Homeमहाराष्ट्र'माझ्या खात्याचे पैसे 'लाडकी बहीण'साठी वळवले, सहन करण्याची मर्यादा'- संजय शिरसाट संतापले

‘माझ्या खात्याचे पैसे ‘लाडकी बहीण’साठी वळवले, सहन करण्याची मर्यादा’- संजय शिरसाट संतापले


संजय शिझिस: महाराष्ट्रातील लाडक्या बहीणी 2100 रुपयांचा हफ्ता कधीपासून मिळणार याची वाट पाहतायत. त्यात त्यांना एप्रिल महिन्याचा हफ्ताही अद्याप मिळाला नाहीय. हे सर्व सुरु असताना लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीत धुसूफूस सुरु असल्याचे पाहायला मिळतंय. लाडकी बहीण योजनेवरुन शिंदेंचे आमदार संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केलीय. काय म्हणाले शिरसाट? सविस्तर जाणून घेऊया.

माझ्या खात्याचे पैसे लाडकी बहीणसाठी वर्ग करण्यात आले. पूर्वीदेखील 7 हजार कोटी वर्ग करण्यात आले होते. याची मला पुसटशी कल्पना नसल्याचे धक्कादायक विधान मंत्री संजय शिरसाठी यांनी केलंय. या खात्याची आवश्यकता नसेल तर हे खाते बंद करा. दलित मागासवर्गीय काय करायचं बघू अशा शब्दात त्यांनी नाराजीदेखील व्यक्त केलीय.

याला अन्याय म्हणा, कट म्हणा,  असे का करताय कळत नाही. फायनान्स विभाग मनमानी करतंय. सहन करण्याची मर्यादा आहे. सगळं कट करून टाका. कशाला हवी शिष्यवृत्ती? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. या खात्याचा निधी वर्ग करता येत नाही. कट करता येत नाही. फायनान्स वाले जास्त डोके चालवत असेल तर हे आम्हाला मान्य नसल्याचे संजय शिरसाट म्हणाले.

मला हे पटलेलं नसून मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलेन. माझ्या खात्यावर याचा निश्चित परिणाम होईल. एक दिवस अशी गळती लागेल की काम होणार नाही, असेही ते म्हणाले.

गेल्यावेळी मी त्यांना निधी कापल्यावर पत्र दिले होते. तसे आताही देणार आहे. माझ्या खात्याचा निधी वर्ग करता येत नाही. हा कायदा आहे. हा कायदा डावलून सर्व सुरुय. वित्त विभागात काही महाभाग त्यांची मनमानी करताय, असे ते म्हणाले. हे चूक असून असे करता येत नाही. लाडकी बहीण योजनेला पैसे द्या पण यात जातीवाद व्हायला नको, असे शिरसाठ यांन सांगितलंय.  पैसे कुठून काढायचे हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा विषय आहे. वित्त विभागातील शकुनी हे करताय.

100 दिवसांचे ऑडिट  ही सुरुवात आहे. मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री मायनस आहेत. गॅप आहे तो भरून काढतोय. म्हणून मायनस दिसतंय, असेही ते म्हणाले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राम मंदिर देणगी चोरी- टिन्नू यादवसह 8 आरोपींना अटक:आज न्यायालयात हजर करणार; अरविंद केजरीवाल...

0
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात, मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचे निकटवर्तीय रमाशंकर यादव उर्फ टिन्नू यांच्यासह 8 आरोपींना गुरुवारी रात्री उशिरा...

ज्येष्ठ महिन्याची अंतिम तिथी 29 जूनला:भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाचा अभिषेक करा, हनुमानजींसमोर दिवा लावून...

0
आज (26 जून) ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी तिथी आहे. या महिन्याची अंतिम तिथी म्हणजेच पौर्णिमा 29 जून रोजी आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला संत...

उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी श्रीलंकेला विजय आवश्यक:आज स्कॉटलंडविरुद्ध सामना; महिला टी-20 विश्वचषकात दोघांची पहिली लढत

0
महिला टी-20 विश्वचषकात आज श्रीलंकेचा सामना स्कॉटलंडशी होईल. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी श्रीलंकेला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. हा सामना मँचेस्टरमध्ये...

राम मंदिर देणगीवरून संजय राऊत आक्रमक:मंदिरासाठी दिलेली चांदीची वीट कुठे? पावतीही नाही, चौकशीची मागणी

0
अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या ४ किलो चांदीच्या विटेचा ठावठिकाणा अद्याप समोर न आल्याचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब...
spot_img

उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी श्रीलंकेला विजय आवश्यक:आज स्कॉटलंडविरुद्ध सामना; महिला टी-20 विश्वचषकात दोघांची पहिली लढत

0
महिला टी-20 विश्वचषकात आज श्रीलंकेचा सामना स्कॉटलंडशी होईल. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी श्रीलंकेला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. हा सामना मँचेस्टरमध्ये...

साई सुदर्शनने श्रीलंका-ए विरुद्ध शतक झळकावले:पहिल्या अनऑफिशियल कसोटीत इंडिया-ए चा स्कोअर 333/4, ध्रुव जुरेल-शेख...

0
श्रीलंका 'ए' संघाविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटीच्या पहिल्या दिवशी भारत 'ए' संघाने ४ गडी गमावून ३३३ धावा केल्या. भारतीय सलामीवीर साई सुदर्शनने आपल्या प्रथम-श्रेणी...

ग्रे-डिवोर्स; अमेरिकेत 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये 40% घटस्फोट:कारण- नात्यांपेक्षा अस्तित्वाला जास्त महत्त्व देत...

0
30 वर्षांपेक्षा जास्त काळ एकत्र राहिल्यानंतर ऍलन हिकेनबॉटम आणि त्यांच्या पत्नीने घटस्फोट घेतला. सुरुवातीला दोघांमध्ये पुस्तके आणि कलेबद्दल खूप ओढ होती. दोघांनी मिळून...

'वेलकम टू द जंगल' चे 56 हजार तिकीट विकले:आगाऊ बुकिंगमध्ये ₹1.34 कोटींची कमाई, नवीन...

0
‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातील नवीन गाणे ‘ओ मेरे बलम’ आज प्रदर्शित झाले आहे. ट्रेलरमध्ये ऐकू आलेल्या त्याच्या धुनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून...
error: Content is protected !!