Homeदेश-विदेश'श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सवात' सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत...

‘श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सवात’ सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा गौरव !

‘श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सवात’ सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा गौरव !

सद्गुरु स्वाती खाडये यांनी स्वीकारला सन्मान !

           पुणे – दत्त परंपरेतील महान संत आणि शक्तिपात योगाचे अध्वर्यू प.पू. गुळवणी महाराज यांच्या दीक्षा शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या अद्वितीय धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यासाठीचा हा सन्मान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वतीने सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी स्वीकारला. शाल, श्रीफळ, मोत्यांची माळ आणि सन्मानचिन्ह असे सन्मानाचे स्वरूप होते. पुण्यातील एरंडवणे येथील ‘श्रीवामन निवास’ येथे ‘श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सव (२०२०-२०२६)’ हा दिमाखदार सन्मान सोहळा पार पडला.

          हा महोत्सव अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरला. श्रीवासुदेव निवास स्थापनेचा हीरक महोत्सव, प.पू. ब्रह्मश्री श्रीदत्त महाराज कवीश्वर पुण्यतिथी रौप्य महोत्सव, प.पू. योगतपस्वी श्रीनारायणकाका ढेकणे महाराज जयंती शताब्दी महोत्सव, विद्यमान उत्तराधिकारी पू. शरदभाऊ जोशी यांचा ‘योगभक्ती अमृत महोत्सव’ होता.

          या प्रसंगी भारतभरातील २६ संतांचा सन्मान करण्यात आला. समाजाला सन्मार्ग दाखवण्याचे कार्य करणाऱ्या सत्पुरुषांचे आशीर्वाद मिळावेत, या उदात्त हेतूने ‘श्री प.पू. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प.पू. श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज ट्रस्ट’च्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात उपस्थित संतांनी साधनेचे महत्त्व अधोरेखित केले.

          कार्यक्रमाचा प्रारंभ वेदमंत्रपठण, पादुकापूजन आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषाने झाला. समारोप प.पू. टेंबे स्वामी विरचित ‘दत्त त्रिपदी’च्या व्हायोलिन वादनाने भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. श्री. शिरीषकुमार आणि श्री. अरुणकुमार उपाध्ये यांनी हे वादन सादर केले.

 

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले

0
जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक...

एमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्ती

0
मराठी बातम्याराष्ट्रीयएमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्तीभोपाळ44 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात...

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!