Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र हवामानातील बातमी मुंबईतील पावसाच्या भविष्यवाणीसारखे वादळ

महाराष्ट्र हवामानातील बातमी मुंबईतील पावसाच्या भविष्यवाणीसारखे वादळ


महाराष्ट्र हवामान बातमी: अरबी समुद्रापासून थेट मध्य प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, दुसरीकडे तामिळनाडूनपासून थेट मनारच्या आखातापर्यंतही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळं महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. एप्रिल महिन्यातील वाढलेल्या उकाड्यातूनही बाष्पीभवन प्रक्रियेला वेग आला असून, त्यातूनच राज्यात पावसाच्या सरींची जोरदार बरसात होत असल्याचं पाहायला मिळालं.

हवामान विभागानं हे एकंदर चित्र पाहून वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये या परिस्थितीत फारशी सुधारणा होणार नसून राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. काही भागांमध्ये ऊन सावलीचा खेळही पाहायला मिळेल. राज्याच्या मध्य महाराष्ट्र भागासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भाला हवामान विभागानं वादळी पावसाच्या धर्तीवर यलो अलर्ट दिला आहे.

एकंदरच ढगाळ वातावरण, पावसाची हजेरी यामुळं बहुतांश भागांमध्ये तापमानाच घट झाली असून, हा आकडा 40 अंशांहूनही कमी झाल्याचं स्पष्ट होत आहे. गुरुवारीही राज्यात कोकण किनारपट्टीला लागून असणाऱ्या मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. यावेळी काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

काही भागात जोरदार सरींची शक्यता अशा वेळी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा सल्ला यंत्रणांनी दिला आहे. कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा दक्षतेचा इशारा देण्यात आला असून, या भागांमध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रामुख्यानं अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून काही भागात हलक्या सरींची बरसात अपेक्षित आहे.

कधीपर्यंत टिकून राहणार हे पावसाळी वातावरण?

राज्यात पुढचे पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून विदर्भ आणि मराठवाड्यावर याचा सर्वाधिक परिणाम होईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

अधिक वाचा : Operation Sindoor : भारताचा ‘सिक्रेट प्लान’ जगासमोर आणणारा हा माणूस आहे तरी कोण? म्हणे पाकिस्तानभोवतीचा गळफास आवळला जाणार…

सह मध्य महाराष्ट्रातही वादळी पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही भागात पावसाचा अंदाज आहे. तर हिंगोली, बीड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक आणि अहिल्यानगर इथं वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

आषाढी वारीतही असणार तुकाराम मुंढेंचे लक्ष:वारकऱ्यांना मिळणार स्वच्छ व दर्जेदार अन्न; मंत्री जयकुमार गोरेंकडून...

0
राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग सध्या जोरदार चर्चेत असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे,...

जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये पाकिस्तानी नागरिकाला अटक:LoC मधून घुसखोरी करून आत आला होता, जूनमध्ये अशी तिसरी...

0
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LoC) भारतीय लष्कराने रविवारी पाकिस्तानच्या एका घुसखोराला अटक केली. अधिकाऱ्यांच्या मते, या महिन्यात जिल्ह्यात पकडला गेलेला हा तिसरा...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांची थांबलेली कामे सुरू होतील, धनु राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून...

0
रविवार, २८ जून रोजी वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास मजबूत राहील आणि ऑफिसमध्ये त्यांच्या नेतृत्वाची क्षमता चर्चेत राहील. मकर राशीच्या लोकांचा अडकलेला प्रकल्प अचानक...

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...
spot_img

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...

मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...

0
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...

रावणाची लंका अन् अशोक वाटिका आता कशी दिसते?:अभिनेता प्रदीप काबरा यांनी श्रीलंकेतून शेअर केली...

0
अभिनेता प्रदीप काबरा नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी 'रामायण'शी संबंधित मानल्या जाणाऱ्या स्थळांची झलक शेअर केली. त्यांनी रावणाची लंका, अशोक वाटिका,...

आयसीआयसीआय बँक टॉप गेनर; मार्केट कॅप ₹२९,५८८ कोटी वाढले

0
मुंबई2 तासांपूर्वीलिंक कॉपी करागेल्या व्यावसायिक आठवड्यात देशातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे एकूण बाजार मूल्यांकन 88,678.1 कोटी रुपयांनी वाढले आहे. या वाढीमध्ये...
error: Content is protected !!