नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी सकाळी १० वाजता होणार आहे. मतमोजणी शिवाजी महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियममध्ये होईल. निवडणूक निरीक्षक तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी हरिश धार्मिक यांनी शनिवारी मतमोजणी केंद्राची पाहणी केली. मतमोजणी सुरळीत पार पडावी
.
पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीतील प्रभाग ३, ६ आणि ११ मधील तीन जागांसाठी शनिवारी मतदान शांततेत पार पडले. या ठिकाणी एकूण ७७ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी निलम बाफना यांनी दिली. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि अजित पवार गटाचे उमेदवार रिंगणात होते. दुपारी ३ वाजेपर्यंत प्रभाग ३, ६ आणि ११ मध्ये ५२ % अधिक मतदान झाले होते.
प्रतिनिधी | फुलंब्री फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीसाठी शनिवारी मतदान शांततेत पार पडले. किरकोळ वाद वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. नगरसेवकपदासाठी ५४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. या वेळी ८३ टक्के मतदान झाले. २०१७ मध्ये ७५ टक्के मतदान झाले होते. यंदा १७६३० मतदारांपैकी १४८०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. काही वॉर्डांत रात्री आठ वाजेपर्यंत प्रक्रिया सुरू होती. फुलंब्री न.प.मध्ये यंदा नव्याने समाविष्ट झालेल्या पानवाडी गावातील मतदार निर्णायक ठरणार आहेत. २०१७ मध्ये पानवाडीचा समावेश नव्हता. यंदा या गावातील मतांचे गणित नगराध्यक्षपदाच्या निकालावर परिणाम करणार आहे. ही निवडणूक दोन डिसेंबरला होणार होती. मात्र, काही कारणास्तव निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. निकाल आज, रविवारी लागणार आहे. मतदान सकाळी साडेसात वाजता सुरू झाले. रात्री आठ वाजेपर्यंत प्रक्रिया सुरू होती. प्रत्येक मतदाराला दोन बटणे दाबावी लागत होती. मात्र, काही मतदार एकच बटण दाबून सिटी वाजते का हे पाहत होते. त्यामुळे वेळ लागत होता. नंतर बूथवरील अधिकाऱ्यांनी दोन बटणे दाबण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मतदान सुरळीत झाले. सकाळी वॉर्ड क्रमांक १५ च्या बूथवर उमेदवार मतदारांवर दबाव टाकत असल्याचा आरोप झाला. काही वेळ तणाव निर्माण झाला. दोन उमेदवारांमध्ये वाद झाला. पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरहून अतिरिक्त बंदोबस्त मागवला. दुपारी साडेबारा वाजता पोलिस अधीक्षक राठोड यांनी बूथला भेट दिली. मतमोजणीला सकाळी १० वाजता सुुरुवात होणार आहे. वैजापूर येथे १२, पैठण येथे १५, गंगापूर १०, सिल्लोड १२, कन्नड १२, खुलताबाद १०, तर फुलंब्रीत १० अशा एकूण ८७ टेबलवर ही मतमोजणी होणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व निकाल लागतील, असा अंदाज आहे. सकाळी साडेसात ते साडेअकरा वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झाले. दुपारी दोननंतर मतदानाचा वेग वाढला. वयोवृद्ध मतदारांनी दोननंतर मतदानासाठी गर्दी केली. मतदानाचा कालावधी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच असा होता. मात्र, वॉर्ड क्रमांक ४, ६ आणि १३ मध्ये रात्री आठपर्यंत मतदान चालले.
गंगापूर पालिकेच्या २ नगरसेवक पदासाठी रविवारी मतदान झाले. दोन प्रभागांतील सात मतदान केंद्रांवर ७२.९८ टक्के मतदान झाले. एकूण ६,३०९ मतदारांपैकी ४,६०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नगराध्यक्षपद आणि २० नगरसेवक पदांची मतमोजणी आज सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी मध्यवर्ती प्रशासकीय भवन, तहसील कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे.






















