Homeमहाराष्ट्रCongress Leader Son Goes Missing a Day Before Wedding in Amravati |...

Congress Leader Son Goes Missing a Day Before Wedding in Amravati | सामान घ्यायला घराबाहेर पडला, तो परतलाच नाही: लग्नाच्या आदल्या दिवशी काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता, अमरावतीत खळबळ; शोधाशोध सुरू – Amravati News

अमरावती जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. लग्नाच्या आदल्या दिवशीच नवरदेव मुलगा बेपत्ता झाल्याची घटना घडल्याने संपूर्ण शहरात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, हा तरुण अमरावतीतील काँग्रेस नेते हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा आहे. वैभव मोहोड (वय 30)

?

मिळालेल्या माहितीनुसार, उद्या लग्न असलेल्या काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता झाल्याने अमरावतीत खळबळ उडाली आहे. वैभव याचे लग्न 14 मे रोजी होणार होते. परंतु लग्नाच्या एक दिवस आधीच, म्हणजे मंगळवारी 13 मे सकाळपासून तो बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी वडील हरिभाऊ मोहोड यांनी अमरावतीतील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी मिसिंगची नोंद केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, वैभव मोहोड हे शिवाजी महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सकाळी “सामान घेऊन येतो” असे सांगून ते घराबाहेर पडला. मात्र त्यानंतर ते घरी परतलाच नाही. बराच वेळ घरी परत न आल्याने वडिलांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. वैभवने सकाळीच एटीएममधून 40 हजार रुपये काढले होते. तसेच तो घरातून बाहेर पडताना सुमारे 90 हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन गेला असल्याचेही समजते. या प्रकरणाचा अधिक तपास फ्रेजरपुरा पोलिस करत आहेत.

कोण आहेत हरिभाऊ मोहोड?

हरिभाऊ मोहोड हे जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. त्यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिवपदी देखील करण्यात आली होती. हरिभाऊ मोहोड हे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे कट्टर समर्थक मानले जातात. अभ्यासू नेते म्हणून हरिभाऊ मोहोड यांची ओळख आहे. ऐन लग्नाच्या एक दिवस अगोदर मोहोड यांचा मुलगा बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमरावती पोलिसांनी वैभव मोहोड यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शबरीमाला सोने प्रकरण- माजी टीडीबी प्रमुखांविरुद्ध पुरावे मिळाले:केरळम हायकोर्टाने SIT ला नवीन गुन्हा दाखल...

0
केरळममधील शबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणात एसआयटीने दावा केला आहे की, तपासात त्रावणकोर देवस्वोम बोर्ड (TDB) चे माजी अध्यक्ष पीएस प्रशांत यांच्या विरोधात...

मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ हरपला:ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन; नाना पाटेकर, विक्रम गोखलेंना घडवणाऱ्या...

0
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला आपल्या अद्वितीय दिग्दर्शनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री विजया मेहता यांचे वयाच्या ९२ व्या...

विभागाच्या भिंती तोडणे, योजनेचा प्रभाव जमिनीवर दिसणे आवश्यक आहे

0
नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सेवा तीर्थ येथे भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी...

Gemini Financial Gains & Capricorn Promotion Likely: Tuesday Tarot Horoscope 2026

0
15 तासांपूर्वीकॉपी लिंकमंगळवार, 30 जून रोजी मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिक निर्णय फायदेशीर ठरतील आणि समाजात त्यांचा मान वाढेल. कन्या राशीच्या लोकांना नवीन भागीदाराकडून...
spot_img

‘नेट बॉलर’ पासून ‘मॅच विनर’ पर्यंत:भारतीय वंशाच्या जयने आयर्लंडसाठी 5 बळी घेतले; कधीकाळी टीम...

0
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील जय मुंदडाने रविवारी संपलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडकडून खेळताना भारताच्या विरोधात पाच बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या...

वॉशिंग मशीन बाल्कनीमध्ये ठेवणे योग्य आहे का?:जाणून घ्या देखभाल टिप्स, 12 खबरदारी, किती दिवसांनी...

0
वॉशिंग मशीन आज जवळपास प्रत्येक घराची गरज बनली आहे. बहुतेक घरांमध्ये ती तुम्हाला बाल्कनीमध्ये ठेवलेली दिसेल. लोक जागा वाचवण्यासाठी असे करतात. हे सोयीचे...

‘आवारापन 2’ चा टीझर प्रदर्शित:चित्रपट 14 ऑगस्ट रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल

0
सुमारे दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर, इम्रान हाश्मी अभिनित 'आवारापन 2' या चित्रपटाने अखेर आपली पहिली झलक प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. कल्ट चित्रपट 'आवारापन'चा वारसा...

Bajaj Pulsar N125 भारतात बंद

0
नवी दिल्ली1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराबजाज ऑटोने भारतात आपली पल्सर N125 बाईक बंद केली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये लॉन्च झालेली ही बाईक भारतीय बाजारात...
error: Content is protected !!