Homeमहाराष्ट्रवैष्णवी हागवणे सुसाइड प्रकरण धक्कादायक पोस्ट मोर्टेम अहवालात पुणे पोलिसांनी कोर्टासमोर

वैष्णवी हागवणे सुसाइड प्रकरण धक्कादायक पोस्ट मोर्टेम अहवालात पुणे पोलिसांनी कोर्टासमोर


वैष्णवी हागवाणे पोस्ट मोर्टेम अहवाल: मुळशीमधील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामधील आरोपी पती, सासू आणि नणंदेच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आता हे तिघेही 28 मेपर्यंत पोलीस कोठडीमध्येच राहणार आहेत. वैष्णवीचा सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे दिर सुशील राजेंद्र हगवणे, नणंद करीश्मा राजेंद्र आणि पती शशांक हगवणे हे पाचजण सध्या अटकेत आहेत. यापैकी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघेही आठ दिवस फरार होते. त्यांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालामध्ये म्हणजेच पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

नेमकं काय आहे वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात

शवविच्छेदन अहवालात समोर आलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारेच पोलिसांनी सासू, पती आणि नणंदेची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती. पोलिसांनी न्यायालयासमोर युक्तीवाद करताना शवविच्छेदन अहवालातील धक्कादायक तपशील कथन केला. वैष्णवीच्या शरीरावर मारहाणी झाल्याच्या एकूण 30 खुणा पोस्टमॉर्टमदरम्यान आढळून आल्या. वैष्णवीच्या अंगावरील जखमांपैकी 15 जखमा या तिने आत्महत्या करण्यापूर्वीच्या 24 तासांच्या आतील असल्याचं पोस्टमॉर्टम अहवालात म्हटलं असल्याचं पोलिसांनी न्यायालयात बाजू मांडताना स्पष्ट केलं.

वैष्णवीच्या अंगावरील जखमांबद्दल धक्कादायक खुलासा

वैष्णवीच्या अंगावरील जखमांपैकी एक जखम तिच्या मृत्यूच्या सहा दिवस आधीच झाली होती असं अहवालामध्ये म्हटलं आहे. वैष्णवीच्या शरीरावरील 11 जखमा या 5 ते 6 दिवसांपूर्वीच्या आहेत. या जखमांपैकी दोन जखमा या तीन ते सहा दिवसांपूर्वीच्या असल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळेच सखोल चौकशीसाठी आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी पोलिसांनी केली.

नक्की वाचा >> Vaishnavi Hagwane Case: काँग्रेस आमदाराच्या पुत्राला अटक; पण त्याचा प्रकरणाशी संबंध काय?

पोलीस या प्रश्नांची उत्तर शोधतायेत

वैष्णवीला मृत्यूच्या 24 तास आधी कधी आणि कुठे मारहाण करण्यात आली होती? कोणी ही मारहाण केली होती? नेमकं काय घडलं होतं? यासंदर्भातील तपास पोलिसांकडून केला जणार असल्याची माहिती मिळत आहे. न्यायालयाने पोलिसांची माहिती मान्य करत आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये दोन दिवसांनी वाढ केली आहे.

वैष्णवीचा मृतदेह पाहिला अन् फरार झाले

16 मे रोजी वैष्णवीने स्वत:ला संपवल्यानंतर 17 मे 2025 रोजी एन्डीव्हर कारने राजेंद्र आणि सुशील हगवणे औंध रुग्णालयात वैष्णवीचा मृतदेह पाहण्यासाठी आले होते. या प्रकरणामध्ये आपल्याला अटक होऊ शकते अशी शक्यता लक्षात येताच राजेंद्र हगवणे थोरल्या पुत्राबरोबर रुग्णालयामधूनच पसार झाला. हगवणे पिता-पुत्राने पोलिसांना चकवा देण्यासाठी आपली कार बदलली.

नक्की वाचा >> …तर वैष्णवी हगवणेचा जीव वाचला असता! ‘मुलीच्या छातीला सासऱ्याने…’, ‘त्या’ पत्रातून खुलासा

दोघेही थार कारने ‘मुहूर्त लॉन्स’ येथे पोहचले. त्यानंतर दोघेही पवना येथून पावना धरण परिसरात बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर मुक्कामी थांबले. त्यानंतर हे दोघे आठ दिवस फरार होते. अखेर या दोघांना बावधन पोलिसांनी पुण्यातून अटक केली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

7 वर्षांच्या चिमुकलीवर सुरक्षारक्षकाचा लैंगिक अत्याचार:मुंबईतील संतापजनक घटना, संतप्त नागरिकांचा पोलिस ठाण्याला घेराव

0
मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ७ वर्षीय निष्पाप चिमुकलीवर इमारतीच्याच सुरक्षारक्षकाने बाथरूममध्ये घुसून...

बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले:लुधियानामध्ये बहिणीला रडतानाचा व्हिडिओ पाठवला, म्हणाली- मला घेऊन जा; इंस्टाग्रामवरून...

0
लुधियानामध्ये बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले आहे. त्याने गर्लफ्रेंडला आपल्या ताब्यात ठेवले आहे. अल्पवयीन मुलगी वारंवार आपल्या बहिणीला व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ आणि ऑडिओ मेसेज...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांचा ताण कमी होईल, तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल

0
रविवार, 12 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांच्या घरी पाहुणे आल्याने लगबग राहील. वृषभ राशीच्या लोकांना जुन्या मतभेदातून दिलासा मिळू शकतो. मिथुन राशीचे लोक...

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...
spot_img

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...
error: Content is protected !!