Homeपुणे ग्रामीणकुंडमळा दुर्घटनेच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाहणी; जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस

कुंडमळा दुर्घटनेच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाहणी; जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस

पुणे ग्रामीण : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे साकव पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. दुर्घटनास्थळी तपशीलवार माहिती घेतल्यानंतर पावसानंतर नव्या पुलाचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या वेळी आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांच्यासह विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

दुर्घटनेनंतर धाव घेऊन बचावकार्य करणाऱ्या स्थानिक नागरिकांचे उपमुख्यमंत्र्यांनी कौतुक करत “स्थानिकांनी दाखवलेली तत्परता व धाडस वाखाणण्याजोगे आहे,” असे मत व्यक्त केले.

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना

“मावळ तालुक्यात पर्यटकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून अत्याधुनिक बचाववाहन उपलब्ध करून दिले जाणार आहे,” अशी माहिती पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

दुर्घटनेच्या चौकशीसाठी अपर जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक अधिकारी, सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंते तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

धोकादायक पूल पाडले जाणार

“अपघातग्रस्त पुलाचा उर्वरित भाग तात्काळ पाडण्यात येईल. याशिवाय ज्यांचे आयुष्य संपले आहे किंवा स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक ठरलेले पूलही पाडण्यात येतील,” असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

नवीन पूल व ‘व्यूविंग गॅलरी’

या ठिकाणी ७.५ मीटर रुंदीचा नविन पूल बांधण्यात येणार असून दोन्ही बाजूंना ८ फूटांचे पदपथ असतील. पर्यटनस्थळ असल्याने दोन्ही बाजूंना आकर्षक व्यूविंग गॅलरी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही पवार यांनी सांगितले. संबंधित कंत्राटदाराला पावसानंतर पुलाचे काम सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस

घटनास्थळाच्या पाहणीनंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी पवना रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. “सर्व जखमींवर योग्य व तत्काळ उपचार होतील याची दक्षता घ्या,” असे निर्देश त्यांनी डॉक्टरांना दिले. यामध्ये समन्वयाची जबाबदारी प्रांताधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!