Homeदेश-विदेशछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास मनपाकडून खोडा; मराठी समाज आक्रमक

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास मनपाकडून खोडा; मराठी समाज आक्रमक


छत्रपती शिवाजी महाराज पुतळा: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. औरंगजेब नव्हे, छत्रपती शिवाजी महाराज ही आपली ओळख आणि अस्मिता आहे, अशी भूमिका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सातत्याने घेत असतात. त्यांनी 2023 साली लखनऊमध्ये चौक चौराहमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास परवानगी दिली. पण 2025 हे वर्ष संपत आलं तरीही या चौक चौराहमध्ये पुतळा उभारण्यात आलेला नाही. सरकारने अनुमती दिल्यानंतर तेथे पुतळा उभारण्याचे काम सुरु झाले. असे असूनही पालिकेने तेथे कवी अमृतलाल नागर यांचा पुतळा उभारण्याचा घाट घातला आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

लखनऊच्या मध्यवर्ती चौकात अनावरण होऊ घातलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12.5 फूट पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात येणार होती. मात्र लखनऊ महापालिकेच्या आडमुठ्या आणि अडेलतट्टू भूमिकेमुळे शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी अडचणीत आलीय.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची सर्व सिद्धता पूर्ण झाल्यानंतर पालिकेने आता विरोध केल्याने मराठी भाषिक समाज संतप्त व्यक्त करण्यात येते आहे. आमचा अमृतलाल नागर यांच्या पुतळ्याला विरोध नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची पूर्ण तयारी झाल्यानंतर पालिकेने जी भूमिका बदलली आहे, त्याला आहे. हा केवळ मराठी भाषिकांचा अवमान नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचाही अपमान आहे, अशी भावना मराठी समाज उत्तर प्रदेश संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश कुमार पाटील यांनी व्यक्त केलीय.

उमेश कुमार पाटील यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी लखनऊ विद्यापिठाच्या शिवाजी क्रीडांगणात साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाची सुरुवात 19 फेब्रुवारी 2018 रोजी झाली आहे.

या ऐतिहासिक शोभायात्रेची सुरुवात चौक चौराह येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या लहानशा प्रतिमेवर दुग्धाभिषेक करून केली जाते. आता चौक चौराह येथे भव्य प्रतिमा उभारल्यामुळे, चौक चौराहापासून विद्यापीठापर्यंत होणाऱ्या शोभायात्रेच्या प्रारंभीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर दरवर्षी पूजा, सजावट आणि माल्यार्पण करता येईल. यामुळे समाजाला त्यांचे शौर्य, सामर्थ्य आणि पराक्रमाची प्रेरणा मिळेल आणि समाजात नवी ऊर्जा आणि जागरूकता निर्माण होईल.

FAQ

प्रश्न 1: ही घटना कशाबाबत आहे?
उत्तर: उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने २०२३ मध्ये लखनऊच्या चौक चौराह येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास अनुमती दिली होती. पण लखनऊ महानगरपालिकेने (LMC) आता कवी अमृतलाल नागर यांचा पुतळा उभारण्याचा घाट घातला आहे, ज्यामुळे मराठी समाज संतप्त झाला आहे.

प्रश्न 2: चौक चौराहा परिसर का महत्त्वाचा?
उत्तर: या परिसरात मराठी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी सातत्याने होत होती. अनुमती मिळाल्यानंतर काम सुरू झाले, पण आता पालिकेच्या बदललेल्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला.

प्रश्न 3: मराठी समाजाचा विरोध कशाला?
उत्तर: मराठी समाज उत्तर प्रदेश संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश कुमार पाटील यांनी सांगितले की, अमृतलाल नागर यांच्या पुतळ्याला विरोध नाही, पण पूर्ण तयारीनंतर पालिकेच्या भूमिका बदलण्याला आहे. हा मराठी भाषिकांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...
spot_img

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
error: Content is protected !!