ज्योतिष टीपा: महिलांना नटायला मुरड्याला खूप आवडतं. कानातले, गळ्यात छान हार, हातात बांगड्या आणि पायात पैंजण किंवा अँकलेट घालतात. धार्मिक शास्त्रात असं म्हणतात की, नकारात्मक शक्ती किंवा नजरदोष होऊ नये म्हणून पायात काळा धागा बांधतात. काही महिलांना प्रश्न पडतो की, पायात अँकलेटसोबत काळा धागा बांधणे योग्य आहे की अयोग्य? अँकलेट आणि काळा धागा एकत्र बांधणे यामुळे शुभ गोष्टी होतात की ते अशुभ ठरतात, काय सांगतं शास्त्र पाहूयात.
त्यांनी अॅक्लेलेट ठेवले?
सगळ्यात पूर्वी आम्ही तुम्हाला सांगतो की महिलांनी पायात अँकलेट का घालावेत. ज्योतिषशास्त्रानुसार, पायात पैंजण घालल्याने घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो. यामुळे मन आनंदी आणि आत्मविश्वासाने भरलेले राहते. पायात अँकलेट घालल्याने मानसिक ताणतणाव दूर राहण्यास मदत मिळते.
शास्त्रांनुसार, पायात घातलेले पैंजण हे चांदीचे असतात, ज्याचा परिणाम शरीराला थंडावा मिळण्यास होतो. ते पायात घातल्याने शरीरातील उष्णता संतुलित राहण्यास मदत मिळते. यामुळे पाय दुखणे, थकवा आणि सूज येणे या समस्या कमी होतात. हे नकारात्मक ऊर्जा देखील आकर्षित करत नाही.
पायात काळा धागा बांधण्याचे महत्त्व
ज्योतिषशास्त्रात, काळा धागा हा नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी एक प्राचीन उपाय सांगण्यात आला आहे. हा रंग शनि आणि राहू-केतू सारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. जेव्हा ते पायांना बांधले जाते तेव्हा त्याचा प्रभाव आणखी वाढण्यास मदत होते. यामुळे ग्रह दोष दूर होण्यास मदत होते. तसंच मनातील भीती, चिंता आणि ताण दूर करण्यास फायदा होतो, असा विश्वास आहे.
पैंजण आणि काळा धागा एकत्र बांधता येतो का?
हो, तुम्ही काळा धागा आणि पैंजण एकत्र बांधू शकता. पण लक्षात ठेवा की ज्या महिलांची राशी मेष, वृश्चिक किंवा कर्क आहे त्यांनी या दोन्ही गोष्टी एकत्र पायात घालू नयेत. असे केल्याने त्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकतं. त्यांना घरगुती समस्यांना तोंड द्यावे लागू शकतं आणि आयुष्यात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या तिन्ही राशींच्या महिलांनी काळ्या धाग्याऐवजी पायात पांढरा धागा किंवा चांदीचा ब्रेसलेट घालणे फायद्याचे ठरते. यामुळे तुमचे भाग्य उजळण्यास मदत मिळते.
(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

































