Homeमहाराष्ट्रWelcome the New Year with milk, not alcohol. Superstition Eradication Committee distributes...

Welcome the New Year with milk, not alcohol. Superstition Eradication Committee distributes milk in Jamner city. | नववर्षाचे स्वागत दारूने नको, दुधाने करा‎: जामनेर शहरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दुधाचे वाटप‎ – Jalgaon News


.

सरत्या वर्षाला निरोप द्या, नववर्षाचे स्वागत करा, पण दारू ऐवजी दूध प्या. असा प्रचार प्रसार करीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जामनेर शाखेतर्फे बस स्थानकाजवळ दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी लिखाण केलेली दिग्गज लेखकांच्या पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आला होता.

आज घडीला जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे. आजचे तरुण संस्कार, संस्कृती विसरून पाश्चात्त्य देशांचे अनुकरण करतात. त्यातच वर्षाची अखेर म्हणजे ३१ डिसेंबर (थर्टी फर्स्ट) म्हणून दारू पिऊन किंवा मांसाहार करून साजरा करण्याचा जणू रिवाजच सुरू झाला आहे. मात्र यामुळे तरुणाई देशोधडीला लागला असून असंख्य व्यसनाधीन तरुणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देताना व नववर्षाचे स्वागत करताना ‘ दारू नको दूध प्या, असे आवाहन करत दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी अंनि सचे जिल्हा उपाध्यक्ष नाना लामखेडे, तालुका उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोऱ्हाडे, जामनेर शाखा कार्याध्यक्ष बी.आर. पाटील आदी उपस्थित होते.

श्रद्धा असावी मात्र अंधश्रद्धा असू नये. याच अंधश्रद्धेतून अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. त्यासाठी सत्यशोधकांचे मार्गदर्शन लोकांसमोर जावे म्हणून प्रयत्न आहेत. तसेच अवयव दाना बाबत जनजागृती करून प्रचार प्रसार करून अवयव दान करू इच्छिणाऱ्यांचे जामनेरातील समितीने अर्ज भरून घेतलं.

^तरुण पिढी पाश्चात्य शैली अनुकरणाच्या नावाखाली अंधानुकरण करत आहे. दूध पिऊन पैलवान होणाऱ्यांचा आदर्श न घेता दारू पिऊन झिंगाणारे आदर्श वाटू लागले आहेत. म्हणून आम्ही दारू नको दूध प्या असा संकल्प राबवत आहोत. – नाना लामखेडे



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!