पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या शालेय साहित्य आणि गणवेश खरेदीत तब्बल ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी ९ जुलै २०२६ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवले असून, या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावेही जोडले आहेत. “न खाऊंगा, न खाने दूंगा, हे पंतप्रधानांचे वाक्य प्रेरणादायी आहे, पण या व्यवहारात तुमच्याच मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्याने पालिकेवर दबाव आणून ५० ते ५५ कोटी रुपयांची टक्केवारी खाल्ली आहे,” असा खळबळजनक गौप्यस्फोट राऊत यांनी या पत्रात केला आहे. या प्रकरणावर कारवाई झाली तरच नवल वाटेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. ई-टेंडर प्रक्रियेला हरताळ; सोलापूरच्या संस्थेला परस्पर काम खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश केला आहे. नियमानुसार, ३ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या खरेदीसाठी ‘ई-निविदा’ प्रक्रिया राबवणे बंधनकारक असते. मात्र, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने या नियमाला पूर्णपणे केराची टोपली दाखवत, सोलापूरच्या ‘जगदंबा रेडीमेड ड्रेसेस सहकारी संस्थेला’ कोट्यवधी रुपयांचे काम परस्पर देऊन टाकले, असा आरोप राऊत यांनी केला आहे. वरिष्ठ मंत्र्याला ५०-५५ कोटींची ‘टक्केवारी’ या पत्रातील सर्वात गंभीर आरोप राज्य मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्यावर करण्यात आला आहे. निविदेविना हे काम संबंधित संस्थेला मिळावे, यासाठी या वरिष्ठ मंत्र्याने पालिका आयुक्तांवर प्रचंड दबाव आणला. हा दबाव कोणत्याही सामाजिक कार्यासाठी नव्हता, तर या मोठ्या टक्केवारीसाठी होता. या ४०० कोटींच्या घोटाळ्यातून त्या मंत्र्याच्या खिशात तब्बल ५० ते ५५ कोटी रुपये पोहोचल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. “कारवाई झाली तरच नवल, पण मी माझे कर्तव्य बजावतोय” “विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यात असा भ्रष्टाचार होणे राज्यासाठी अत्यंत लज्जास्पद आणि बदनामीकारक आहे. जर तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली आणि हा भ्रष्टाचार मान्य नसेल, तर संबंधित मंत्री आणि पालिका प्रशासनावर त्वरित कारवाईचे आदेश द्यावेत,” अशी मागणी संजय राऊत यांनी पत्राच्या शेवटी केली आहे. तसेच, भ्रष्ट व्यवहाराचे सर्व कागदोपत्री पुरावे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पाठवल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. मात्र, यावर कारवाई होईल याबाबत साशंकता व्यक्त करत, “मी फक्त माझे कर्तव्य बजावत आहे,” असा चिमटाही त्यांनी काढला आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेले पत्र.. हेही वाचा.. शरद पवारांचे 5-6 खासदार अस्वस्थ:पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याने खळबळ! खासदार बजरंग सोनवणे आणि शशिकांत शिंदेंनी दिलं थेट उत्तर
राज्याच्या राजकारणात सध्या फोडाफोडीच्या आणि नाराजीच्या चर्चांनी जोर धरला आहे. यातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे 5 ते 6 खासदार सध्या अस्वस्थ आहेत आणि ते काय करतील हे सांगता येत नाही,” असे विधान चव्हाण यांनी केले आहे. या दाव्यामुळे महाविकास आघाडीत आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हा दावा फेटाळून लावत पक्षात सर्व काही आलबेल असल्याचे स्पष्ट केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने महाराष्ट्रात सर्वाधिक 8 जागा जिंकल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये वेगाने बदल होताना दिसत आहेत, ज्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे. सविस्तर वाचा..
Source link
न खाऊंगा, न खाने दूंगा.. पण पिंपरीत 400 कोटींची लूट:शालेय साहित्य घोटाळ्यावरून संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, उच्चस्तरीय चौकशीची मागणी
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
राम मंदिरात अजूनही चंपत राय सर्वात शक्तिशाली:खास लोक 1800 कोटी रुपयांची खाती सांभाळत आहेत,...
राम मंदिराच्या परिसरात चंपत राय यांचे वर्चस्व अजूनही कायम आहे. दैनिक भास्करच्या तपासणीत असे समोर आले आहे की, ट्रस्टमधून बाहेर पडल्यानंतरही व्हीआयपी पास...
10 जुलै रोजी योगिनी एकादशी व्रत, योगिनी एकादशीचे महत्त्व, विष्णु लक्ष्मी पूजा विधि
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराआज (शुक्रवार, 10 जुलै) निज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी आहे, याला योगिनी एकादशी म्हणतात. अशी मान्यता आहे की जो...
चेपॉक स्टेडियममध्ये होईल बिग बॅशचा ओपनिंग सामना:12 डिसेंबर रोजी सामना खेळला जाईल, पंतप्रधान मोदींनी...
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० क्रिकेट लीग बिग बॅशचा उद्घाटनाचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ही घोषणा केली आहे. ते...
TMC चे 3 माजी राज्यसभा खासदार भाजपत सामील:सुष्मिता, सुखेंदू व प्रकाश चिक यांनी विधानसभा...
तृणमूल काँग्रेस (TMC) चे तीन माजी राज्यसभा खासदार सुष्मिता देव, सुखेंदू शेखर राय आणि प्रकाश चिक बराइक गुरुवारी भाजपामध्ये सामील झाले. प्रदेशाध्यक्ष सामिक...
चेपॉक स्टेडियममध्ये होईल बिग बॅशचा ओपनिंग सामना:12 डिसेंबर रोजी सामना खेळला जाईल, पंतप्रधान मोदींनी...
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० क्रिकेट लीग बिग बॅशचा उद्घाटनाचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ही घोषणा केली आहे. ते...
भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...
पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...
अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....






























