Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांक'एंगेज्ड २' या रिॲलिटी शोमधील अश्लीलतेवर कारवाई करण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन

‘एंगेज्ड २’ या रिॲलिटी शोमधील अश्लीलतेवर कारवाई करण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन

महिलांचा सन्मान करता येत नसेलतर अवमान तरी करू नका ! हिंदु जनजागृती समिती

 हात न लावता महिलेचा काढला टी-शर्टसर्वांसमोर घातली आंघोळएल्विश यादवचा

तो कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात…

मुंबई: जिओ हॉटस्टार‘ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या एंगेज्ड २‘ (Engaged 2: Roka Ya Dhoka) या रिॲलिटी शोमधून होणाऱ्या अश्लीलतेच्या विरोधात आणि महिलांच्या विटंबनेविरोधात हिंदु जनजागृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात समितीने मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांना निवेदन देऊन या रिॲलिटी शोवर तात्काळ बंदी घालण्याची आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत असतांनाअशा कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांचे करण्यात येत असलेले अश्लील सादरीकरण लाजिरवाणे असूनयातून महिलांवरील अत्याचारांना प्रोत्साहनच मिळेल. त्यामुळे महिलांचा सन्मान राखता येत नसेलतर अवमान तरी करू नकाअसे रिॲलिटी शोच्या आयोजकांना हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी कु. प्रियांका लोणे यांनी सुनावले आहे. समितीने केलेल्या या मागणीची गंभीर दखल घेत गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांनी या प्रकरणी पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश देण्यात येतीलतसेच या संदर्भात कारवाई करण्यासाठी सांस्कृतिक विभागालाही कळवले जाईलअसे आश्वासन दिले आहे.

     या रिॲलिटी शोमध्ये लॅप डान्स‘, ‘मड टास्क‘ आणि आइस क्यूब टास्क‘ यांसारख्या अत्यंत हीन दर्जाच्या कृत्यांद्वारे महिलांचे वस्तूकरण केले जात असल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले आहे. विशेषतः हाताचा वापर न करता केवळ तोंडाने महिलांचे वस्त्र काढण्यासारखेसार्वजनिकरित्या महिलांना हाताने स्पर्श करून आंघोळ घालणेअंगाला चिखल लावणे आदी टास्क हे कायद्याचे उघड उल्लंघन करणारे आहेत. या कृत्यांमुळे यु‍वापिढीवर विपरीत परिणाम होत असूनअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सुरू असलेला हा स्वैराचार रोखणे काळाची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या विषयाचे गांभीर्य ओळखून भाजप आमदार चित्रा वाघ आणि शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करून अशा अश्लील साहित्यावर कायमस्वरूपी निर्बंध आणण्यासाठी प्रयत्न केले जातीलअसे लोकप्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे.

 

डिजिटल माध्यमांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्य सरकारने सांस्कृतिक देखरेख समिती‘ गठीत करावीअशी आग्रही मागणीही या निमित्ताने करण्यात आली आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि स्त्री-सन्मानाची परंपरा जपण्यासाठी अशा विकृत कार्यक्रमांना थारा दिला जाणार नाहीअसा इशारा हिंदु जनजागृती समितीने दिला आहे. २४ तासांच्या आत ठोस कारवाई करावीअशी मागणी ही समितीने गृहराज्य मंत्र्यांकडे केली.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!