Homeमहाराष्ट्रSharad Pawar Reaction on US Donald Trump Mediation in India Pakistan Ceasefire...

Sharad Pawar Reaction on US Donald Trump Mediation in India Pakistan Ceasefire | भारत-पाकिस्तान संघर्षात अमेरिकेची मदत घेण्याची आवश्यकता काय?: शरद पवारांचा केंद्राला सवाल, शिमला कराराचा दिला दाखला – Mumbai News

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारत-पाकिस्तान यांच्यात डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी योग्य नसल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी शिमला कराराची देखील आठवण करून दिली. या करारानुसार दोन्ही देशांमधील वादात तिसरा कोणीही मध

?

भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. अमेरिकेच्या मध्यस्थीने हा मार्ग काढण्यात आल्याचे सांगत त्यांनी दोन्ही देशांचे आभारही मानले. त्यानंतर केंद्रातील मोदी सरकारच्या भूमिकेवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता विरोधकांकडून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमके काय म्हणाले शरद पवार?

मला शिमला करार आठवतोय. शिमला करार इंदिरा गांधी आणि झुलफिकार अली भुट्टो यांच्यात झाला होता. त्यात आमच्या देशाचे मुद्दे आम्ही सोडवू, आमचा विषय आम्हीच सोडवणार, त्यात इतरांनी हस्तक्षेप करायचा नाही असे ठरले होते. दोन देशांतील समस्येवर तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करून नये असा हा करार झाला आहे. असे असताना अमेरिकेची मदत घेण्याची काय आवश्यकता आहे? असा प्रश्न कोणी विचारला तर केंद्राला यावर उत्तर द्यावे लागेल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

घरगुती वादात तिसऱ्या राष्ट्राचा हस्तक्षेप योग्य नाही

आतापर्यंत दोन देशांतील अंतर्गत प्रश्नांत आपण कोणालाही हस्तक्षेप करू दिलेला नाही. पण पहिल्यांदाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अंतर्गत मुद्द्यावर चर्चा आहे. आपल्या घरगुती वादात तिसऱ्या राष्ट्राचा हस्तक्षेप चालणार नाही. ही पहिलीच वेळ आहे, अमेरिकन अॅथोरिटीने पब्लिकली पुढे येऊन सांगितले, हे ठीक नाही, असे शरद पवार म्हणाले.

विशेष अधिवेशनात किती माहिती दिली जाईल सांगता येत नाही

विरोधकांकडून युद्धजन्य परिस्थितीवर विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करण्यात आली आहे. त्यावरही शरद पवारांनी आपली भूमिका मांडली. विशेष अधिवेशन बोलवायला हरकत नाही, पण त्यात किती माहिती दिली जाईल हे सांगता येत नाही. संरक्षणाशी संबंधित काही माहिती देता येत नाही. अशी माहिती गोपनीय ठेवावी लागते. अधिवेशन बोलवायचे असेल तर बोलवा. मात्र सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवून, संरक्षण अधिकारी यांना बोलावून त्यांच्याकडून काय स्थिती आहे आपण काय केले आहे याची माहिती दिली पाहीजे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण रात्री 8 वाजता आहे, तुम्ही ऐका आणि मीही ऐकतो त्यानंतर आपण बोलू. पण, अमिरिकेच्या हस्तक्षेपाबाबत माहिती तर दिली गेली पाहीजेच, असेही शरद पवारांनी म्हटले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन:वारकरी, शेकऱ्यांना सुखी ठेव; देवेंद्र फडणवीसांचे विठुराया चरणी...

0
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीमध्ये सहभागी होणे अतिशय सुंदर अनुभूती आहे; महाराष्ट्राच्या या...

अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या एका तरुणाला गुगलने अटक केली:कानपूर पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला, अल्पवयीन बहिणींच्या...

0
कानपूर पोलिसांनी शुक्रवारी बाल लैंगिक शोषण प्रकरणी एका तरुणाला अटक केली. आरोपी तरुण आपल्या बहिणींसोबत आणि जवळपास राहणाऱ्या इतर मुलींसोबतच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ...

10 जुलैचे राशिभविष्य:मीन राशीच्या लोकांना भागीदारीच्या व्यवसायात चांगला नफा, वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा

0
शुक्रवार, 10 जुलै रोजी वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांची नवीन कामे सुरू करण्याची इच्छा पूर्ण होऊ...

विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी पोहोचली प्रियंका चोप्रा:पती निक जोनासला व्हिडिओ कॉलवर लाइव्ह टूर दाखवला, सामन्यादरम्यान...

0
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. ती महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पहिल्या रांगेत बसलेली दिसली, जिथे कोको...
spot_img

विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी पोहोचली प्रियंका चोप्रा:पती निक जोनासला व्हिडिओ कॉलवर लाइव्ह टूर दाखवला, सामन्यादरम्यान...

0
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. ती महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पहिल्या रांगेत बसलेली दिसली, जिथे कोको...

लग्नानंतर नोकरी सोडली:आता फक्त एक पत्नी अन् आई म्हणून जगतेय, सगळ्यांना आनंदी करण्याच्या प्रयत्नात...

0
प्रश्न– मी 34 वर्षांची महिला आहे. लग्नानंतर मी माझी नोकरी सोडली होती, कारण कुटुंबाची जबाबदारी वाढली होती. गेल्या काही वर्षांपासून माझी ओळख फक्त...

फाटलेल्या बुटांच्या व्हायरल व्हिडिओवर सनी देओलची फिरकी:कार्यक्रमात म्हणाले- कोणीही बुटाचा फोटो घेऊ नये, धर्मेंद्र...

0
बॉलिवूड अभिनेता सनी देओल गुरुवारी आपल्या 'इक्का' चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या कार्यक्रमात पोहोचले. यावेळी त्यांनी त्यांच्या अलीकडील 'बुटाच्या वादा' वर विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली. खरं...

बीएसएनएल सॅटेलाइट फोन भारतात लाँच

0
नवी दिल्ली9 तासांपूर्वीलिंक कॉपी करासरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने भारतात नवीन सॅटेलाइट फोन लॉन्च केला आहे. याची किंमत करांसहित 1,34,166 रुपये ठेवण्यात आली...
error: Content is protected !!