मुळशी (पौड,दि.19) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त वारकरी संप्रदायाशी असलेली नाळ घट्ट करत, मुळशी तालुक्यातील वारकरी बांधवांना शबनम बॅग व भजनी मंडळांना भजन साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात शिवसेना मुळशी तालुका प्रमुख सचिन खैरे, जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर आणि भारतीय विद्यार्थी सेनेचे पुणे जिल्हा संघटक राम गायकवाड यांच्या हस्ते हे साहित्य वितरित करण्यात आले.
कार्यक्रमास युवासेना उपजिल्हाधिकारी अमित कुडले, महिला आघाडी संघटक सुप्रिया सरुसे, मृदुंगमणी शुभम महाराज शिंदे, कीर्तनकार गणेश महाराज पारखी, उपतालुका प्रमुख वैभव पवळे, तालुका संघटक दिलीप गुरव, हनुमंत सुर्वे, गोविंद सरुसे, भारतीय विद्यार्थी सेना सरचिटणीस मुकेश लोयरे, सचिन सावंत, नारायण मते, नितीन लोयरे, शंकर साठे, लक्ष्मण खेंगरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश मारणे यांनी केले.
या उपक्रमातून वारकरी संप्रदायाबद्दल शिवसेनेची असलेली बांधिलकी आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी असलेली तत्परता पुन्हा अधोरेखित झाली.



































