Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांक'एंगेज्ड २' या रिॲलिटी शोमधील अश्लीलतेवर कारवाई करण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन

‘एंगेज्ड २’ या रिॲलिटी शोमधील अश्लीलतेवर कारवाई करण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन

महिलांचा सन्मान करता येत नसेल, तर अवमान तरी करू नका ! – हिंदु जनजागृती समिती

 हात न लावता महिलेचा काढला टी-शर्ट, सर्वांसमोर घातली आंघोळ; एल्विश यादवचा

तो कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात…

मुंबई: ‘जिओ हॉटस्टार‘ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या ‘एंगेज्ड २‘ (Engaged 2: Roka Ya Dhoka) या ‘रिॲलिटी शो’मधून होणाऱ्या अश्लीलतेच्या विरोधात आणि महिलांच्या विटंबनेविरोधात हिंदु जनजागृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात समितीने मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांना निवेदन देऊन या ‘रिॲलिटी शो’वर तात्काळ बंदी घालण्याची आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत असतांना, अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांचे करण्यात येत असलेले अश्लील सादरीकरण लाजिरवाणे असून, यातून महिलांवरील अत्याचारांना प्रोत्साहनच मिळेल. त्यामुळे महिलांचा सन्मान राखता येत नसेल, तर अवमान तरी करू नका, असे ‘रिॲलिटी शो’च्या आयोजकांना हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी कु. प्रियांका लोणे यांनी सुनावले आहे. समितीने केलेल्या या मागणीची गंभीर दखल घेत गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांनी या प्रकरणी पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश देण्यात येतील, तसेच या संदर्भात कारवाई करण्यासाठी सांस्कृतिक विभागालाही कळवले जाईल, असे आश्वासन दिले आहे.

     या ‘रिॲलिटी शो’मध्ये ‘लॅप डान्स‘, ‘मड टास्क‘ आणि ‘आइस क्यूब टास्क‘ यांसारख्या अत्यंत हीन दर्जाच्या कृत्यांद्वारे महिलांचे वस्तूकरण केले जात असल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले आहे. विशेषतः हाताचा वापर न करता केवळ तोंडाने महिलांचे वस्त्र काढण्यासारखे, सार्वजनिकरित्या महिलांना हाताने स्पर्श करून आंघोळ घालणे, अंगाला चिखल लावणे आदी टास्क हे कायद्याचे उघड उल्लंघन करणारे आहेत. या कृत्यांमुळे यु‍वापिढीवर विपरीत परिणाम होत असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सुरू असलेला हा स्वैराचार रोखणे काळाची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या विषयाचे गांभीर्य ओळखून भाजप आमदार चित्रा वाघ आणि शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करून अशा अश्लील साहित्यावर कायमस्वरूपी निर्बंध आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे लोकप्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे.

डिजिटल माध्यमांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्य सरकारने ‘सांस्कृतिक देखरेख समिती‘ गठीत करावी, अशी आग्रही मागणीही या निमित्ताने करण्यात आली आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि स्त्री-सन्मानाची परंपरा जपण्यासाठी अशा विकृत कार्यक्रमांना थारा दिला जाणार नाही, असा इशारा हिंदु जनजागृती समितीने दिला आहे. २४ तासांच्या आत ठोस कारवाई करावी, अशी मागणी ही समितीने गृहराज्य मंत्र्यांकडे केली.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! – श्री. शॉन क्लार्क

0
‘कॉप-३१’ जागतिक हवामान परिषदेत भारतीय शिष्टमंडळातर्फे भारताचा आध्यात्मिक संशोधन दृष्टिकोन सादर ‘पर्यावरण जाणीव चळवळ’ : एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! - श्री. शॉन...

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!