Homeदेश-विदेशलग्नाच्या रात्रीनंतर 75 वर्षांचा माणूस मरण पावला 35 वर्षांची महिला जौनपूर

लग्नाच्या रात्रीनंतर 75 वर्षांचा माणूस मरण पावला 35 वर्षांची महिला जौनपूर


मराठी मधील ट्रेंडिंग बातम्या: उत्तर प्रदेशच्या जौनपुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक 75 वर्षांच्या वृद्धाने 35 वर्षांच्या महिलेसोबत लग्न केले. मात्र लग्नानंतर मधुचंद्रानंतर त्याचा अचानक मृत्यू झाला आहे. वृद्धाच्या मृत्यूनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर गावातदेखील एकच चर्चा रंगली आहे. गौरा बादशाहपुर ठाणे क्षेत्रातील हे प्रकरण असून गावाचे नाव कुछमुछ असं आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

संगरु राम नावाच्या व्यक्तीच्या पत्नीचे निधन एक वर्षापूर्वी झाले होते. संगरु राम यांना मुलं नव्हती. ते एकटचे राहायचे. शेती करुन ते त्यांचा उदरनिर्वाह करत होते. तर, त्यांचे भाऊ आणि त्यांची मुलं दिल्लीत वास्तव्यास होती. तिथे त्यांचा व्यवसाय आहे.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगरु राम हे गेल्या काही दिवसांपासून दुसरं लग्न करण्याबाबत बोलत होते. मात्र गावातील लोकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. वय जास्त झाल्यामुळं त्यांनी लग्न करु नये असा सल्ला दिला. मात्र तरीही ते ऐकले नाहीत. सोमवारी त्यांनी जलालपूर येथे राहणाऱ्या 35 वर्षीय मनभावती हिच्याशी कोर्ट मॅरेज केले. तसंच, मंदिरातही लग्न केले.

मनभावती हिचेदेखील हे दुसरं लग्न होते. तिला पहिल्या लग्नापासून दोन मुली आणि एक मुलगा आहे. मनभावतीने दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या आधी संगरूने तिला म्हटलं होतं की तु फक्त माझं घर सांभाळ, मी तुझ्या मुलांची जबाबदारी घेतो. लग्नानंतर आम्ही रात्रभर गप्पा मारत बसलो होतो. सकाळी त्यांची तब्येत अचानक बिघडली. तेव्हा त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली होती. संगरू रामचे भाचे यांनीमात्र संशयास्पद मृत्यू झाल्याचा दावा करत अत्यंसंस्कार थांबवलण्यात आले होते. या प्रकरणी पोलिस या भूमिका घेतात आणि संगरू राम यांच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवणार का? असा सवाल सध्या गावात उपस्थित होत आहेत. संगरू यांचा मृत्यू नेमका कशा मुळं झाला हे मात्र अद्याप समोर आले नाहीये. त्यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

FAQ

प्रश्न १: ही धक्कादायक घटना कुठे घडली?

उत्तर: ही घटना उत्तर प्रदेशच्या जौनपुर जिल्ह्यातील गौरा बादशाहपुर ठाणे क्षेत्रातील कुछमुछ गावात घडली आहे.

प्रश्न २: संगरु राम कोण होते आणि त्यांची पार्श्वभूमी काय?

उत्तर: संगरु राम हे ७५ वर्षांचे वृद्ध होते. त्यांची पत्नी एक वर्षापूर्वी निधन पावली होती. त्यांना मुलं नव्हती आणि ते एकटे राहत होते. शेती करून उदरनिर्वाह चालवत होते. त्यांचे भाऊ आणि भाचे दिल्लीत व्यवसाय करत राहतात.

प्रश्न ३: महिलेचे नाव आणि तिची पार्श्वभूमी काय?

उत्तर: महिलेचे नाव मनभावती आहे आणि ती ३५ वर्षांची आहे. तिचे हे दुसरे लग्न होते. पहिल्या लग्नातून तिला दोन मुली आणि एक मुलगा आहे. ती जलालपूर येथे राहते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!