Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकसोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे...

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर महासंघाच्या लढ्याला यश

ब्रेकिंग न्यूज
सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर महासंघाच्या लढ्याला यशश्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’ च्या हिंदी ॲपचे लोकार्पण!दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांचे ‘मंदिर महासंघा’ला आश्वासनदुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न; वाचा महिला शेतकऱ्यांची भारी स्टोरी!स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा भन्नाट प्रवास 'ज्ञानदीप'मध्ये!धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्ववसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !Gemini Financial Gain & Capricorn Promotion 2026हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव

अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे यांना महसूल विभागाने निलंबित केले आहे. लोखंडे यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत, योग्य चौकशी न करता आणि साक्ष-पुरावे व उलट तपास न घेता अत्यंत घाईघाईने हा एकतर्फी निर्णय दिला होता. या अत्यंत गंभीर प्रशासकीय अनियमिततेची दखल घेत शासनाने त्यांना निलंबित केले असून त्यांच्यावर पुढील विभागीय चौकशीची कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

या प्रकरणाचे मूळ म्हणजे, सदर देवस्थानची जमीन मनपा हद्दीत असल्याने व संस्थानकडे कायदेशीर सूट प्रमाणपत्र असल्याने तेथे ‘कुळ कायदा’ लागूच होत नाही. असे असतानाही लोखंडे यांनी कुळ कायद्याचा बेकायदेशीर आधार घेत ही जमीन त्रयस्थ व्यक्तीच्या नावे करून, बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी ती जाणीवपूर्वक ‘वर्ग-१’ (भोगवटदार) मध्येच ठेवली होती. मात्र, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि संस्थानच्या विश्वस्तांनी तातडीने आक्षेप घेत ही जमीन ‘वर्ग-२’ केली व बिल्डर लॉबीला होणारे हस्तांतरण रोखले. महासंघाच्या या पाठपुराव्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांनी (SDO) हा बेकायदेशीर खरेदी आदेश पूर्णतः रद्द केला असून सद्यस्थितीत देवस्थानची मालकी अबाधित आहे.

तहसीलदार लोखंडे यांच्या या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरोधात मंदिर महासंघाच्या वतीने राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समक्ष मुद्दा उपस्थित करून तक्रार करण्यात आली होती. या अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीबाबत यापूर्वीही वरिष्ठ पातळीवर अनेक तक्रारी प्रलंबित होत्या, ज्याची एकत्रित दखल घेत शासनाने ही धडक कारवाई केल्याची दाट शक्यता आहे. देवस्थानची कोट्यवधींची संपत्ती हडप करू पाहणाऱ्या एका भ्रष्ट अधिकाऱ्यावर शासनाने केलेल्या या निलंबनाच्या कारवाईबद्दल मंदिर महासंघाने आणि विश्वस्तांनी मोठे समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
spot_img

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
error: Content is protected !!