Homeमुळशीमुळशीतील शेतकऱ्यांचे १५ दिवस उपोषण; भूमी अभिलेख कार्यालयाच्या चुकीच्या मोजणीचा फटका

मुळशीतील शेतकऱ्यांचे १५ दिवस उपोषण; भूमी अभिलेख कार्यालयाच्या चुकीच्या मोजणीचा फटका

मुळशी :  लवळे (ता. मुळशी) येथील शेतकरी अरुण भिकोबा राऊत गेल्या १५ दिवसांपासून चुकीच्या भूमापनाविरोधात आमरण उपोषण करत आहेत. भूमी अभिलेख कार्यालयाने २००६ साली केलेल्या मोजणीत त्यांच्या शेतातील घर चुकीच्या गटात दाखवल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. या संदर्भात न्याय मागण्यासाठी त्यांनी सुरू केलेले उपोषण आता तिसऱ्या टप्प्यात असून त्यांच्या प्रकृतीवरही त्याचा गंभीर परिणाम झाल्याचे समजते.

राऊत यांच्यासह त्यांच्या आई सिंधुबाई, पत्नी मीना, मुलगा तुषार, सून वृषाली, मुलगी रूपाली कुदळे, जावई संदीप कुदळे व इतर कुटुंबीय मिळून उपोषणात सहभागी झाले आहेत. उपोषणाला ९ जूनपासून सुरुवात झाली असून, गेल्या १५ दिवसांपासून संपूर्ण कुटुंबाने अन्नत्याग करून आंदोलन तीव्र केले आहे. राऊत यांनी औषधांचाही त्याग केला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

राऊत यांनी सांगितले की, “२००६ साली हेमंत निगडे या मोजणी अधिकाऱ्याने जाणूनबुजून माझे घर दुसऱ्याच्या गटात दाखवले. मी गेली १४ महिने या अन्यायाविरोधात लढा देतो आहे. आतापर्यंत एकाच जागेची चार वेळा मोजणी झाली असून प्रत्येक वेळेस वेगवेगळे निकाल देण्यात आले. यामध्ये मोठी गडबड आहे.”

यापूर्वी न्यायालयाने देखील मोजणीतील त्रुटींवर बोट ठेवले असून, शासकीय नकाशात स्पष्ट हद्दी असताना अधिकाऱ्यांनी मनमानी केल्याचा आरोप राऊत यांनी केला. “मागील मोजणीतील नकाशानुसारच पुढील मोजणी व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

या संदर्भात भूमी अभिलेख मुळशीच्या उपअधीक्षक स्वप्ना पाटील म्हणाल्या, “राऊत यांची मोजणी भोर येथील कार्यालयात वर्ग करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी कागदपत्रांची तपासणी करून योग्य निर्णय देतील.”

दरम्यान, जिल्हा अधीक्षक प्रभाकर मुसळे यांनी उपोषणस्थळी भेट दिली असून, “तपासणी करून निर्णय घेण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले आहे.

लवळे ग्रामपंचायतीचे सरपंच विनायक गुजर यांनी देखील या प्रकरणात पारदर्शक तपासणी करून राऊत कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली आहे. “एकच मोजणी पुन्हा पुन्हा करणे आणि प्रत्येकवेळी वेगळा निकाल देणे म्हणजे गंभीर बाब आहे. यामध्ये सत्य काय आहे, हे शोधून योग्य तो निर्णय व्हावा,” असे ते म्हणाले.

राऊत यांच्या या संघर्षामुळे संपूर्ण मुळशी तालुक्यात या प्रकरणाची चर्चा असून, सरकारी यंत्रणेकडून योग्य न्याय दिला जावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!