Homeमहाराष्ट्रराजकीय बातमी भाजपा महायतने महाराष्ट्र दिन वगळण्यासाठी आणि परदेशात सुट्टीसाठी उधव ठाकरे...

राजकीय बातमी भाजपा महायतने महाराष्ट्र दिन वगळण्यासाठी आणि परदेशात सुट्टीसाठी उधव ठाकरे यांना मारहाण केली


महाराष्ट्र राजकीय बातमी: 65 वा महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) नुकताच पार पडला, जिथं अनेक नेतेमंडळींनी बहुविध कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत महाराष्ट्र दिन साजरा केला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र या दिवशी कोणत्याही कार्यक्रमाला दिसले नाहीत. उलटपक्षी ते परदेशात सुट्टीसाठी गेल्याची बाब समोर आली आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. मुंबईत महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्यासाठी ठाकरेंची अनुपस्थिती महायुतीच्या हाती त्यांच्यावर टीका करण्यासाठी आयतं कोलित देऊन गेली.

राज्यातील नेतेमंजळींची विविध कार्यक्रमांना हजेरी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सत्तेतील आणि विरोधी पक्षांतील नेतेमंडळींनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती. संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या चळवळीत बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना नेतेमंडळींनी आदरांजली वाहिली पण, या साऱ्यामध्ये उद्धव ठाकरे मात्र कुठेच दिसले नाहीत.

भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधत ज्या मराठी अस्तित्वावरून ते भाष्य करतात त्याकडेच त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप शेलार यांनी केला. ‘एखादा नेता जो मराठी गौरवाविषयी वक्तव्य करत असतो त्यानं महाराष्ट्राच्या अतिशय महत्त्वाच्या दिवसाला बगल देणं अयोग्यच आहे’, असं ते म्हणाले.

हेसुद्धा वाचा : मोदी ‘निवृत्तीच्या उंबरठ्यावर’ म्हणत UBT नं दिला बिनशर्त पाठिंबा! म्हणाले, ‘…मूर्खपणा विरोधकांनी करु नये’

शेलारांच्या मागोमाग आता शिंदेंच्या शिवसेनेशी हातमिळवणी केलेल्या संजय निरुपम यांनीसुद्धा ठाकरेंवर निशाणा साधला. ‘महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना जेव्हा श्रद्धांजली वाहण्याची वेळ  आली तेव्हा ठाकरे कुटुंबानं मात्र परदेशी सुट्टीसाठी जाण्याचा पर्याय निवडला’, अशा शब्दांत निरुपम यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.

इथं सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंच्या या भूमिकेवर निशाणा साधलेला असतानाच संजय राऊतांना ज्यावेळी यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनीसुद्धा या प्रश्नाला बगल दिली. दरम्यान तिथं महायुतीनं महाराष्ट्र दिनी एकजूट दाखवत राजकीय वर्तुळात साऱ्यांचच लक्ष वेधलं हेसुद्धा तितकंच खरं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सिगारेट न दिल्याने वृद्धाचा खून:अमरावतीत एकाला अटक, दोन आरोपी फरार

0
सिगारेट न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ६५ वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना बुधवार, २४ जून रोजी सकाळी राजापेठ पोलीस...

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात फेरबदल मंत्र्यांची यादी अपडेट; AAP TMC शिवसेना खासदार

0
मराठी बातम्याराष्ट्रीयपंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात फेरबदल मंत्र्यांची यादी अपडेट; AAP TMC शिवसेना खासदार | भाजपनवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी...

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीचे योग आणि तूळ राशीचे लोक मोठ्या योजनेवर काम...

0
बुधवार, २४ जून रोजी मेष राशीच्या व्यक्तींचे नवीन संपर्क बनतील आणि कामात लोकांचे सहकार्य मिळेल. मिथुन राशीच्या व्यक्तींना आई किंवा घरातील एखाद्या महिलेच्या...

Vaibhav Suryawanshi ICC Rules Separate Dressing Room England

0
क्रीडा डेस्क4 तासांपूर्वीलिंक कॉपी करा15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौऱ्यावर संघातील इतर खेळाडूंपेक्षा वेगळा ड्रेसिंग रूम वापरेल. सूर्यवंशीसाठी हा निर्णय आयसीसी (ICC) आणि...
spot_img

Vaibhav Suryawanshi ICC Rules Separate Dressing Room England

0
क्रीडा डेस्क4 तासांपूर्वीलिंक कॉपी करा15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौऱ्यावर संघातील इतर खेळाडूंपेक्षा वेगळा ड्रेसिंग रूम वापरेल. सूर्यवंशीसाठी हा निर्णय आयसीसी (ICC) आणि...

कारच्या हेडलाइटमधून दिसेल सिनेमा:सारख्या चेहऱ्यामुळे 17 वर्षे निर्दोष व्यक्ती तुरुंगात राहिला; मशरूम खाल्ल्याने महिलेची...

0
चिनी टेक कंपनी हुआवे ने असे स्मार्ट हेडलाइट सादर केले आहे ज्यामुळे लोक सिनेमाचा आनंद घेऊ शकतात. दुसरीकडे, अमेरिकेत एका निर्दोष व्यक्तीला 17...

संजय लीला भन्साळींविरुद्ध FIRची मागणी:लव्ह अँड वॉरच्या सेटवर विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू, असोसिएशनने...

0
संजय लीला भन्साळींचा आगामी चित्रपट ‘लव्ह अँड वॉर’ सेटवर झालेल्या अपघातानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाचे शूटिंग मुंबई फिल्मसिटीजवळच्या रॉयल पंप स्टुडिओमध्ये सुरू...

मेटा, ॲमेझॉन सारख्या कंपन्यांमध्ये AIचा वापर मर्यादित:वेगाने येणारे नवीन मॉडेल महाग झाल्याने खर्च वाढला;...

0
या वर्षाच्या सुरुवातीला टेक कंपन्या कर्मचाऱ्यांना अधिकाधिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरण्यासाठी प्रोत्साहित करत होत्या. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये एआय टूल्सवर खर्च होणाऱ्या 'टोकन'च्या संख्येवरून...
error: Content is protected !!