून सिंह राशीत येईल. त्यानंतर हा ग्रह 1 ऑगस्टपर्यंत याच राशीत राहील. शुक्र वृषभ...
spot_img

वैभव सूर्यवंशीने सचिन-शेफालीचा विक्रम मोडला:15 वर्षे, 99 दिवसांत भारतासाठी पदार्पण केले; सामन्यापूर्वी दिले होते...

0
वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. तो १५ वर्षे ९९ दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत...

हेवी वर्कआउट स्ट्रेस हार्मोन वाढवतो? याचे विज्ञान जाणून घ्या:मानसिक आरोग्य व्यायामादरम्यान कॉर्टिसोलची पातळी वाढणे...

0
अनेकदा असे म्हटले जाते की हेवी वर्कआउट किंवा लांबच्या व्यायामामुळे शरीरातील कॉर्टिसोल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन धोकादायक पातळीपर्यंत वाढतो. याच कारणामुळे अनेक लोक याला...

इंद्रेश मलिक हीरामंडी स्टार; पिरॅमिड स्कीम घोटाळ्यातील बळीची कहाणी

0
36 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा‘हीरामंडी’ मधील उस्ताद जी आणि ‘द पिरामिड स्कीम’ मधील अभिनयामुळे चर्चेत आलेले इंद्रेश मलिक यांनी दिव्य मराठीशी बोलताना त्यांच्या करिअर,...

व्हॉट्सॲपच्या युझरनेम वैशिष्ट्यावर सरकारची बंदी:गोपनीयता वाढवणारे वैशिष्ट्य होते, चॅटिंग स्मार्ट झाली असती; थांबवण्याचे कारण...

0
व्हॉट्सॲप लवकरच इंस्टाग्राम आणि टेलिग्रामप्रमाणे युझरनेम फीचर आणणार होते. यामुळे लोक मोबाईल नंबर शेअर न करता एकमेकांना मेसेज करू शकतील. मात्र, सुरक्षेच्या चिंतेमुळे...
error: Content is protected !!