Homeमहाराष्ट्रMaharashtra Government Stops Free Saree Scheme; Eknath Shinde Policy Halted

Maharashtra Government Stops Free Saree Scheme; Eknath Shinde Policy Halted


‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तून पडताळणीदरम्यान ९२ लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना राज्य सरकारने आणखी एक मोठा झटका दिला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्य

.

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८’ अंतर्गत जून २०२३ मध्ये या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती. या योजनेमागे सरकारचा दुहेरी हेतू होता. राज्यातील यंत्रमाग (Powerloom) क्षेत्राला शाश्वत मागणी मिळवून देणे आणि स्थानिक रोजगार वाढवणे. राज्यातील अत्यंत गरीब अशा अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील महिलांना हक्काचे वस्त्र पुरवणे. या योजनेंतर्गत दरवर्षी सणासुदीच्या काळात अंत्योदय कुटुंबांना यंत्रमागावर विणलेली एक दर्जेदार साडी सप्रेम भेट दिली जात होती.

योजना बंद करण्यामागे वाढत्या ‘आर्थिक भाराचे’ कारण

वस्त्रोद्योग विभागाने जारी केलेल्या अधिकृत शासन निर्णयानुसार, सध्या विभागांतर्गत अनेक वेगवेगळ्या लोककल्याणकारी आणि व्यावसायिक योजना सुरू आहेत. या योजनांसाठी द्यावे लागणारे आर्थिक साहाय्य, प्रस्तावित योजनांचा आगामी काळातील आर्थिक भार आणि शासनाची इतर विविध आर्थिक दायित्वे लक्षात घेता, ही मोफत साडी योजना पुढील आर्थिक वर्षात सुरू ठेवणे संयुक्तिक ठरणार नाही. वाढत्या वित्तीय दायित्वाचा विचार करूनच ही योजना कायमची बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

२५ लाख गरीब कुटुंबांवर परिणाम; यंदा साडी वाटप नाही

राज्यातील सुमारे २५ लाख अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर या साडीचे वाटप केले जात होते. या योजनेसाठी राज्य सरकार दरवर्षी १०० कोटी रुपयांची भरीव तरतूद करत होते. सन २०२३, २०२४ आणि २०२५ अशी सलग तीन वर्षे या साड्यांचे यशस्वी वितरण झाले होते. मात्र, चालू वर्ष २०२६ मध्ये ही योजना बंद करण्यात आल्यामुळे यंदाच्या दिवाळीत गरीब कुटुंबांना या शासकीय साडीचा लाभ मिळणार नाही, असे वस्त्रोद्योग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

लाडकी बहीण योजनेच्या निकषांनंतर आता अत्यंत गरीब कुटुंबांसाठी असणारी मोफत साडी योजनाही गुंडाळल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा…

‘लाडकी बहीण’मधून 92 लाख महिला का वगळल्या गेल्या?:कॅगचे ताशेरे आणि बीडमधील गोंधळावर मंत्री अदिती तटकरेंचा मोठा खुलासा

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील ३,५४२ कोटी रुपयांच्या खर्चावर ‘कॅग’ने ताशेरे ओढल्यानंतर आणि योजनेतून तब्बल ९२ लाख महिलांना वगळण्यात आल्याच्या चर्चेने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. विशेषतः बीड जिल्ह्यातील अपात्र महिलांच्या आकडेवारीवरून राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता. या सर्व घडामोडींवर आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले असून, पात्र आणि अपात्र महिलांची नेमकी आकडेवारी समोर ठेवली आहे. सविस्तर वाचा…

महाराष्ट्राच्या लेकींना दिलासा:लाडकी बहीण योजनेचे जून महिन्याचे पैसे जमा; लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये, जुलैमध्ये किती?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जून महिन्याचे पैसे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अनेक लाभार्थी महिलांना पैसे जमा झाल्याचे मेसेज आलेत. लाभार्थींच्या खात्यावर एक महिन्याची 1500 रुपयांची रक्कम जमा झालीय. सविस्तर वाचा…



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!