Homeमुळशीमुळशी तालुक्यातील वीज समस्या सोडवाव्यात, अन्यथा ठिय्या आंदोलनाचा (उ.बा.ठा) युवासेनेचा इशारा

मुळशी तालुक्यातील वीज समस्या सोडवाव्यात, अन्यथा ठिय्या आंदोलनाचा (उ.बा.ठा) युवासेनेचा इशारा

वीज खंडितीने ग्रामस्थ हैराण; मुळशी तालुक्यात (उ.बा.ठा) युवासेनेचा महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन

मुळशी : मुळशी तालुक्यातील मुठा व मोसे खोऱ्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर युवासेना (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुळशी तालुक्याच्या वतीने भरे येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता सतीश के. सुरे यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनाद्वारे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले. वीज गेल्यानंतर ग्रामस्थ तक्रार करत असले तरी संबंधित वायेरमन वेळेवर सहकार्य करत नसल्यामुळे तांत्रिक अडचणी दीर्घकाळ सोडवण्यात येत नाहीत. काही वेळा तर २४ तासांपेक्षा जास्त वेळ वीज पुरवठा खंडित राहतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी युवासेनेचे उपजिल्हा अधिकारी अमित कुडले, नामदेवआप्पा टेमघरे, दत्ताभाऊ काळभोर, साईदासभाऊ शिंदे, प्रदीप बोंद्रे तसेच शाखा प्रमुख विजय मारणे आदी उपस्थित होते.

महावितरण विभागाने विशेष पथक तयार करून या विभागातील देखभाल व दुरुस्तीच्या कामांना गती द्यावी, अशा मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या. तसेच सद्य:स्थितीत उपलब्ध असलेला वायेरमन अपुरा पडत असल्याने, या विभागात एक अतिरिक्त वायेरमन नेमण्यात यावा, अशीही विनंती करण्यात आली आहे.

“वीजपुरवठा खंडित झाल्यास संपूर्ण परिसरातील पाणी टंचाई निर्माण होते. यामुळे घरगुती वापरापासून शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होत आहे. मागण्या मान्य न झाल्यास युवासेना ठिय्या आंदोलनाचा मार्ग अवलंबेल,” असा इशारा युवासेना उपजिल्हाधिकारी अमित कुडले यांनी दिला.

महावितरणने या गंभीर समस्येची तातडीने दखल घ्यावी आणि तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांसह युवासेनेने केली आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले

0
जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक...

एमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्ती

0
मराठी बातम्याराष्ट्रीयएमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्तीभोपाळ44 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात...

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!