Homeमहाराष्ट्रवैष्णवी हागवणे सुसाइड प्रकरण करिश्मा राजेंद्र हागावणे कुटुंबातील धक्कादायक तपशील काय होते

वैष्णवी हागवणे सुसाइड प्रकरण करिश्मा राजेंद्र हागावणे कुटुंबातील धक्कादायक तपशील काय होते


हाग्वाने कौटुंबिक उत्पन्नाचा तपशील: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये रोज नवीन माहिती समोर येत आहे. राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबियांना कोट्यवधी रुपयांचा हुंडा घेऊनही पैशांच्या हव्यासापोटी वैष्णवीचा छळ केला. याच छळाला कंटाळून अवघ्या 9 महिन्यांच्या लेकराला मागे सोडून वैष्णवीने जगाचा निरोप घेतला. या प्रकरणामध्ये वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे, पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, दीर सुशील हगवणे, नणंद करिश्मा हगवणे या पाच जणांना अटक केली आहे. मुळशीजवळ असलेल्या भुकूम गावात राहणाऱ्या हगवणे कुटुंबाची सध्या राज्यभरात नकोत्या कारणाने चर्चा आहे. मात्र पैशांसाठी दोन्ही सुनांचा छळ करणाऱ्या आणि धाकट्या सुनेच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या हगवणे कुटुंबाच्या कमाईचा स्रोत काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

राजेशाही थाटात लग्न

वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिच्या लग्नातील व्हिडीओ समोर आले असून कोट्यवधी रुपये खर्च करुन हगवणे कुटुंबाला कस्पटे कुटुंबियांनी आपली लेक सोपवली. या लग्नाचा थाट व्हिडीओमधूनच अधोरेखित होत आहे. लग्नाला अगदी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही हजेरी होती. अजित पवारांच्या हस्तेच कस्पटे कुटुंबाने ‘भेट’ दिलेले फॉर्च्युनर कारची चावी नवरदेव शशांककडे सोपवण्यात आल्याचे फोटोही समोर आले. केवळ ही कोट्यवधींची कारच नाही तर कस्पटे कुटुंबाने लेकीला निरोप देताना हुंडा म्हणून बऱ्याच महागड्या वस्तू दिल्या.

50 तोळे सोनं, 7 किलो चांदी अन्…; कोट्यवधींचा हुंडा

वैष्णवी आणि शशांकचा प्रेमविवाह झाला होता. मुलीच्या मनाप्रमाणे लग्न लवून देताना वैष्णवीच्या आई-वडिलांनी हगवणे कुटुंबाला 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी अन् 7 किलो वजनाची चांदीची भांडी दिली होती. तरी जमीन खरेदीसाठी 2 कोटींच्या मागणीचा तगादा हगवणे कुटुंबाने लावला होता. वैष्णवीच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांच्या कालावधीमध्ये अनेकदा वैष्णवीला केवळ पैशांची मागणी करण्यासाठी हगवणे कुटुंबाकडून माहेरी पाठवलं जायचं. दर वेळेस 50 हजार 75 हजार रुपये आम्ही द्यायचो. मागील महिन्यातच शशांकला दीड लाखांचा फोनही घेऊन दिल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं.

नक्की वाचा >> …तर वैष्णवी हगवणेचा जीव वाचला असता! ‘मुलीच्या छातीला सासऱ्याने…’, ‘त्या’ पत्रातून खुलासा

हगवणे कुटुंबाच्या मिळतीचा स्रोत काय? एवढा पैसा यायचा कुठून?

मात्र पैशांची इतकी हाव असलेलं हगवणे कुटुंब नेमकं काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर हगवणे कुटुंबाकडे अनेक मार्गांनी पैसा येत होता अशी माहिती समोर येत आहे. नेमकी त्यांच्या उत्पन्नाची साधणं कोणती होती ते पाहूयात…

> राजेंद्र हगवणे राजकारणात सक्रिय असून तो अनेक निवडणुकाही लढला आहे. त्याला कधीच यश मिळालं नाही. मात्र राजकीय पक्षाशीसंबंधित असल्याने त्याचा गावात दबदबा होता.

नक्की वाचा >> लव्ह मॅरेज, कारच्या चावीचं गुपित, ‘त्या बडव्याची..’ अन्..; अजित पवारांनी मांडले वैष्णवी हगवणे प्रकरणाचे 12 मुद्दे

> शशांक आणि सुशील हे दोघे भाऊ बांधकाम व्यवसायात होते. या प्रकरणामध्ये फरार असलेला हगवणे कुटुंबाचा निकटवर्तीय निलेश चव्हाण हा सुद्धा बांधकाम व्यवसायातच सक्रीय आहे.

> हगवणेची दोन्ही मुलं वडिलांप्रमाणे राजकारणातही सक्रिय होती. त्यामुळे या माध्यमातूनही त्यांच्याकडे पैशाचा ओघ सुरु होता.

> शेती आणि वॉशिंग सेंटर हा हगवणे कुटुंबाच्या कमाईचा मुख्य स्रोत आहे.

> करिष्मा हगवणे ही फॅशन डिझायनर आहे. पुण्यातील कोथरूड येथे करिष्मा हगवणेचे कपड्यांचे दुकान आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!