Homeपुणे / पिंपरी-चिंचवडDP रस्ता तर नाहीच… पण पर्यायी रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

DP रस्ता तर नाहीच… पण पर्यायी रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

नागरिक त्रस्त | शाळकरी मुले, वयोवृद्धांचा प्रश्न गंभीर | महापालिका ढिम्म

कोथरूड (प्रतिनिधी) : डावी भुसारी कॉलनीजवळ एकलव्य कॉलेज ते पुणे-बेंगळूर महामार्गाला जोडणारा डीपी रोड गेली अनेक वर्षे केवळ नकाशातच अस्तित्वात आहे. या मुख्य रस्त्याचा प्रश्न प्रलंबित असतानाच नागरिकांनी पर्यायी मार्ग म्हणून अकलूज शाळेजवळील कच्च्या रस्त्याचा वापर सुरू केला. मात्र या पर्यायी रस्त्यावर साचलेला कचरा आता नवे संकट बनले असून, नागरिकांमध्ये संतापाचा सूर आहे.

या कच्च्या रस्त्यावरून दररोज नागरिक, शाळकरी मुले आणि वयोवृद्ध प्रवास करतात. दोन ते तीन शाळा या मार्गालगत असल्यामुळे शाळा सुरू आणि सुटण्याच्या वेळेत मोठी वर्दळ असते. आधीच खडतर रस्ता आणि त्यात भर म्हणून दिवसेंदिवस वाढणाऱ्या कचऱ्याचा ढीग यामुळे दुर्गंधी, अस्वच्छता आणि अपघाताचा धोका वाढला आहे.

महापालिकेकडे वारंवार मागणी निष्फळ

स्थानिक नागरिकांनी अनेकदा पुणे महापालिका कर्मचाऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही केवळ आश्वासनच मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

“आम्ही आठवड्यातून किमान एकदा तरी कचरा उचलावा, हीच मागणी करत आहोत. पण तीही पूर्ण होत नाही. दुर्गंधीमुळे मुलांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते” असे स्थानिक रहिवासी सांगतात.

निवडणुकीनंतर काम थांबले?

ऑक्टोबर महिन्यात माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी नागरिकांच्या तक्रारीवर तात्काळ प्रतिसाद देत सफाई अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्ता स्वच्छ केला होता. त्यावेळी विधानसभेच्या निवडणुका सुरू असल्यामुळे तातडीने कारवाई झाली. पुढील दोन महिन्यांपर्यंत नियमित सफाई झाली, पण त्यानंतर मात्र पुन्हा दुर्लक्ष सुरू झाले आहे.

रस्ता की कचऱ्याचे ढीग?

या रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या वाहनांना वाट काढावी लागते. पादचाऱ्यांना तर उघड्या कचऱ्यावरून चालावे लागते. कचऱ्यामुळे उंदीर, कुत्री यांची संख्याही वाढली असून नागरिकांना आरोग्याच्या नव्या संकटांचा सामना करावा लागत आहे. काही बेजबाबदार नागरिक या रस्त्यावर थेट घरोघरीचा कचरा आणून टाकत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

‘स्वच्छता’चे गाजावाजा… पण काम कुठे?

एकीकडे पुणे महानगरपालिका ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमात सहभागी होत देशपातळीवरील सन्मानासाठी प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिक बेसिक सफाईसाठी भांडत आहेत, ही शोकांतिका म्हणावी लागेल.

नागरिकांची मागणी काय?

• आठवड्यातून किमान एकदा कचरा उचलावा

• येथे कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व्हावी

• रस्त्याची तात्पुरती तरी दुरुस्ती करावी

• महापालिकेने नियमित निरीक्षण करावे

या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून किमान स्वच्छता तरी सुरळीत करावी, अशी नागरिकांची एकमुखी मागणी आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!