Homeसांस्कृतिकAkshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेवर राहुकाळ, भद्राचं सावट? पूजेची नेमकी वेळ, सोने-चांदी...

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेवर राहुकाळ, भद्राचं सावट? पूजेची नेमकी वेळ, सोने-चांदी खरेदीसाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या नाहीतर…


अक्षया ट्रिटिया 2025: येत्या बुधवारी 30 एप्रिलला यावर्षातील सर्वात शुभ दिवस अक्षय्य तृतीया असणार आहे. पंचांगानुसार वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी करण्यात येते. हा दिवस अतिशय शुभ असून चार मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. यादिवशी शुभ कार्यासाठी कुठलाही मुहूर्त पाहिला जात नाही. हा दिवस शुभ असला तरी हा श्राद्ध दिवस म्हणून पाळला जातो. हा पितरांचा सण मानला गेला आहे. अक्षय्य तृतीया ही जेव्हा बुधवारी आणि रोहिमी नक्षत्रवर येते ती सर्वात महत्त्वाची आणि महापुण्यकारक मानली जाते. या दिवशी केलेले दान, हवन, तर्पण, पूजा, जप इत्यादी पुण्यकर्म अक्षय्य टिकते. म्हणून तसंच हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही ओळखला जातो.

दुसरीकडे यंदा अक्षय्य तृतीयेला भद्रा, राहुकाळाचं सावट असणार का? याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम पाहिला मिळत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार राहु काळ आणि भद्र काळात शुभ काम केले जात नाही. या काळात केलेल्या कामाला शुभ फळं मिळत नाही. अशात भद्र काळ आणि राहुकाळासह पूजेची नेमकी वेळ, आणि सोने-चांदी खरेदीसाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या.

अक्षय्य तृतीया तिथी

अक्षय्य तृतीयेला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करण्यात येते. पंचांगानुसार, अक्षय्य तृतीया तिथी 29 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 05:31 वाजेपासून 30 एप्रिल रोजी दुपारी 02:12 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार, यंदा अक्षय्य तृतीया हा सण बुधवारी, 30 एप्रिल 2025 रोजी  साजरा करण्यात येणार आहे. अशात प्रश्न असा पडतो की, यंदा अक्षय्य तृतीयेला भद्रा, राहुकाळाचं सावट असणार का? याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे.

अक्षय्य तृतीयेला भद्रा आणि राहुकाल आहे का?

धार्मिक मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर पूजा आणि खरेदी करणाऱ्यांना त्याचा विशेष लाभ मिळत असतो. मात्र धार्मिक मान्यतेनुसार, राहुकाल आणि भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. यावेळी केलेल्या कामाचे शुभ फळ मिळत नाही, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय. वैदिक पंचांगानुसार, यावेळी अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी भद्राची सावली नाही पण यादिवशी राहुकाल दुपारी 12:18 ते दुपारी 1:58 पर्यंत असणार आहे. राहुकाल वगळता 30 एप्रिल रोजी कोणत्याही शुभ मुहूर्तावर पूजा करणे शुभ राहणार आहे.

अक्षय्य तृतीयेच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त

वैदिक पंचागानुसार, 30 एप्रिल 2025 रोजी सकाळी 05:41 ते दुपारी 12:18 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त राहणार आहे. तर या दिवशी अभिजित मुहूर्त नाही. अक्षय्य तृतीयेला अमृत काल दुपारी 01:25 ते 02:51 पर्यंत असेल. याशिवाय बुधवारी पहाटे 04:21 ते 05:09 पर्यंत ब्रह्म मुहूर्त राहणार आहे.

अक्षय्य तृतीयेला सोने-चांदी खरेदीसाठी शुभ मुहूर्त

वैदिक पंचागानुसार, अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त – पहाटे 05:41 ते दुपारी 02:12 पर्यंत राहणार आहे

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

उदयनिधींचा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पत्नीवरून टोमणा:विरोधी पक्षनेते म्हणाले- चेंगलपट्टू न्यायालयात पतीचा शोध घेतेय पत्नी

0
तमिळनाडूच्या राजकारणात वैयक्तिक टिप्पणींवरून नवा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यावर अप्रत्यक्षपणे वैयक्तिक टिप्पणी करत...

ऋषी दुर्वासा आणि देवराज इंद्र कथा: भेट मूल्य आणि भावना

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक पौराणिक कथा आहे. फार पूर्वीच्या काळी दुर्वासा ऋषी नेहमी ज्ञानाच्या शोधात आणि धर्माचा संदेश पसरवण्यासाठी प्रवास करत असत. दुर्वासा...

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...
spot_img

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...
error: Content is protected !!