Homeमहाराष्ट्रVirar Accident Update Heartbreaking Incident Baby Drop From 21 Floor | 21...

Virar Accident Update Heartbreaking Incident Baby Drop From 21 Floor | 21 व्या मजल्यावरून आईच्या हातून निसटले बाळ: 7 वर्षांनी झाले होते मूल, चिमुकल्याच्या मृत्यूने हळहळ – Mumbai News

पालघरच्या विरार येथे काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. 21 व्या मजल्यावरून 7 महिन्याचे बाळ खाली पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी 23 एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास विरार पश्चमी येथील जॉय विला कॉम्प्लेक्समधील पिनॅकल स

?

पिनॅकल सोसायटीच्या 21 व्या मजल्यावर विकी सेदानी आणि पूजा सेदानी हे दाम्पत्य राहत होते. त्यांचा 7 महिन्यांचा मुलगा व्रिशांक उर्फ वेदला झोप येत नव्हती, म्हणून पूजा यांनी त्याला कुशीत घेत बेडरूममध्ये फिरत होत्या. जरा हवा यावी म्हणून त्यांनी बाल्कनीची स्लायडिंग खिडकी उघडी ठेवली. तिथली फरशी ओलसर असल्याने पूजा यांचा पाय घसरला आणि त्या बाल्कनीच्या दिशेने पडल्या, यात त्यांचे कुशीत असलेले बाळ बाल्कनीमधून थेट खाली पडले. यानंतर तातडीने बाळाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

विकी सेदानी आणि पूजा सेदानी यांना 7 वर्षांनी मूल झाले होते. या अपघाताने दोघांच्याही मनावर खोल जखम केली आहे. दरम्यान, आजकाल मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये उंचच उंच इमारती उभारल्या जात आहेत. तसेच अनेक ठिकाणी बाल्कनीच्या बाहेरच्या बाजूने जाळी बसवलेली असते, परंतु, काही इमारतींना बसवलेली नसते. अशा वेळेस घरातील लहान मुलांची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. इमारतीवरून पडून अनेकांचे अपघात झाल्याच्या घटना घडत असतात. खबरदारी म्हणून बाल्कनी किंवा खिडक्यांना जळी बसवणे अनिवार्य आहे.

सेदानी दांपत्याच्या आयुष्यातील ही सर्वात दुःखद घटना घडली आहे. हातात असलेले आपले बाळ असे अचानक पडून क्षणात नाहीसे होणे, ही जखम आयुष्यभर मनातून जाणार नाही. या घटनेमुळे सेदानी कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पहिल्यांदाच कॅमेऱ्यावर बनावट नोटांची टोळी:1 लाखाच्या बदल्यात 10 लाखांच्या नोटा; दावा- ATM ही पकडू...

0
पहिल्यांदा कॅमेऱ्यावर पाहा तुमच्या पर्सपर्यंत बनावट नोटा पोहोचवणाऱ्या टोळीचे चेहरे! इंस्टाग्रामवरील एका रीलमधून सुरू झालेली तपासणी बनावट नोटांच्या त्या सिंडिकेटपर्यंत पोहोचली, जे रील्समध्ये...

कल्याण मारहाण प्रकरणी विरोधक आक्रमक:गुंडांची चड्डी-बनियानवर धिंड काढा, राऊतांचा संताप; हे सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभते...

0
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये काल (मंगळवारी) एका महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना थेट मारहाण आणि धक्काबुक्की केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता....

10 जुलै रोजी योगिनी एकादशी:दशमी तिथीच्या संध्याकाळी करा भगवान विष्णूची पूजा, एकादशीला दान-पुण्य करा

0
शुक्रवार, 10 जुलै रोजी निज ज्येष्ठ कृष्ण पक्षाची एकादशी आहे, याला योगिनी एकादशी म्हणतात. हे व्रत भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्याच्या इच्छेने केले...

वेस्ट इंडीजने मालिका जिंकली:श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना ड्रॉ, 4 वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका...

0
वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात नॉर्थ साउंड येथे खेळला गेलेला दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना अनिर्णित राहिला. यासोबतच वेस्ट इंडिजने दोन सामन्यांची कसोटी...
spot_img

वेस्ट इंडीजने मालिका जिंकली:श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना ड्रॉ, 4 वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका...

0
वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात नॉर्थ साउंड येथे खेळला गेलेला दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना अनिर्णित राहिला. यासोबतच वेस्ट इंडिजने दोन सामन्यांची कसोटी...

प्रभसिमरन सिंगला संधी; संजू सॅमसन नाबाद

0
क्रीडा डेस्क42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करासंजू सॅमसनला भारतीय संघातून वगळण्यात आलेले नाही. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने 2028 टी-20 विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे....

पावसाळ्यात वाढतात कीटक आणि झुरळे:10 खबरदारी घेतल्यास कीटक येणार नाहीत, तज्ञांकडून जाणून घ्या पळवून...

0
उन्हाळ्यानंतर पावसाळा दिलासा घेऊन येतो, पण या ऋतूत आर्द्रता आणि ओलसरपणा वाढतो आणि जागोजागी पाणी साचते. कीटकांच्या वाढीसाठी या परिस्थिती अनुकूल आहेत. यामुळेच...

कृती सेननने ‘मिमी’ चित्रपटाच्या वेळी एग्स फ्रीज केले:म्हणाली- लग्न किंवा मुले स्वतःच्या इच्छेने व्हायला...

0
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने खुलासा केला आहे की, तिने तिच्या 'मिमी' चित्रपटाच्या तयारीदरम्यान तिची अंडी (एग्स) फ्रीज केली होती. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या...
error: Content is protected !!