Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस यांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली: आता आमचे काय होणार? मुख्यमंत्र्यांच्या...

देवेंद्र फडणवीस यांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली: आता आमचे काय होणार? मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्याला शरद पवारांचा खोचक टोला

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे नागपूर ते गोवा असा शक्तिपीठ महामार्ग. परंतु या महामार्गाला कोल्हापूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गात राजकारण आणाल तर याद राखा, असा इशारा विरोधकांना दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाचा विषय मला समजून घ्यायचा आहे. कोल्हापूरच्या लोकांबरोबर मी बोलणार आहे. त्यानंतर राज्य सरकारने आम्हा लोकांना त्याची माहिती देण्याची तयारी दाखवली तर तेही समजून घेण्याचा माझा विचार आहे. देवेंद्र फडणवीसांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली आहे, आता आमचे कसे होणार? असा खोचक टोला लगावला आहे.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, हा प्रकल्प काय आहे? हे आधी मी समजून घेईन. त्याची आवश्यकता आहे का? ते समजून घेईन. त्यासाठी सरकारने आम्हाला माहिती दिली तर ती देखील मी घेणार आहे. त्या भागातला शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात, त्या भागातले लोकप्रतिनिधी जे जाहीर बोलत आहेत त्यांची मते आणि त्यांचा आग्रह हा समजून घ्यावा लागेल. मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले.

मराठवाड्यातील दुष्काळी चित्र बदलण्यासाठी शक्तिपीठ हे उत्तर – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शक्तिपीठ महामार्गाविषयी बोलताना म्हणाले, मराठवाड्यातील दुष्काळी चित्र बदलण्यासाठी शक्तिपीठ हे उत्तर असणार आहे. तो एक ॲक्सेस कंट्रोल रोड नसेल, तर त्या महामार्गावर प्रत्यक्ष रेंजमध्ये आम्ही 100 शेततळी बांधणार आहोत. तसेच ब्रिज कम बंधारे बांधून पाणी अडवण्याचा कार्यक्रम राबवणार आहोत आणि ते जलसंवर्धनासाठी उपयुक्त होईल. त्या माध्यमातून ग्रीन एनर्जी तयार करणार आहोत. त्यामुळे मराठवाडा आणि दुष्काळी भागात चित्र बदलणारा शक्तिपीठ महामार्ग असेल.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

मेंटल हेल्थ- पती खूप पझेसिव्ह:प्रत्येक सेकंदाला विचारतो– ‘कुठे आहेस’; खूप श्वास गुदमरतो, वाटते हे...

0
प्रश्न– माझा पार्टनर (पती) माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खूप पझेसिव्ह (अधिकार गाजवणारा) देखील आहे. प्रत्येक वेळी त्याला हे जाणून घ्यायचे असते...

जनाब उद्धव ठाकरे रामरक्षा नव्हे, पक्षरक्षा करत आहेत:रामरक्षा आंदोलनावरून नवनीत राणांची टीका, 18 जुलैला...

0
अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी पेटीत झालेल्या कथित चोरीच्या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता नागपुरात १८ जुलै रोजी 'रामरक्षा...

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

पंतप्रधानांच्या चंदीगड दौऱ्याचे मोमेंट्स:मोदींच्या स्टेजवर काँग्रेस खासदार; उद्घाटन शिलालेखावर मुख्यमंत्री मान यांचे नाव; मुलाच्या...

0
हरियाणातील जिंद येथे देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी चंदीगड आणि पंजाब दौऱ्यावर पोहोचले. चंदीगडमध्ये पंतप्रधानांनी 4700 कोटी रुपयांच्या...
spot_img

मेंटल हेल्थ- पती खूप पझेसिव्ह:प्रत्येक सेकंदाला विचारतो– ‘कुठे आहेस’; खूप श्वास गुदमरतो, वाटते हे...

0
प्रश्न– माझा पार्टनर (पती) माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खूप पझेसिव्ह (अधिकार गाजवणारा) देखील आहे. प्रत्येक वेळी त्याला हे जाणून घ्यायचे असते...

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

चायना मूनशॉट AI किमी K3 लाँच

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराचीनी कंपनी मूनशॉट एआयने (AI ने) आपले नवीन एआय मॉडेल किमी K3 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे...

देशात लवकरच प्लास्टिक नोटा चलनात येतील, आरबीआयIने निविदा जारी केली:₹10 आणि ₹20 च्या नोटांपासून...

0
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच देशात प्लास्टिक म्हणजेच पॉलिमरपासून बनवलेल्या नोटांचा पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशात नवीन पिढीचे चलन...
error: Content is protected !!