Homeदेश-विदेशएनटीपी -25 मराठी बातम्यांच्या दूरसंचार क्षेत्रात 10 लाख नवीन रोजगार

एनटीपी -25 मराठी बातम्यांच्या दूरसंचार क्षेत्रात 10 लाख नवीन रोजगार


दूरसंचार क्षेत्रातील नोकर्‍या: चांगल्या पगाराची सरकारी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण टेलिकॉम क्षेत्रात आतापर्यंतची सर्वात मोठी भरती होणार आहे. यातून देशभरातील 10 लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे. भारत सरकारने राष्ट्रीय टेलिकॉम धोरण 2025 (NTP-25) चा मसुदा प्रसिद्ध केलाय. ज्यामुळे टेलिकॉम क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडणार आहेत. भारताला डिजिटल क्षेत्रात जागतिक स्तरावर एक मजबूत आणि स्वावलंबी राष्ट्र बनवणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे देशातील डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारण्याबरोबरच आर्थिक विकास, तांत्रिक नवोन्मेष आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. या धोरणांतर्गत 2030 पर्यंत 10 लाख नवीन नोकऱ्या निर्माण करणे आणि दरवर्षी 1 लाख कोटी रुपये गुंतवणूक आकर्षित करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

NTP-25 ची प्रमुख उद्दिष्टे काय?

प्रत्येक भारतीय नागरिकाला जलद, सुरक्षित आणि परवडणारी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे हे NTP-25 चे प्रमुख उद्दीष्ट आहे. 90% लोकसंख्येपर्यंत 5G नेटवर्क आणि 10 कोटी घरांपर्यंत फिक्स्ड ब्रॉडबँड सुविधा पोहोचवण्याचे लक्ष्य असून भारतनेट योजनेअंतर्गत सर्व ग्रामपंचायतींना फायबर ऑप्टिक नेटवर्कने जोडणे आणि 10 लाख पब्लिक वाय-फाय हॉटस्पॉट्स स्थापन केले जाणार आहेत.सध्या टेलिकॉम क्षेत्राचा भारताच्या जीडीपीमधील वाटा सुमारे 7.8% आहे, जो 2030 पर्यंत 11% पर्यंत वाढवण्याचे NTP-25 चे उद्दिष्ट आहे.NTP-25 अंतर्गत टेलिकॉम उत्पादने आणि सेवांच्या निर्यातीला दुप्पट केली जाणार आहे. ज्यामुळे भारत जागतिक टेलिकॉम बाजारपेठेत एक प्रमुख खेळाडू बनू शकणार आहे.

1 लाख कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक

दरवर्षी 1 लाख कोटी रुपये गुंतवणूक आकर्षित करून टेलिकॉम क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विस्तार केला जाणार आहे. यामुळे स्थानिक उत्पादन (लोकल मॅन्युफॅक्चरिंग) ला 150% वाढवण्याचे लक्ष्य आहे, ज्यामुळे भारत टेलिकॉम उत्पादनांचे जागतिक केंद्र बनणार आहे. 5G, 6G, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), क्वांटम कम्युनिकेशन, सॅटेलाइट नेटवर्क आणि ब्लॉकचेन यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानात भारताला जागतिक स्तरावर टॉप 10 नवोन्मेष केंद्रांपैकी एक बनवणे तसेच 6G तंत्रज्ञानात जागतिक स्तरावर 10% आयपीआर (Intellectual Property Rights) हिस्सा मिळवण्याचा टेलिकॉम क्षेत्राचा प्रयत्न असेल.

10 लाख नवीन नोकऱ्या कशाप्रकारे देणार?

डिजिटल प्रशासन, स्मार्ट सिटी, इंडस्ट्री 4.0 आणि ग्रामीण ब्रॉडबँड यासारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीमुळे 10 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे.  यामुळे अभियंते, तंत्रज्ञ, संशोधक आणि इतर कुशल व्यावसायिकांसाठी मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. भारताला टेलिकॉम उत्पादनांचे जागतिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी संशोधन, स्टार्टअप्स आणि कौशल्य विकासावर भर दिला जाणार आहे. सेमीकंडक्टर, AI प्रोसेसर आणि प्रगत SoCs (System on Chips) यांच्या निर्मितीवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. भविष्यातील उद्योगांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 1 लाख लोकांना पुन्हा प्रशिक्षित करणे आणि कौशल्य सुधारणा (स्किल अपग्रेड) केले जाणार आहे. स्टार्टअप्स, शिक्षण संस्था आणि राष्ट्रीय प्रयोगशाळांना प्रोत्साहन देण्यासाठी नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा यंत्रणा सुसज्ज असणार आहे.

सुरक्षितता आणि सायबर सुरक्षेबाबत काय धोरण?

टेलिकॉम नेटवर्कला क्वांटम आणि क्लासिकल कॉम्प्युटर हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे. AI-आधारित देखरेख आणि सायबर सुरक्षा उपायांना प्रोत्साहन दिले जात आहे. 6G तंत्रज्ञानाच्या डिझाइन, विकास आणि परिनियोजनात भारताला जागतिक नेता बनवण्याचे उद्दिष्ट असून6G ची गती 1 टेराबिट प्रति सेकंद पर्यंत असेल, जी 5G पेक्षा कित्येक पटीने जलद असणार आहे.

भारत करणार जागतिक तंत्रज्ञानाचे नेतृत्व?

राष्ट्रीय टेलिकॉम धोरण 2025 (NTP-25) हे भारताच्या डिजिटल भविष्यासाठी एक परिवर्तनकारी दृष्टिकोन आहे. 5G, 6G, AI, IoT आणि क्वांटम कम्युनिकेशन यासारख्या तंत्रज्ञानात आघाडी घेण्याचे उद्दिष्ट ठेवून, हे धोरण भारताला जागतिक टेलिकॉम क्षेत्रात अग्रेसर बनवू शकते. 10 लाख नवीन नोकऱ्या आणि 1 लाख कोटी रुपये वार्षिक गुंतवणुकीच्या लक्ष्यासह, हे धोरण आर्थिक वाढ, तांत्रिक नवोन्मेष आणि सामाजिक सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी सज्ज आहे. या धोरणामुळे भारत केवळ डिजिटल कनेक्टिव्हिटीमध्येच नव्हे, तर जागतिक तंत्रज्ञान नेतृत्वातही आपले स्थान मजबूत करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

ट्विशा प्रकरणातील आरोपी निवृत्त न्यायाधीश गिरिबाला यांच्या घरी चोरी:दागिने आणि कागदपत्रांची फाइल उचलली, पोलिसांचा...

0
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात आरोपी असलेल्या निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांच्या घरात चोर शिरले. त्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह गिरिबाला आणि त्यांचे पुत्र समर्थ...

आषाढी वारीतही असणार तुकाराम मुंढेंचे लक्ष:वारकऱ्यांना मिळणार स्वच्छ व दर्जेदार अन्न; मंत्री जयकुमार गोरेंकडून...

0
राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग सध्या जोरदार चर्चेत असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे,...

जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये पाकिस्तानी नागरिकाला अटक:LoC मधून घुसखोरी करून आत आला होता, जूनमध्ये अशी तिसरी...

0
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LoC) भारतीय लष्कराने रविवारी पाकिस्तानच्या एका घुसखोराला अटक केली. अधिकाऱ्यांच्या मते, या महिन्यात जिल्ह्यात पकडला गेलेला हा तिसरा...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांची थांबलेली कामे सुरू होतील, धनु राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून...

0
रविवार, २८ जून रोजी वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास मजबूत राहील आणि ऑफिसमध्ये त्यांच्या नेतृत्वाची क्षमता चर्चेत राहील. मकर राशीच्या लोकांचा अडकलेला प्रकल्प अचानक...
spot_img

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...

मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...

0
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...

रावणाची लंका अन् अशोक वाटिका आता कशी दिसते?:अभिनेता प्रदीप काबरा यांनी श्रीलंकेतून शेअर केली...

0
अभिनेता प्रदीप काबरा नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी 'रामायण'शी संबंधित मानल्या जाणाऱ्या स्थळांची झलक शेअर केली. त्यांनी रावणाची लंका, अशोक वाटिका,...

आयसीआयसीआय बँक टॉप गेनर; मार्केट कॅप ₹२९,५८८ कोटी वाढले

0
मुंबई2 तासांपूर्वीलिंक कॉपी करागेल्या व्यावसायिक आठवड्यात देशातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे एकूण बाजार मूल्यांकन 88,678.1 कोटी रुपयांनी वाढले आहे. या वाढीमध्ये...
error: Content is protected !!