सकल माहेश्वरी समाजाचे महेश नवमी पर्व महानगरात शुक्रवारपासून प्रारंभ झाले आहे. यास समाजाचे महिला-पुरुष उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. स्थानीय माहेश्वरी भवनात उत्सवात माहेश्वरी समाज ट्रस्ट, माहेश्वरी महिला मंडळ, प्रगती मंडळ, नवयुवती मंडळ, वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ तथा वरिष्ठ नागरिक महिला प्रकोष्ठच्या वतीने विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम सुरू आहे. भवनात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी सकाळी ट्रस्टचे अध्यक्ष विजयकुमार तोष्णीवाल, प्रधानमंत्री विजयकुमार राठी, उत्सव प्रमुख नरेश बियाणी, महिला मंडळ अध्यक्षा वंदना हेडा, प्रगति मंडळ अध्यक्ष सूरज काबरा, नवयुवती मंडळ अध्यक्षा नंदनी बजाज, वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ अध्यक्ष सुरेश माहेश्वरी, वरिष्ठ नागरिक महिला प्रकोष्ठ अध्यक्षा प्रमिला लाहोटी आदी पदाधिकारी व समाजाच्या नागरिकांच्या उपस्थितीत भगवान महेश यांची पूजा अर्चना व आरतीने या उत्सवाचा भक्तिभावात प्रारंभ झाला. मंडळाच्या शोभा बियाणी यांनी विजेता घोषित केला. प्रकल्प प्रमुख कृष्ण नवनीत बजाज भोपाल होत्या. संचालन आरती जाजू यांनी केले. यावेळी माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्ष वंदना हेडा, सचिव शोभा बियाणी, उपाध्यक्ष मंजू गट्टानी, आरती जाजू, सहसचिव सुनीता हेडा, राधा टावरी, कोषाध्यक्ष अनिता गांधी, सल्लागार हेमा खटोड, शिल्पा चांडक समवेत बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. दरम्यान या दिनी देवकीबाई विजयकुमार सोमानी चॅरिटेबल ट्रस्ट, स्व. रजनीबाई रामगोपाल तोष्णीवाल ट्रस्ट व प्रेमवती प्रसन्ना पोरवाल परिवाराच्या वतीने जिल्हा महिला रुग्णालयात फळ वितरण कार्यक्रम होऊन रुग्णांना फळ वितरित करण्यात आले. सत्र समाप्ती वेळी वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठच्या वतीने वादविवाद स्पर्धा संपन्न झाली. समाजातील महिला पुरुषांनी उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समाज ट्रस्टचे उपाध्यक्ष शांतीलाल भाला, सहाय्यक मंत्री विनीत बियाणी, कोषाध्यक्ष देवानंद लढ्ढा, अंकेक्षक सीए मनोज चांडक, सदस्य राजेश लोहिया, प्रा. डॉ. महेश मुंदडा, पंकज मणियार, आर्कि. पवन बंग, प्रा. डॉ. रमण हेडा, कुंजबिहारी चांडक, गिरीश तोष्णीवाल, राजेश भन्साली, ॲड. विशाल लढ्ढा, प्रदीप राठी, प्रकाश चितलांगे, दिनेश लढ्ढा समवेत माहेश्वरी समाज ट्रस्ट, महिला मंडळ, प्रगती मंडळ, नवयुवती मंडळ, वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ, वरिष्ठ नागरिक महिला प्रकोष्ठचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. महिलांनी सादर केले नृत्य अभिनय, वक्तृत्व कला दुपारी माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने वीणा जयप्रकाश चांडक, स्व. गोदावरीबाई धनराज चांडक यांच्या स्मृतीत संपूर्ण नारी प्रतिभा स्पर्धा पार पडली. यात अनेक महिलांनी सहभागी होऊन आपल्या नृत्य अभिनय व वक्तृत्व कलेचे सादरीकरण केले. यात कीर्ती काबरा, सरिता बंग, सीमा बाहेती, शैलजा भुतडा, सुचिता मोहता, वंदना कासट, सविता गांधी, राणी टावरी, श्रद्धा मंत्री, कविता राठी, सपना पनपालिया, विभा राठी, निकिता भुतडा, अल्पा सोमाणी आदी स्पर्धकानी सहभाग घेतला. यात शैलजा भूतडा विजेता घोषित करण्यात आल्या. वंदना कासट प्रथम रनर-अप व निकिता भूतडा द्वितीय रनर-अप ठरल्या. सरिता बंग, अल्फा सोमानी यांना प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
Source link
महेश नवमी उत्सवास प्रारंभ; विविध सांस्कृतिक उपक्रमाचे केले आयोजन:महिला मंडळाच्या वतीने नृत्य अभिनय अन् वक्तृत्व स्पर्धा
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
पीएम मोदी योग | कोलकाता बोट आणि वडोदरा पूल योग; ITBP 14k फूट
31 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराआज १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. यावेळी योगाचे अनेक रंग पाहायला मिळाले. जवानांनी पर्वतांवर, मुलांनी स्वीमिंग पूलमध्ये योग केला....
भानु सप्तमी पूजा: सूर्यदेव मंत्र आणि पद्धत
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराआज रविवार, 21 जून रोजी भानु सप्तमी आहे. या तिथीला भगवान सूर्याची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार रविवारचा कारक...
फिफा वर्ल्ड कप 2026 जर्मनीने आयव्हरी कोस्टला हरवले 2 1 वर्ल्ड कप नॉकआउट इक्वाडोर...
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026 जर्मनीने आयव्हरी कोस्टला हरवले 2 1 विश्वचषक नॉकआउट इक्वाडोर विरुद्ध कुराकाओ24 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराचार वेळा विजेत्या जर्मनीने टोरंटो येथे...
लेडी इंजिनिअरचे वडील म्हणाले- मुलगी दारू पीत नव्हती:अंत्यसंस्कारानंतर मसूरीला पोहोचले, जावयावर हत्येचा संशय व्यक्त...
गुरुग्राममधील एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या विशाखापट्टणम येथील रहिवासी २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता पी. राधा गायत्री यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात नवीन वळण आले...
फिफा वर्ल्ड कप 2026 जर्मनीने आयव्हरी कोस्टला हरवले 2 1 वर्ल्ड कप नॉकआउट इक्वाडोर...
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026 जर्मनीने आयव्हरी कोस्टला हरवले 2 1 विश्वचषक नॉकआउट इक्वाडोर विरुद्ध कुराकाओ24 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराचार वेळा विजेत्या जर्मनीने टोरंटो येथे...
FIFA विश्वचषक 2026: परदेशी खेळाडूंशिवाय फक्त 8 संघ
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: परदेशी खेळाडूंशिवाय फक्त 8 संघ | फ्रान्सकडे ९८ खेळाडू आहेतशार्लोट हरपूर/जोशुआ क्लोक. न्यू यॉर्क10 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६...
डियॉर-गुच्ची देखील स्वीकारत आहेत भारतीय हस्तकला:भारतीय वस्त्रोद्योगाचे नवे पर्व; जग स्वीकारत आहे, असे करा...
भारतीय हँडलूम आता फक्त लग्न आणि सणांपुरते मर्यादित राहिलेले नाही. चंदेरी, जामदानी, इकत, कोटपद आणि कांजीवरम यांसारखे पारंपरिक वस्त्र आता ऑफिस वेअर, कॅज्युअल...
गायक गिप्पी गरेवालच्या घरावर गोळीबार:लॉरेन्स टोळीने म्हटले होते – सलमानला सांगा येऊन वाचवावे, गायकाने...
पंजाबचे लोकप्रिय गायक आणि अभिनेते रुपिंदर सिंग उर्फ गिप्पी ग्रेवाल यांच्या कॅनडा येथील घरावर 2023 साली गोळीबार झाला होता. काही काळानंतर लॉरेन्स गँगने...






























